top of page
Search

खजूर

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 30, 2021
  • 3 min read

वैज्ञानिक नाव: फिनिक्स डॅक्टिलीफेरा

(Phoenix dactylifera) इंग्रजी नाव: डेट्स (Date palm)


खजुरात असणारे औषधी घटक - प्रोटीन : २.० ग्रॅम, मॅंग्नेशियम : १४%, व्हिटॅमिन बी : १२ %, फॅट : ०. १ ग्रॅम, पोटॅशियम o:२०%, कार्बोहैड्रेट्स : ७५.०ग्रॅम, कॉपर : १८%, शुगर :०.० ग्रॅम, मॅग्नेशियम : १५%, फायबर :७.० ग्रॅम, आयरन:५%


खजूर खाण्याचे फायदे

1. आपले वजन वाढत नसेल . तुमची शरीराची रचना किरकोळ बारीक असेल तर वजन वाढवण्यासाठी खजूर तुमची मदत करतो. ह्यात व्हिटॅमिन आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपल्याला वजन वाढण्यासाठी मदत होते बारीक असणाऱ्या वक्तींनी रोज ४-५ खजूर खाण्यास सुरवात केली तर त्यांचं वजन वाढेल .


2. खजूरमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. यामध्ये कॅल्शियम, लोह, कॉपर , सेलेनियम, फॉस्फरस, पोटॅशियम , मॅग्नेशियम असल्याने आपल्या हाडांची चांगली वाढ होते. Vit D कमतरतेमुळे हाडे कमजोर, पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे होऊ लागतात. खारकेची पूड दुधासह खाण्यामुळें तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते


3. ज्या स्त्रियांना पाय दुखणे,कंबर दुखणे अश्या समस्या आहेत त्यांनी एक घरगुती उपाय म्हणून ५ खजूर अर्धा चमचा मेथी दोन ग्लास पाणी हे पाण्याची मात्रा अर्धी होईपर्यंत उकळावे. पाणी थोडे कोमट झाल्यावर ते पिऊन घ्यावे त्याने आपल्याला आराम भेटेल.


4. रात्री खारीक भिजवून ठेऊन दुसऱ्यादिवशी सकाळी खाल्यास ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधात उकळून घ्या थोड्यावेळाने दुध थंड झाल्यावर खारीक बारीक करून दूध पिऊन घ्या. हे दूध आपल्यासाठी पौष्टिक असते हयामुळे आपली भूक वाढते आणि अन्न आपल्याला सहज चांगले पचते.ज्यांना अपचनाचा त्रास आहे तसेच कफ चा त्रास आहे त्याना खजूर खाणे अत्यंत लाभदायी ठरेल .


5. खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. खजुरामुळे आपली रक्तदाबपातळी नियंत्रित राहते. खजूर मध्ये पोटॅशियम असल्यामुळे आपल्या मेंदूची गती व क्षमता वाढण्यास मदत होते. खजुरामध्ये व्हिटॅमिन असल्यामुळे मानवी मज्जासंस्थेचे आरोग्य व कार्यक्षमता वाढते.


6. सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.


7. लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा त्यांना तोंडात काहीतरी घालण्याची व काहीतरी चघळण्याची इच्छा होत असते. त्यावेळेस एक खारीक खजूर दोरीत गुंडाळून बाळाच्या मनगटाला बांधली तर लहान बाळाचं चघळणे हे अगदी पौष्टिक होऊन जाईल.


8. खजुरात कॅल्शियम, आयरन, Vitamin B, Vitamin B2, Vitamin A मुबलक प्रमाणात असल्यामुळे खजुरात असणारे हे व्हिटॅमिन्स आपली त्वचा चमकदार बनवतो व त्वचा गोरी दिसते. खजूर खाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाही. चमकदार ठेवण्यास मदत करतात.


9. खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खाल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.


10. खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे त्याचा लाभ गर्भाला होतो. गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यास मदत होते. गरोदरपणी खजूर खल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते.


11. ज्यांना गॅस ची समस्या आहे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी रोज रात्री ४-५ खजूर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी ते भिजवलेले खजूर चांगले बारीक करून त्याच पाण्यात टाकून ते पाणी प्यावे त्याने आपले पोट चांगले साफ होते.


12. ज्यांना पाय दुखण्याचा त्रास असतो किंवा गाठ येण्याचा त्यावर एक घरगुती उपाय म्हणून एक चमचा गायीच तूप, एक कप दुधासोबत एक चमचा खारीक पावडर मिक्स करुन गरम असताना प्यावे. त्यामुळे गाठ व पाय दुखण्याच्या त्रास कमी होण्यास मदत होईल.


13. खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहार खारका असतील तर कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page