Vitamin B2
- divipawar94
- Jun 3, 2021
- 2 min read
Vitamin B2
बी 2 जीवनसत्व म्हणजे काय
Vitamin B2 शोध डी .टी . स्मिथ आणि ई .जी हेन्ड्रिक ह्या दोन शास्त्रज्ञानी १९२६ मध्ये लावला. हे पिवळ्या रंगाचे असते. व हे जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बी २ जीवनसत्व महत्वपूर्ण कार्य करते. बी २ जीवनसत्व प्रत्येक स्वस्थ व्यक्तीस दरदिवशी ३ मिलिग्रॅम आणि एका रोगी व्यक्तीस प्रत्येक दिवशी ५० मिलिग्रॅम ची आवशक्यता लागते.
शास्त्रीय नाव : रायबोफ्लेवीन
Scientific Name : Riboflavin
Vitamin B2 फळे व भाज्या –
फळं : बदाम, पिस्ते, संत्री, पेरू, पीच, पेर, अननस, पून्झ, किसमिस, राजगिरा, स्ट्रॉबेरी, ब्राझील नट्स, शिंगाडा, हॅझल नट, शेंगदाणे, आक्रोड.
पेयं आणि सरबतं: जलजन्य वनस्पती, मोड आलेले मूग, कोबी, टोमॅटो, शतावरी, गाजर आणि गाजराची पानं, ब्रोकोली (परदेशी भाजी) फूल कोबी, काकवी, सोयाबीनचं दूध,
सूप आणि भाज्या: कांदा, कोबी, बटाटा, टोमॅटो, लेट्यूस (चायनीज भाजी), अळंबी (मशरूम), पालक, कमलकंद, ढोबळी मिरची, बीट आणि बिटाची पानं,
कोशिंबिरी: कांदा, कोबी, टोमॅटो, नारळ, लेटएस, सेलरी (चायनीज भाज्या), काकडी, मुळा.
चटण्या आणि लोणची: तिळाची चटणी, नारळ, सूर्यफूल, कच्च्या टोमॅटोची चटणी.
तेल : गहूबीज, सूर्यफूल, तीळ, तांदळाची फोलपटं.
कच्चे किंवा शिजवून खाता येण्याजोगे पदार्थ : मटार, बटाटा, शिजवलेले डाळीचे प्रकार, फोलपटांसह धान्यं, बाजरी, बार्ली, सोयाबीन, ज्वारी, मका, ओट्स, तांदूळ, हिरवे मूग, उडीद, नाचणी, मसूर, भोपळा, पोहे, कुरमुरे, कांदा, मूगदाळ, वाटाणे.
शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार:
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना – ०.३ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना – ०.९ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना – १.३ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना – १.० मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना – १.३ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना – १.३ मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना – १. ४ मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना – १. ६ मिलिग्रॅम
Vitamin B2 कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या –
१.होठ फाटू लागतात.
२.पचनशक्ती कमजोर होऊ लागते .
३.डोळ्यात जळजळ होऊन डोळे लाल होणे.
४.डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊन लागते
५. डोळ्यांना सूज येणे.
६.स्मरणशक्ती कमी होणे .
७ Vitamin B2 कमतरतेमुळे जिभ सुजू लागते.
८.चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम, चेहऱ्यावरची चमक निघून जाणे .
९.स्त्रियांच्या योनी मध्ये इन्फेकशन होते.
१०.त्वचा फाटणे.
११. तोंड येणे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments