बस्ति
- divipawar94
- Jun 23, 2021
- 2 min read

बस्ती हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. शरीरात गुदमार्गाने औषध प्रवेशित करण्याच्याक्रियेस बस्ती असे म्हणतात. बस्तीहा मूळ संस्कृत शब्दअसून त्याचा अर्थ मूत्राशयाची पिशवीअसा आहे. पूर्वी बोकडइत्यादी प्राण्यांच्या मूत्राशयाच्या पिशवीच्या साहाय्याने हे कर्म केलेजात असल्याने त्यास बस्ती हे नाव दिलेगेले. शरीरातील वात, पित्त वकफ ह्या तीन दोषांपैकीवातदोषाचे स्थान हे प्रामुख्याने मोठेआतडे ह्या अवयवात असते. बस्तिकर्मात गुदमार्गाने मोठ्या आतड्यामध्ये औषध पोहोचविले जाऊनवातदोषाचे शमन केले जाते. तसेच स्वत:च्या सामर्थ्यानेसर्व शरीरात पसरून इतर दोषांनाही खालीखेचून आणते व मोठ्याआतड्यात साचलेल्या मळासह शरीराबाहेर काढून टाकते. त्यामुळे बस्तीस अर्धी चिकित्सा असेही म्हटले जाते. बस्तिकर्मापूर्वी रूग्णाच्या पोट, कंबर, मांडीइत्यादी अवयवांना तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मर्दन केले जाते. नंतरवाफेने सर्व अवयवांना शेकदिला जातो. बस्ती देण्यासाठी रूग्णास डाव्या कुशीवर उजवा पाय पोटाशीघेऊन झोपवले जाते. त्यानंतर रूग्णाच्या गुदमार्गातून रबरी नळी तेलातबुडवून प्रवेशित केली जाते वत्याला औषधाने भरलेली सिरिंज (पिचकारी) किंवा पॉट जोडून बस्तीदिला जातो.
बस्तिकर्माचेप्रामुख्याने द्रव्य व स्थान यांनुसारतीन प्रकार पडतात.
(१) निरूह किंवा आस्थापनबस्ती :
यामध्येरोगानुसार विशिष्ट औषधांचा काढा वापरला जातो. त्यात आवश्यकतेनुसार मध, सैंधव मीठ, औषधी तूप, तेल इत्यादीमिसळले जाते. हा बस्ती साधारणत: एक लिटर मात्रेत अन्नाचेपूर्ण पचन झाल्यावर उपाशीपोटी दिला जातो. हाबस्ती साधारणत: एक तासात शरीराबाहेरपडावा अशी अपेक्षा असते.
(२) अनुवासन किंवास्नेहबस्ती :
यामध्ये तिळाचेतेल किंवाऔषधी तेलव तूपवापरले जाते. हा साधारणत: जेवणानंतर दिलाजातो. याचा एक प्रकारमात्राबस्ति आहे, ज्यात अल्पमात्रेत तेलाचा बस्तीरोज दिवसाभरात कधीही घेतलाजातो. हा बस्ती पूर्णदिवसभरही शरीरातराहू शकतो.
(३) उत्तरबस्ती :
हा बस्तीपुरूषांमध्ये मूत्रमार्गातून व स्त्रियांमध्ये योनिमार्गातून दिलाजातो. यासाठी औषधीतूप, तेल व काढेयांचा वापरकेला जातो. हा बस्तीशरीरात शोषलाजातो किंवाबाहेरही पडूशकतो. स्त्रियांमध्ये हाबस्ती देतानाधातूची किंवारबरी नळीवापरली जाते, तर पुरूषांमध्ये रबरी नळीवापरली जाते. ह्या नळीसऔषधाने भरलेलीसिरिंज जोडूनबस्ती दिलाजातो.
बस्तीच्यासंख्येवरून त्याचे खालील तीन प्रकार पडतात.
(१) योगबस्ती : यात तेल वकाढ्याचे आळीपाळीने ८ बस्ती दिलेजातात. त्यात पहिला व शेवटचा बस्तीतेलाचा दिला जातो.
(२) कालबस्ती : यात तेल वकाढ्याचे आळीपाळीने १५ बस्ती दिलेजातात. त्यात पहिला व शेवटचे ३बस्ती तेलाचे दिले जातात.
(३) कर्मबस्ती : यात तेल वकाढ्याचे आळीपाळीने ३० बस्ती दिलेजातात. त्यात पहिला व शेवटचे ५बस्ती तेलाचे दिले जातात.
संदर्भ :
अष्टांगहृदय — सूत्रस्थान, अध्याय १९ श्लोक १ – अरूणदत्तटीका.
चरकसंहिता — सिद्धिस्थान, अध्याय १ श्लोक ४०-४१, ४७-४८; अध्याय ३ श्लोक १७-१९.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments