top of page
Search

आम

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 24, 2021
  • 1 min read

आम ही आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्णसंकल्पना आहे. आम याचाशब्दश: अर्थ अर्धवट पचलेलेकिंवा कच्चे असा आहे. शरीराचेपोषण होण्यासाठी घेतलेल्या आहाराचे प्रथम रस धातूत रूपांतरहोते. शरीराला मुर्त रूप देणाऱ्या घटकांमध्येरस धातूचा क्रमांक पहिला येतो. अन्न पचविणाऱ्या अग्निचीशक्ती कमी पडली तरहा धातू नीट तयारन होता कच्च्या स्वरूपातआमाशयात पडून राहतो. यालाआम असे म्हणतात. अतिशयदुषित झालेले वात, पित्त, कफपरस्परात मिसळून गेले तरी आमाचीउत्पत्ती होते. हा आम विषाप्रमाणेअसतो. आम तयार करणाऱ्याबाह्य कारणांचा उल्लेख करताना चरकाचार्य म्हणतात की, पूर्ण लंघनकरणे, अपचनातही जेवणे, अधिक प्रमाणात खाणे, कधी कमी तर कधीखूप खाणे, जेवणाच्या सवयींमधील अनियमितता, आपल्या प्रकृतीला न झेपणारे अन्नखाणे, पचायला अतिशय जड असे जेवणघेणे, अतिशय थंड, अतिशय कोरडेव खराब झालेले अन्नखाणे यामुळे आमाची निर्मिती होते. विरेचन, वमन, स्नेहपान याउपक्रमांचा परिणाम अतिमात्रेत झाल्यास अन्न पचविणाऱ्या अग्निचीशक्ती कमी होते. तसेचदीर्घ आजारामुळे आलेली कृशता, वातावरण व ऋतूत आलेलीविषमता, शौच, मूत्र, जांभई, शिंका यांना वारंवार रोकण्याची सवय या सर्वांमुळेपाचकाग्नी मंद पडतो. मंदअग्नी थोडेही अन्न पचवू शकतनाही. त्यामुळे खाल्लेले अन्न सडते, आंबुसतेविषमय बनते. जेव्हा शरीरातील तिन्ही दोष, सात धातूव तीन मळ याआमाने संपृक्त होऊन काम करतात, तेव्हा त्यांना साम म्हणतात. यांमुळेहोणाऱ्या रोगांनाही साम म्हटले जाते. शरीरात अशा साम दोषांचाव्यापार चालत असला, तरसामान्यपणे पुढील लक्षणे जाणवतात – शौचमूत्र बाहेर टाकण्याचे मार्ग दाटल्याप्रमाणे वाटणे, शरीरात थकवा, जडपणा, आळस, अपचन वमलबध्दता जाणवणे, शरीरातून वायूचा निचरा नीट न होणे, तोंडात वारंवार पाणी येणे, तोंडालाचव नसणे, सारखी झापड येणे हीआहेत.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page