top of page
Search

Vitamin A

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 6, 2021
  • 2 min read


Vitamin A चा शोध १९३१ मध्ये लागला. हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असा घटक आहे. हे अ जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते. या जीवनसत्वामुळे मुळे शरीरातील. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. तसेच फुफुस सारख्या होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण राहू शकते. अ जीवनसत्व मुळे चेहऱ्यावर काळे डाग व सुरकुत्या लवकर येत नाही तसेच चेहरा चमकतो. Vitamin A ला रेटिनॉल ह्या शास्रीय नावाने देखील ओळखतात.


शास्रीय नाव : रेटिनॉल

Scientific Name : Retinol


Vitamin A युक्त फळे व भाज्या

दूध,पनीर , दही मलाई, केळी , नारंगी, गाजर,काकडी, बिट ,चिकू, टमाटर, पालक , पत्ताकोबी , निंबू , मच्छी , बाजरी, नाशपती , अंडी ,अंडयांमधील पिवळा बलक, बकऱ्याची कलेजी, हिरवी मेथी, पिकलेला आंबा, काशीफळ, डेयरी प्रॉडक्ट्स.


शरीराला दरदिवशी लागणारा डोस

जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना - १३३३ Iu किंवा ४०० मिलिग्रॅम

६ ते १२ महिन्यांच्या बाळांना - १६६६ Iu किंवा ५०० मिलिग्रॅम

१ ते ३ वर्षाच्या मुलांना - १००० Iu किंवा ४०० मिलिग्रॅम

४ ते ८ वर्षाच्या मुलांना - १३३३ Iu किंवा ४०० मिलिग्रॅम

९ ते १३ वर्षाच्या मुलांना - ३००० Iu किंवा ९०० मिलिग्रॅम

१४ ते ३० वर्षाच्या स्त्रियांना - २३३३ Iu किंवा ७०० मिलिग्रॅम

• 1 Iu = International Unit = 0.3 Microgram Retinol Equivalent

• १ आइ यू = अंतरराष्ट्रीय युनिट = ०.३ मिलिग्रॅम रेटिनॉल च्या बरोबर


फायदे

१. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

२. आपल्या डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते.

३. Vitamin A मुळे आपली हाडे मजबूत राहतात.

४. हृदय आणि ह्यदयासम्बंधित जे रोग होतात ते आणि अस्थमा व मधुमेह सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

५. दात व हिरड्यां पासून होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवते.

६. आपली त्वचा चांगली व स्वस्थ राहते .


Vitamin A अभावामुळे होणारे रोग व समस्या

१. Vitamin A च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा मंद प्रकाशात कमी दिसू लागते.

२. दात व दातांच्या हिरड्या कमजोर पडू लागतात.

३. आपल्या हात पायांची नख सहज तुटणे.

४. क्षयरोग (टी .बी) सारखा आजार होऊ शकतो.

५. शरीरातील अ जीवनसत्व कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ लागणे .

६. गॅस समस्या होऊ शकते .

७. सर्दी किंवा खोकला वारंवार होणे.

८. केस गळण्याचे प्रमाण वाढते.

९. Vitamin A कमतरतेमुळे भूक कमी लागते.



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page