top of page
Search

पपई

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 12, 2021
  • 4 min read

शास्रीय नाव : कॅरिका पपई Scientific Name : Carica Papaya इंग्रजी नाव: पपाया (Papaya)




पपई खाण्याचे फायदे

1. पपईत फायबर नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असते. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ह्या फळाचा भरपूर फायदा होतो. Papaya Fruit फायबर, अँटिऑक्सिडेन्ट, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात म्हणून ज्यांना हृदयासंबंधित आजार असतील किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांच्यासाठी पपईखाणे खूप लाभदायी आहे.


2. आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असली तर आपल्याला कोणतेच आजार लवकर होत नाही. Papaya Fruit आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या C Jivansatvaची कमतरता पूर्ण करते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मर्यादित स्वरुपात पपईच्या बियांचे सेवन केल्यास स्टेफिलोकोकस, साल्मोनेला टायफी, स्यूडोमोनेस एरूगिनोसा, कोलाई यासारख्या बॅक्टेरियांपासून आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळते.


3. पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.


4. त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी पपईच्या बिया अतिशय लाभदायक आहेत. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे घटक आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतात. या बियांचे सेवन केल्यास कमी वयातच त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे उदाहरणार्थ सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.


5. मिडीयम साईजच्या Papaya Fruit १२० कॅलरीज असतात. ह्यात असणारे फायबर वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असतात.


6. पपई फळ सहज पचणारे आहे. पपई च्या नियमित सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते व तसेच पोटांचे विकार हि दूर होतात. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते. तसेच पपई च्या रसाने अरुची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता इत्यादी रोग दूर होतात .


7. जेव्हा आपण उन्हात घराबाहेर पडतो तेव्हा सूर्याची किरणे व वातावरणातील धूर व धुरामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात. तेव्हा आपण काकडी व Papaya Fruit चा मगज चेहऱ्यावर काही वेळ लावून ठेऊ शकतो त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यास चेहरा हा खुलतो व त्वचाही मुलायम होते. सौदर्य वाढवण्यासाठी पपईचा गर स्मॅश करून चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची नैसर्गिक चमक येईल. जर तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी इस्टंट ग्लो हवा असेल तर चेहऱ्यावर पपईचा गर जरूर लावा.



8. ज्या महिलांना पिरियडस मध्ये त्रास होण्याची जास्त तक्रार असते. त्यांनी Papaya Fruit चे सेवन केलं पाहिजे त्यांची पिरियडस सायकल नियमित राहते आणि पिरियडस मध्ये होणार त्रास हि कमी होतो.


9. पपईमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्स पासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा – कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.


10.दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.


11.पपईमध्ये ‘व्हिटमिन ए’ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारत समावेश करावा.


12.पपईच्या बियांच्या सेवनामुळे शरीरावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल यासारखे महत्त्वपूर्ण कम्पाउंड असतात. यातील अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे संधिवात यासारख्या समस्यांमुळे शरीरावर येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते.


13.आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सतत ताणतणावाचे प्रमाण वाढताना दिसते. ताणतणाव वेळीच नियंत्रित केला गेला नाही तर त्यामुळे नैराश्याच्या अधीन जाण्याची शक्यता वाढू शकते. यासाठी ताणतणाव नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पपईमध्ये अनेक पोषकघटक तर आहेतच शिवाय भरपूर अँटि ऑक्सिडंट आहेत. पपई नियमित खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. आरोग्याचा तुमच्या मनावरही परिणाम होत असतो. जर शरीर उत्तम असेल तर मनावर नियंत्रण ठेवणं नक्कीच शक्य होतं.


14. ज्यांना प्लिहा हा आजार झाला आहे अश्यानी जर दररोज Papaya Fruit पपई फळाचे सेवन केले पाहिजे त्यामुळे काय होत प्लिहा रोग कमी होण्यास मदत होते. किंवा हा आजार बरा सुध्दा होतो.


15. पपई फळाच्या झाडाचे मूळ सावलीत सुकवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ती पेस्ट दोन चमचा घेऊन अर्ध्या ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. आणि सकाळी ते पाणी गाळून प्या असे सलग २१ दिवस केल्यास किडनी स्टोन चा त्रास कमी होईल.




पपईत असणारे आवश्यक घटक

फायबर : १. ७ ग्रॅम फोलेट :९% मॅंग्नेशियम : ७%

शुगर : ७. ८२ ग्रॅम व्हिटॅमिन सी : ८१% पोटॅशियम :५%

कॅलरीज : ४३.० ग्रॅम व्हिटॅमिन ए : ४१% कॉपर :५%

प्रोटीन : ०.४७ ग्रॅम फॅट : ०. २६ ग्रॅम

कॅर्बोयड्रायडेस : १०. ८२ ग्रॅम

याचप्रमाणे पपईमध्ये भरपूर अँटि ऑक्सिडंट, फायबर, कॅल्शिअम तसेच व्हिटॅमिन बी1, बी3, बी5, ई आणि के थोड्या प्रमाणात असतं.


पपई खाण्याचे नुकसान

1. पपईमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह ग्रस्त रुग्णांसाठी पपई खाणे आरोग्यास घातक ठरू शकते. म्हणून पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

2. गर्भवती कच्ची पपई गरोदर महिलांसाठी अधिक धोकादायक आहे. पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते. परिणामी गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

3. लहान मुलांना स्तनपान करणार्‍या महिलांना पपईचं सेवन नुकसानकारक आहे. बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्यालाही पपईचं सेवन करायला न देणंचं अधिक फायदेशीर आहे.

4. काही लोकांना पपईमध्ये उपस्थित असलेले एंजाइम पपेन मुळे पपईची अलर्जी असू शकते. यात सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि खाज सुटणे समाविष्ट आहे. अशा लोकांनी पपईचे सेवन करणे टाळावे.

5. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल किंवा पोटदुःखी पासुन ग्रस्त असाल तर पपईचे सेवन करू नये. तज्ञांच्या मते पपईच्या बाह्य अवराणामध्ये लेटेक्स असते, ज्यामुळे पोट खराब किंवा अतिसार होण्याचे कारण ठरू शकते. यामुळे पोटात वेदना देखील होऊ शकते.

6. त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. पपईमधील बीटा कॅरोटीन अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरते. म्हणूनच पपईच्या अतिसेवनामुळे त्वचेचे नुकसान होते.

टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page