PCOS (Poly Cystic Ovarian Syndrome)
- divipawar94
- May 13, 2021
- 6 min read

आजचा विषय आहे PCOS. आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. देशभरातील सुमारे 10 टक्के महिला या PCOS ने ग्रस्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यापैकी सुमारे 50 टक्के महिलांना आपल्याला PCOS झालाय, याची कल्पनाच नाहीय. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून PCOS ही समस्यादेखील मोठ्याप्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे. बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण PCOS असे सांगण्यात येते. एकदा माझ्याकडे नेहमी येणाऱ्या पेशंट, त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीला घेऊन आल्या. नेहमी हसत मुख, बडबडी असणारी ति त्या दिवशी मात्र अगदीच उदास दिसत होती, खांदे उतरलेले होते. विचारलं तर तिची आई सांगू लागली, 'अहो काय झालंय हिला बघा ना, कॉलेजमध्ये जायचं नाही म्हणते, सतत चिडचिड करते. जरा काही बोललं की रडायला लागते. पाळीसुद्धा अनियमित झाली आहे तिची. मुलीला विचारलं तर तिला रडूच कोसळलं. रडत रडत सांगायला लागली. 'मॅडम बघा ना माझं वजन वाढत चाललंय. चेहऱ्यावर अचानक पिम्पल्स येऊ लागलेत, केसदेखील उगवताहेत. मला मित्र-मैत्रिणी हसतात. कोणाशीही बोलायला गेलं तर माझ्या हनुवटीवर वाढणाऱ्या केसांकडेच बघतात,असं मला वाटतं. कुठेही जावंस वाटत नाही. मला माझीच खूप लाज वाटते. पूर्ण परीक्षणा शेवटी तिचे PCOS हे निदान झाले. औषध, आहार, विहार आणि योग कॉउंसेल्लिंग ने ति आता हॅप्पी आहे.
सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. नुकतेच एक ३२ वर्षीय जोडपे मूल होत नसल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता आले होते. तीन वर्ष प्रयत्न करूनही मुल होत नसल्याने हे जोडपे चिंताग्रस्त झाले होते. चाचणी नंतर असे लक्षात आले की ही महिला पीसीओएस सारख्या आजाराने ग्रस्त होती आणि त्यामुळेच नैसर्गीकरित्या गर्भधारणा होत नसल्याचेही समजले. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. काय आहे हे PCOS? का इतका हा व्याधी Common झालाय. यासाठीच PCOS बाबत काही Basic आणि महत्वाच्या गोष्टी प्रत्येक स्रीला माहित असणं गरजेचं आहे.
PCOS सर्वप्रथम सर Irving Stein, आणि Michael Leventhal यांनी १९३५ साली सांगितला आहे. त्यामुळे त्याला Stein–Leventhal syndrome असेही म्हणलं जातं. PCOS म्हणजे Poly Cystic Ovarian Syndrome. Syndrome या शब्दाचा अर्थ एकापेक्षा जास्त लक्षणं एकत्रित असणं असा आहे. यात असतं काय की दर महिन्याला स्त्रिला मासिक पाळी येते आणि दर महिन्याला नवीन स्त्रीबीज तयार होते. त्याचवेळी गर्भपिशवीच्या आतला थर वाढत असतो आणि ज्यांच्यातNormal मासिक पाळी आहे त्यांच्यात साधारणत: १४ व्या दिवशी स्रीबीज हे मोठ्या स्रीबीजातून फ़ुटुन छोटे बीज बाहेर येते. आणि २ - ३ दिवस गर्भनलिकांमध्ये थांबते. जर त्यावेळी त्याला शुक्राणु येऊन मिळाले तर गर्भाधान होते किंवा तसे नाही झाल्यास म्हणजे ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो आणि बीज विरघळून जाते. मग तिथून पुढे १४ दिवसांनी पाळी येते अस आपलं साधारणत: पाळीचं Equation असतं. पण जेव्हा PCOS होतो तेव्हा हे Equation बिघडत म्हणजे नेमक काय होतं तर स्रीबीज तयार होणे, गर्भपिशवीच्या आतला थर तयार होणे, स्रीबीज वेळेवर फ़ुटणे हे सगळं नीट होत नाही. हे सगळं खरं तर शरीराच्या Hormones वर अवलंबून असतं. Hormonesआपल्या शरीरात अस्णार्या वेगवेगळ्या ग्रंथींमधून स्रवले जातात जे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. आपल्या मेंदूमध्ये Hypothalamus नावाचा एक भाग असतो. त्यामधून Gonadotrophin Releasing Hormones (Gnrh) निघतात मग ते Pituitary Gland म्हणजे पियुषिका नावाच्या ग्रंथीवर काम करतात. जेणेकरून ग्रंथीमधून काही Hormonesनिघतात जे Ovaries म्हणजे अंडाशयावर काम करतात आणि अंडाशयातून काही निघून गर्भाशयावर काम करतात. ही एक साखळी तयार होते जिला आमच्या भाषेत Hypothalamic-Pituitary-Ovarian Axis असे म्हणतात.
Normal Ovulation होतं तेव्हा काय होत तर बीजांड वाढून त्यातून Normal बीज बाहेर पडतं. आता PCOS मध्ये काय होतं की बीज पुढे जातं पण फ़ूटत नाही. तेव्हा ते पाण्याची गाठ म्हणून साठून राहते. अश्या अनेक पाण्याच्या गाठी तयार होतात. याला गाठींची माळ तयार होते असेही म्हणता येईल. तेव्हा अनेक म्हणजे Poly आणि गाठी म्हणजे Cysts आणि कुठे साठल्या तर बीजांडकोशात म्हणजे Ovaries मध्ये म्हणून त्याला Polycystic Ovaries असे म्हणतात. त्याच्यामुळे Ovulation नीट होत नाही याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. तेव्हा त्याला Poly Cystic Ovarian Syndromeअसे म्हणले जाते. आता Basically होतं काय तर Chronic Anovulation म्हणजे सातत्याने बीजनिर्मिती न होणे अस झाल्याने बीजांडकोशात या गाठी साठतात आणि त्यामुळे बीज तयार होतांना जो Oestrogen नावाचा Hormone ब्॒नत असतो तो योग्यरित्या कार्य करत नाही. Excess व्हायला लागतो आणि अस झाल्यानेProgesterone नावाचा Hormone येतच नाही व तो कमी पडल्याने गर्भधारणा झालेल्या महिलांना गर्भ न टिकणे आणि Oestrogen वाढल्याने Ovulation च नीट होत नाही अशा वेळेस Pregnancy राहत नाही आणि मग गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते. Oestrogen वाढल्याने स्थौल्य वाढते. त्वचा काळवंडते. पिंपल्स येतात. बीज निर्माण झालं नाही म्हणून मासीक पाळी अनियमित होते. जेव्हा वजन वाढते तेव्हा होतं काय कि Serum Insulin नावाचा घटक साखर पचवण्याचे काम आपल्या शरीरात करत असतो. आणि Insulin Resist झाला म्हणजे अडवून ठेवला तर मध्ये जे Hormonal Imbalance होते त्यात Insulin हा Resist म्हणजेच अडवला जातो. जेवणातील साखर निटरित्या पचवत नाही. साखर पचली नाही तर Calories मध्ये Convert होणार नाही आणि Calories मध्ये Convert नाही झाली तर Energy मिळणार नाही आणि जी साखर शरीरात येते ती साठत राहते आणि इतकी साठते की त्यामुळे सतत वजन वाढत जाते की मुली वा महीला सांगतात की डॉक्टर महिन्याला १ -२ किलो वजन वाढत आहे. मग आता पुढे होतं काय हा Insulin जो होता त्याला साखर पचवायचे काम करू दिले नाही तेव्हा तो जातो Female Androgens कडे म्हणजे स्त्रीत्वाचे जे Hormones असतात त्यांना दाबायचा प्रयत्न करतो आणि जे पुरूषत्वाचे Hormones असतात त्यांना वर आणतो. म्हणजे Male Androgen Level वाढवते अशावेळेस स्त्रीचे स्त्रीत्व कमी होते आणि केस गळणे, म्हणजे टक्कल पडणे, अनावश्यक केस शरीरावर येणे, शरीरात जडपणा आणि जाडपणा येतो. चिंता-नैराश्य-चिडचिड वाढते.
PCOS ची इतर सामान्य लक्षणे आहेत ती म्हणजे,
1. वंधत्व
2. Acanthosis nigricans म्हणजेत्वचा काळवंडते
3. मुरूम/पुरळ.
4. लठ्ठपणा, पोटावर चरबी जमा होणे.
5. Hirsutism म्हणजेच चेहऱ्यावरआणि शरीरावर जास्तीचे केस उगवणे
6. Amenorrhoea म्हणजेच पाळी नयेणे.
7. Dysmenorrhoea म्हणजेच पाळीमध्ये त्रास/वेदना होणे.
8. अनियमित मासिक पाळी.
9. कंबरेमध्ये वेदना होणे.
10.गर्भ राहण्यास कठीण जाणे.
11.Peripheral Insulin Resistance.
12.मेटाबोलिक सिन्ड्रोम, किंवा मधुमेह
PCOS समस्येची कारणे (Causes Of Pcod)
PCOSची लक्षणे समजून घेतल्यावर PCOS या समस्येमागची कारणे जाणून घ्यावीत ज्यामुळे भविष्यात ही समस्या टाळता येऊ शकते.
जसे चुकीची जीवनशैली (Unhealthy Lifestyle)
आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण - तणाव, कौटुंबिक समस्या,दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता असते. यामुळे PCOS या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
चुकीचा आहार (Poor Diet)
आजकाल कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा देखील शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. ज्यामुळे हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि PCOS सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
अनुवंशिकता (Heredity)
जर तुमच्या आई अथवा बहिणीला PCOS ची समस्या असेल तर तुम्हालाही PCOS ची समस्या निर्माण होऊ शकते. PCOS ही एक अनुवंशिक समस्या देखिल आहे.
व्यायामाची कमतरता (Lack Of Exercise)
आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायामाची शरीराला फार आवशक्ता असते. मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला PCOS चा सामना करावा लागू शकतो.
PCOS समस्येसाठी कोणती वैद्यकीय चाचणी करावी
PCOS तपासणीसाठी सोनोग्राफी केली जाते. पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी करण्यात येणारी प्राथमिक वैद्यकीय चाचणी आहे. सोनोग्राफीमधून डॉक्टरांना तुमच्या स्त्रीबीजाची वाढ समजू शकते. जर PCOSची समस्या असेल तर त्याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीजाच्या वाढीवरदेखील होते. त्यामुळे PCOSची तपासणी करताना डॉक्टर सर्वात आधी रुग्णाची सोनोग्राफी करतात. तसेच काही हॉर्मोन्स टेस्ट करून तुम्हालाPCOSची समस्या आहे का हे समजू शकते. यासाठी प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये थायरॉईड फंक्शन टेस्ट; Follicle Stimulating Hormone, Luteinizing Hormone, Prolactin, Testosterone पातळी आणि शरीरातील शुगरची पातळी तपासणे यांचा समावेश होतो अशा काही हॉर्मोन्स टेस्ट डॉक्टर करण्याचा सल्ला देत असतात.
PCOS समस्येसाठी Treatment
PCOS ची Treatment करताना हा वयाच्या १२ पासून ते ३५ पर्यंत असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. जसं सांगितल्याप्रमाणे हा कुठल्या वयात येतो. त्याप्रमाणे त्यावर उपाययोजना आहे. PCOS चे उपाय वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक स्त्रीच्या लक्षणाप्रमाणे हा उपाय ठरवला जातो. उदा. समजा स्त्रीला PCOS असेल आणि मूल होत नसेल तर उपाय वेगळा असू शकतो. किंवा तरुण मुलगी आहे तिला PCOS आहे. तिची लक्षणं फक्त पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणा असेल तर उपाय वेगळा असतो.
आता यावर सामान्य उपाय काय आहेत तर ते म्हणजे नियमित व्यायाम करणे जसे की रोज १- २ तास चालणे, Jogging करणे, किमान १२ सुर्यनमस्कार घालणे, पद्मसाधना, भुजंगासन, सुप्तबद्धकोनासन, अनुलोमविलोम प्राणायम. करणे. याबरोबर आहारात बदल करायला हवा जसे मेदयुक्त पदार्थ खाणे टाळा. तळलेले पदार्थ कमी करा. जागरणे टाळा. कामानिमित्त जागरणे करावी लागलीच, तर चहा-कॉफीऐवजी सब्जा, पुदिनायुक्त भरपूर पाणी प्या. जंकफूडऐवजी ताजे सॅलड किंवा फ्रुट डिश खा. दिवसातून किमान २ लिटर पाणी प्या. यामुळे कमी करण्यास मदत होते. Metabolism सुधारते. शरिरातील Toxins बाहेर पडतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. PCOS ची लक्षणॆ दिसल्यास Doctor कडे जा त्यांचा सल्ला घ्या Hormonal Imbalance जो झालेला असतो तो संप्रेरकच्या गोळ्या या औषधांनी निट केला जातो ति व्यवस्थित घ्या. जर PCOS चे प्रमाण जास्त असेल तर दुर्बिणीद्वारे अंडकोषातील पाणी काढणं म्हणजेLaparoscopic Ovarian Drilling सुचवली जाते. PCOS चे वेळीच निदान केले नाही किंवा न घेतल्यास उच्च रक्तदाब, वंध्यत्व, मधुमेह, गर्भाशयाचा कर्करोग, अंडाशय कायमचं निकामी सारखे होऊ शकतात.
पीसीओडीची समस्या असल्यास वाढलेले वजन आणि अनियमित मासिक पाळीमुळे तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात. यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वीच पीसीओडीवर उपचार करणे गरजेचे आहे. वजन कमी करून आणि Ovulation ला चालना देणारे उपचार करून तुम्ही गरोदर राहू शकता. अशा उपचारांमध्ये डॉक्टर तुम्हाला काही औषधे आणि Ultrasound परिक्षणाद्वारे Ovulation कधी होणार याचा अंदाज देतात. मग तुम्हाला गर्भधारणा होणे शक्य असते. Fertility progress वर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या वंधत्वावर मात करू शकता. शिवाय जर तुम्ही पस्तिशीच्या पुढील वयाच्या असाल तर Intrauterine insemination IUI म्हणजे कृत्रिम बिजारोपण आणि In Vitro Fertilization IVF म्हणजे कृत्रिम गर्भधारणा उपचार घेऊन तुम्ही नक्कीच आई होऊ शकता. पीसीओडी समस्या ही आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करून आणि पोषक आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमच्या या समस्येवर उपचार करू शकता. And at last I would like to say, you all are beautiful inside and out stay strong because you are worth it.
अधिक माहितीसाठी तुम्ही माझा Video नक्की पाहावा.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher)
[योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments