लिंबू
- divipawar94
- May 16, 2021
- 4 min read

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लिंबू हे असतेच. लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबामधील सी- व्हिटॅमिन्समुळे अनेक रोगांचे निवारण होते. लिंबू फक्त आरोग्यासाठीच नाहीतर सौदर्य उपचारांवर देखील गुणकारी आहे. लिंबामधील अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अगदी प्राचीन काळापासून लिंबाचा वापर औषधाप्रमाणे करण्यात येत आहे. अशा या बहुगुणी लिंबाचे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा. लिंबू व्हिटॅमिन “सी”चा एक महत्वाचा स्त्रोत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, आपल्या शरीरावर दररोज ४० मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक असते.
लिंबाचे फायदे –
1) त्वचेवर लिंबाचा चांगला परिणाम होतो. नैसर्गिक Antiseptic गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते. कारण लिंबात मुळातच नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातील लाइटनिंग एजेंटमुळे त्चचेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे अनेक सौंदर्य उत्पादनात लिंबाचा वापर केला जातो. लिंबामुळे तुमची त्वचा उजळ तर होतेच शिवाय त्यामुळे सनबर्न सारख्या अनेक समस्या दूर होतात. लिंबात अँटी-एजिंग आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे लिंबाचा वापर पिंपल्स, ब्लॅकहेडस, चेहऱ्यावरील सुरकुत्या अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी करण्यात येतो.
2) वाटीमध्ये एका अंड्यांचा पांढरा भाग घ्या त्यात काही थेंब लिंबूरस मिसळा आणि हे मिश्रण एकजीव करा. चेहऱ्यावर हे मिश्रण लावून ते सुकल्यावर मास्कप्रमाणे काढून टाका. किंवा दह्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन चेहरा आणि मानेवर लावा. काही मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा चेहरा विनाकारण फार चोळू नका. या मिश्रणामुळे तुमचा चेहरा अगदी फ्रेश दिसू लागेल.
3) चेहऱ्यारील पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि त्वचा तेलकट असेल अशा अनेक समस्यांमध्ये बदाम तेलाचे काही थेंब आणि लिंबू रस समान प्रमाणात घ्या आणि एकत्र करा. या मिश्रणाला वीस मिनीटं कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. किंवा मुलतानी माती आणि लिंबू रस एकत्र करुन एक जाडसर पेस्ट तयार करा. हा फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल.
4) चेहरा चमकदार आणि हातपायांच्या कोपराची त्वचा मऊ करण्यासाठी त्यावर लिंबू रस लावा. या त्वचेवर वापरलेल्या लिंबाची साल चोळा. ज्यामुळे त्वचेवरील काळसरपणा कमी होईल.
5) दुधाच्या सायीमध्ये काही थेंह लिंबूरस आणि मध मिसळा. या मिश्रणाचा एक नैसर्गिक लिपबाम तयार करा. हा नैसर्गिक लिपबाम कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर लावल्याने तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतील.
6) लिंबाच्या सालींमध्ये मीठ आणि पेपरमिंट तेल मिसळून स्क्रब तयार करा. हा स्क्रब तुमच्या पायांना लावून मसाज करा. काही वेळाने पाय धुवून कोरडे करा. या उपायामुळे तुमचे पाय मऊ आणि चमकदार होतील.
7) अंडरआर्म्स काळे झाले असल्यास त्यावर लिंबूरस अगदी जादूप्रमाणे काम करू शकते. यासाठी दोन चमचे हळद, एक चमचा बेकींग सोडा, तीन चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची एक जाडसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट अंडरआर्म्सला लावून सुकल्यावर वीस मिनीटांनी तो भाग पाण्याने स्वच्छ करा. या उपायामुळे तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ तर होतील शिवाय त्यावरील नको असलेले केसदेखील कमी होतील.
अरोमाथेरपी व्यतिरिक्त पायाला देखील आराम मिळण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबू पिळून घ्या. इच्छित असल्यास आपण त्यात बेकिंग सोडा देखील घालू शकता. त्यात आपले पाय १० ते १५ मिनिटे भिजवा. तुम्हाला आराम मिळेल आणि तुमचे पाय मऊ होतील.
9) नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे यापुढे केसांना तेल लावताना नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि या तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. या तेलाच्या वापराने केस मजबूत कोंडा हळूहळू कमी होईल करते
10) केसांना मेहंदी लावताना मेंहदी पावडरमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबूरस मिसळा. किंवा एक मोठा चमचा लिंबूरस घ्या त्याच दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. या मिश्रणाला तुमच्या केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित लावा. चाळीस मिनीटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करा. यामुळे तुमचे केस गळणं कमी होईल शिवाय केसांची वाढदेखील चांगली होईल.
11) केसांमध्ये उवा झाल्यास तर लिंबू रस आणि आल्याचा रस केसांमध्ये लावा. एक तासांनी केस स्वच्छ धुवा. केस धुतल्यावर केसांमध्ये लिंबू रस आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन लावा. यामुळे डोक्यातील उवा कमी होतील.
12) आहारात घेतलेल्या लिंबाच्या रसामुळे तुमची पचनसस्था सुरळीत राहते. शिवाय लिंबाच्या रसामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. सहाजिकच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. नियमित लिंबूपाणी प्यायल्यास तुमचं शरीर सुडोैल होण्यास मदत होते.
13) वजन कमी करण्यासाठी दररोज १ ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून ते मिश्रण कमीत कमी दोन वेळा प्या. प्रत्येक एक तासाने एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे भूक कमी लागेल आणि तुम्ही कमी खाल. त्याचबरोबर त्यामुळे शरीराचे संतुलन राखले जाते आणि पचनतंत्र सुधारते. हवं असल्यास तुम्ही त्यात एक चमचा मध टाकू शकता. ज्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. सहा महिने सतत हे पाणी प्यायल्याने तुम्ही फीट आणि सुंदर दिसाल. शिवाय असे पाणी यकृतासाठी एक डिटॉक्स म्हणून उपयुक्त ठरते.
14) मधूमेहीनी लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे असतात. शिवाय यामुळे त्यांचे वजनही कमी होते. कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायट्रेड राहते, शरीर हायड्रेट राहील्याने दिवसभर निवांत वाटते व शरीराला ऊर्जा मिळते.
15) बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबू पाणी पिणे नेहमीच चांगले ठरेल. कारण नियमित लिंबूपाणी घेतल्यास हळूहळू ही समस्या कमी होते. पचनक्रिया सुधारण्याबरोबरच लिंबू पाण्यामुळे अॅसिडीटीही होत नाही. त्यामुळे पोट खराब असल्यास लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
16) लिंबू पाणी घेतल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. किडनी स्टोनच्या समस्येमध्ये स्टोन युरिन ब्लॉक करतात त्यामुळे युरिन पास होताना खूप त्रास होतो. अशावेळी लिंबूपाणी घेतल्याने बॉडी हायड्रेट होण्यास मदत होते. परिणामी या समस्येची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागते.
17) लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. लिंबाचा रस शरीराला हायड्रेट ठेवतं आणि मेटॅबॉलिझम पण वाढवतं. एका रिसर्चनुसार लिंबात असणारं पॉलिफिनोल अँटीऑक्सिडंट वजन प्रमाणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. पॉलीफिनोल एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करून एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतं. तर लिंबात असलेले अँटी ऑक्सिडंट मुक्त कणांमुळे सेल्स डॅमेज होण्यापासून वाचतात.
लिंबू खाण्याचे दुष्परिणाम (तोटे)
1) लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते, सायट्रिक ऍसिड दातांच्या अधिक संपर्कात आल्या असता, दात संवेदनशील बनतात.
2) आपल्याला ऍसिडिटी ची समस्या असल्यास, लिंबाचे सेवन थांबवा. कारण त्यामध्ये ऍसिड आहे.
3) लिंबाचा रस आणि दात वारंवार संपर्क आल्यास, दात च्या वरच्या पृष्ठभागाचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात मिसळा.
4) लिंबाच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होते.
5) काही लोकांना लिंबाची ऍलर्जी असते. या व्यतिरिक्त, त्यांना दम्याची लक्षणे देखील वाढवू शकतात.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar BAMS, MS (Gynaecology And Obstetrics) DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)] PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services) DDN (Diploma In Diet And Nutrition) MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments