top of page
Search

पेरू

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 16, 2021
  • 2 min read


पेरू हा सदाहरित वृक्ष मिर्टेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिडियम गुयाव्हा आहे. लवंग, निलगिरी व मिरी या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. पेरू मूळचा मेक्सिकोतील व मध्य अमेरिकेतील असून स्पॅनिश व पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी ईस्ट इंडीज, आशिया व आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार केला. पेरू वृक्ष ६–८ मी. उंच वाढतो. फुले मंद सुवासिक व शुभ्र असून ती पानांच्या बेचक्यात एकटीदुकटी किंवा लहान झुबक्याने येतात. फूल उमलताच ४–५ पाकळ्यांचे दलपुंज गळून पडते आणि असंख्य पांढरे पुंकेसर बाहेर दिसायला लागतात. फलनानंतर ९०–१५० दिवसांत फळ तयार होते. फळे पिकल्यावर पिवळी होतात. गर रवाळ असून आंबटगोड रसाचा असतो. काही फळांमध्ये गर सफेद असतो, तर काहींमध्ये गुलाबी किंवा फिकट-लाल असतो. गरात अनेक व कठीण कवचांच्या बिया असतात. लिंबू वर्गातील फळांशी तुलना करता पेरूच्या फळात क-जीवनसत्त्व ४–५ पट अधिक असते. तसेच त्यात अ-जीवनसत्त्व, फॉलिक आम्ल, तंतुमय पदार्थ आणि प्रतिऑक्सिडीकारके असतात.


उपयोग –

1) पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, सामान्य संक्रमणांपासून आणि रोगांपासून बचाव करते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सामान्य हिवताप किंवा सर्दी खोकला हात नाही. परिपक्व पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.

2) दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन ए मोतीबिंदु, मॅक्युलर र्हासची पासून बचाव करते, शिवाय डोळ्यात होणारा मस्कुलर डिकंजेशन सारख्या आजारांपासून वाचवते. रेटिनाच्या नुकसानास संरक्षण देते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते.

3) पेरूमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हे मधुमेहापासून दूर ठेवते. शरीरात अचानक वाढणारी साखरेची पातळी वाढण्यापासून थांबवते. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते.

4) दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास सूज कमी होण्यासही मदत होते.

5) पेरूमध्ये अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन, फ्लेव्होनॉइड आणि फायटोन्यूट्रिएंट्स कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करण्यासाठी अत्यधिक फायदेशीर आहेत. नियमितपणे पेरू खाल्ल्यास प्रोस्टेट कर्करोग, कोलन कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग आजारांपासून वाचवते

6) पेरूमध्ये व्हिटॅमिन बी ३ आणि बी ६ असते, त्यामुळे रक्तभिसरण सुधारते शिवाय स्मरणशक्ती वाढते. पेरूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या स्नायूंना आराम देण्याची, ताणतणावाचा सामना करण्यास आणि उर्जा वाढविण्यास आवश्यक आहे.

7) खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पेरू आवश्यक आहे. कच्च्या पेरूचा रस किंवा पेरूच्या पानांचा काढा फुफ्फुसांमधील कफ बाहेर काढतो. खोकला आणि सर्दी चे सूक्ष्मजीव होण्यास प्रतिबंधित करतात .

पेरुमध्ये अ जीवनसत्त्वे अ, बी, सी यासह लाइकोपीन, कॅरोटीनची समृद्धी फ्री रॅडिकल्सची त्वचेचे उदासीनता, नुकसान टाळण्यासाठी आणि त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करण्यासाठी योग्य आहे. शिवाय डोळ्याखालील काळे सर्कल नाहीसे होते. पेरूमुळे चेहरा उजळतो आणि ताजेपणा येतो. पिकलेल्या पेरूचा गर चेहऱ्यावर लावल्याने डेड स्कीनला काढते आणि रंग उजळतो. व्हिटॅमिनमुळे तजेला येतो.

9) पेरूच्या पानांमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल क्वालिटी असते. जी दातांचे इन्फेक्शन दूर करण्यात आणि किड्यांना मारण्यासाठी उपयोगी पडते. पेरूची पाने दातदुखी दूर करण्यासाठी चांगला घरगुती उपाय आहे. पेरूच्या पानांच्या रसाने दात आणि दाढ घासल्याने फायदा होतो.

10) पेरू दुसऱ्या फळांच्या तुलनेत डायटरी फायबरचा एक चांगला सोर्स आहे. शरीराला १२ टक्के फायबरची गरज असते पेरूमुळे ती पूर्ण होते. त्यामुळे डायजेशन चांगले राहते. याच्या बिया पोट साफ करण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे आतड्यांची स्वच्छता होते.

11) पेरू मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. पेरू खाल्ल्यानंतर पोटदेखील भरते आणि कॅलरी कमी होते. कच्च्या पेरूमध्ये केळी, सफरचंद, संत्री, अंगुर सारख्या दुसऱ्या फळांच्या तुलनेत जास्त साखर असते.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar BAMS, MS (Gynaecology And Obstetrics) DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)] PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services) DDN (Diploma In Diet And Nutrition) MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page