top of page
Search

केळी

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 12, 2021
  • 3 min read




शास्त्रीय नाव (Scientific Name): मुसा अकुमिनाटा ( Musa Acuminata)

इंग्रजी नाव : बनाना (Banana)




केळीत असणारे आवश्यक घटक

प्रोटीन: १.९ ग्रॅम व्हिटॅमिन सी: १२%, मॅगनीज : १५%

कॅलरीज: ८९. ० ग्रॅम व्हिटॅमीन बी ६: २८% पोटॅशियम : १०%

शुगर : १२. २३ ग्रॅम व्हिटॅमिन बी ५: ७% मॅग्नेशियम : १२%

फॅट :०. ३३ ग्रॅम व्हिटामिन सी : १२% कॉपर: ९%

कार्बोहैड्रेट : २२.८४ ग्रॅम फोलेट : ५% फायबर : २.६ ग्रॅम



केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे


1. Banana मध्ये पोटॅशिमची मात्रा असल्यामुळे आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब (High Blood Presure) वर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि आपले हृदय व रक्तवाहिन्यान वर जो ताण पडतो तो कमी करण्यास मदत होते. लीड्स विद्यापीठ यु.के.यांच्या अध्ययनानुसार केळीमधील तंतुमय पदार्थ कार्डीयोवेस्कुलर (Cvd) आणि कोरोनरी हार्ट डिसीज (C.H.D.) सारख्या रोगांपासून आपले रक्षण करतात.


2. बहुतेक वेळा डॉक्टर आपल्याला केळी (Banana) आणि केळी सह इतर फळे खाण्यास सांगतात कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर चे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते.


3. केळी Banana मध्ये पाणी आणि फायबर ह्या दोन गोष्टी आसल्यामुळे आपली पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. एक मिडीयम केळी आपल्याला दिवसभरासाठी १०% फायबर पुरवते. काही लोकांना आतड्यासंबंधित रोग, गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्या असतात. त्यावर केळी खाणे हे फायदेशीर आहे केळी खाल्याने आपल्याला आपले अन्न पचण्यास मदत होते.



4. केळी खाल्याने गरोदर स्त्रीचे शरीरातील तापमान योग्य राहते. सफरचंदासोबत तुलना करायची झाली तर सफरचंदापेक्षा चारपट जास्त प्रोटीन दोनपट जास्त कार्बोहायड्रेट तीनपट जास्त फॉस्फरस आणि पाचपट जास्त व्हिटॅमिन ए आणि आयरन असते त्यामुळे दररोज Banana खाणे शरीरासाठी गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर आहे .


5. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर केळी Banana हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. दिवसातून दोन केळी खाल्याने तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. कारण केळीत फायबर हे तत्व असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.


6. केळी मध्ये केलेल्या अभ्य्सानुसार असे लक्षात आले डिप्रेशन च्या रुग्णांनी केळी खाल्यास त्यांना आराम मिळतो . केळी मध्ये असणारे प्रोटीन तुम्हाला रिलॅक्स करते आणि तुमचा मूड देखील फ्रेश होतो .


7. लहान मुलांनी रोज एक केळी खाल्याने त्यांच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन ) पातळी वाढते व त्यामुळे ऍनेमिया सारख्या रोगांपासून त्यांचा बचाव होतो. लहान मुलांना सकाळी नाश्त्यासोबत केळी खाण्यास दिली तर त्यांची बुद्धी तल्लख होते कारण केळीमध्ये पोटॅशियम हे व्हिटॅमिन असल्यामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते.


8. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. त्यातील पोट्याशीयम हे खनिज आपल्या शरीरात सर्व प्रक्रिया नियंत्रित करतो. त्यामध्ये श्वसन संस्थेचा समावेश होतो. हृदयासंबंधी आणि मेंदूच्या विविध भागातील चेतापेशींचे कार्य सुरळीत ठेवतो.


9. पोषणाबाबत केळी अत्यंत लाभदायी आहे. यात खनिजे आणि विविध जीवनसत्वे यांचा मोठा साठा असतो. पोट्याशियम, म्यागनीज, म्याग्नेशियम, लोह, फोलेट, निकेम आणि रायबोफ्लोवीन, आणि जीवनसत्व ब६ ने परिपूर्ण असते. हे सारे तत्व शरीर क्रिया नियंत्रित ठेवते.


10.केळी हे एक चांगले आणि उत्तम प्राकृतिक मोश्चरायजर आहे. केळीमधील जीवनसत्व अ आपल्या कोरड्या त्वचेस स्वस्थ आणि मुलायम बनवतो. हे एक उत्तम मोश्चरायजर असल्यामुळे पिकलेल्या केळास चेहऱ्यावर लावल्यास २०-२५ मिनिटे तसेच राहू दे नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे त्वचा मुलायम व नरम होईल. जर त्वचा अधिकच शुष्क झाली असेल तर केळासोबत शहद मिळवून त्याचा फेसप्याक तयार करून त्वचेवर लावून मालिश करावी. यामुळे त्वचा कोमल बनेल. यासोबत आपण केळीसोबत एक चम्मच दही आणि १ चम्मच जीवनसत्व इ तेल घेवून मिश्रण बनवावे नंतर हे रोज नियमित चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा चमकदार व कोमल होईल.


11.केळीमध्ये प्राकृतिक मोश्चारायजर गुणांमुळे याचा वापर पायांच्या भेगांवर व पायांच्या त्वचेवर हि करू शकतो. यासाठी दोन पिकलेल्या केळाचा गर बारीक करून पायावर लावल्यास व भेगांवर लावल्यास पाय सुंदर व भेगा नाहीशा होन्यास मदत मिळते.


12.अर्ध्या केळास पातळ करून, सुजलेल्या डोळ्यांच्या भोवती लावून १५-२० मिनिटे ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे, डोळ्याची सुज एकाच प्रयत्नात दूर झालेली असेल. केळामधील पोट्याशियम डोळ्यांमधील तरल साफ करण्यास लाभदायक ठरतो.


13.कोरडे व कमजोर केसांसाठी केळाचा गर, बदाम तेल १ चम्मच मिळवून रात्री झोपण्याआधी केसांच्या मुळांशी लावावा सकाळी केस चांगल्या कंडीशनरने धुवून घेणे. यामुळे केस चमकदार व मुलायम होतील. केळीमध्ये जीवनसत्व अ आणि बदाम तेलात जीवनसत्व ई मुळे केस चमकदार व मुलायम होतील.



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma In Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page