वेलची
- divipawar94
- May 29, 2021
- 2 min read

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं.
वेलचीचे फायदे *
1. वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील. यात पोटॅशिअम आणि फायबर अधिक प्रमाणात असतं जे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे करतं.
2. वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.
3. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं.
4. हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.
5. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी.
6. तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.
7. जर आपल्याला पोटात बद्धकोष्ठतेची समस्या येत असेल, तर ती बर्याच गंभीर आजारांना देखील जन्म देते. म्हणून ही समस्या टाळण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करावेत. मात्र, आपल्यालाही अशी समस्या असल्यास, छोटी वेलची पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच हे आपल्या पाचन तंत्रास बळकट देखील करेल.
8. वेलची खाल्ल्याने तुमच्या तोंडाचा दुर्गंध देखील दूर होतो. वेलची एक प्रकारे माऊथ फ्रेशनर प्रमाणे कार्य करते. जर आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण नेहमीच तोंडात एखादी वेलची ठेवू शकता.
9. असं असलं तरीही वेलचीमुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते. अन्न पचण्यासाठी वेलची मदत करते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.
10.जर तुमचं पोट वाढलेलं असेल आणि पोटाचा हा घेर कमी करायचा असेल तर रोज रात्री 2 वेलची खाऊन गरम पाणी प्या. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन B1, B6 आणि व्हिटामिन C शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करतं. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शिअममुळे वजन कमी करण्यात मदत होते. वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.
11.रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाणे पुरुषांसाठी चांगलं असतं. यामुळे पुरुषांची नपुंसकता हळूहळू दूर होते. वेलची गरम पाणी किंवा दूधासोबत घ्या.
12.रोज वेलची खाल्ल्याने यूरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.
13.अनेकदा लोक भलतं सलतं खाऊन घेतात आणि त्यामुळे पोट खराब होतं. वेलचीमुळे या त्रासापासून सुटका मिळते.
14.रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात.
टीप - वरील कोणतेहीउपचार आयुर्वेद तज्ञांच्यासल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments