BRAIN TONIC
- divipawar94
- May 18, 2021
- 2 min read

मण्डूकपर्णाः स्वरसः प्रयोज्यः क्षीरेण यष्टीमधुकस्य चूर्णम् ।
रसो गुडूच्यास्तु समूलपुष्प्याः कल्कः प्रयोज्यः खलु शङ्खपुष्प्याः॥
आयुःप्रदान्यामयनाशनानि बलाग्निवर्णस्वरवर्धनानि।
मेध्यानि चैतानि रसायनानि मेध्या विशेषेण च शङ्खपुष्पी इति मेध्यरसायनानि ॥ (च.चि.१:३/३०)
आयुर्वेदाच्या अनुसार मानसिक तणावामुळे शरीरातील कफ, वात आणिपित्त या त्रिदोषांचेही संतुलनबिघडत आणि त्यामुळे निरनिराळेआजार उद्भवू लागतात. त्यामुळे हे दोष संतुलित ठेवण्याच्या उद्देशाने आणि त्याचबरोबर मानसिक तणाव कमी करीत मेंदूचेआरोग्य चांगले ठेवण्याच्या उद्देशाने आयुर्वेदामध्ये काही औषधींचा वापरसुचविण्यात आला आहे. यासर्व औषधी सहज उपलब्धअसून, यांचा वापर करण्याच्या पद्धतीहीअतिशय सोप्या आहेत. मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी, मेंदू सजग ठेवण्यासाठी, थकवानाहीसा करण्यासाठी, निद्रानाश नाहीसा करण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी शंखपुष्पी अतिशय उत्तम समजली जाते. ही औषधी शीतलता प्रदान करणारी असून, एक दुधासोबत एकचमचा शंखपुष्पी, दिवसातून दोन वेळा घेतल्यानेउत्तम गुण येतो. ब्राह्मी हे देखील उत्तम ब्रेन टॉनिक असून, याची पावडर किंवापेस्ट दुधाबरोबर सेवन करता येते. ब्राह्मीचा ताजा पाला ठेचूनत्याचा रस काढून दिवसातूनदोन चमचे हा रससेवन करावा. सर्व वयाच्या लोकांसाठीब्राह्मी उपयुक्त असून, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ब्राह्मी अतिशय लाभकारी आहे. ब्राह्मीचे चूर्ण शतावरी, आणि अश्वगंधा चूर्णांच्या सोबत घेतल्याने वारंवार उद्भवणारा पित्ताचा विकार शमतो. मेंदूला शांत करणारी हीऔषधी आहे. पित्तामुळे डोकेदुखीहोत असल्यासही ही औषधी उपयुक्तआहे. शतावरी ही औषधी शरीर आणि मेंदूला ताकद देणारी आहे. तसेच ही औषधी बुद्धिवर्धकआहे. शतावरी चूर्ण दररोज एका लहान चमचा भरून दुधाबरोबर किंवा मधाबरोबर घेतल्याने मानसिक तणाव, थकवा कमी होण्यासमदत होते. तसेच दृष्टीदोष सुधारण्यासाठी देखील ही औषधी उपयुक्तआहे. अश्वगंधाही औषधी मानसिक तणावकमी करणारी, आणि मेंदूला उत्तम आरोग्य देणारी औषधी म्हणून फार प्राचीन काळापासून उपयोगात आणली जात आहे. अश्वगंधाची मुळे औषधी म्हणूनवापरली जात असून, शारीरिक अशक्तपणा, वंध्यत्व, आणि तत्सम विकारांवरही औषधी उपयुक्त आहे. मात्र या औषधीचे सेवनइतर औषधींच्या सोबत करणे टाळावे. तसेच या औषधीच्या अतिसेवनाने उलट्या, जुलाब, पोट दुखणे, पोट बिघडणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी या औषधीचे सेवनकरणे टाळावे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments