VITAMIN B5
- divipawar94
- Jun 5, 2021
- 2 min read
Vitamin B5 चा शोध रॉजर जे विलियम्स ह्या शास्त्रज्ञाने १९३३ मध्ये लावला . पैंटोथैनिक हा शब्द ग्रीक भाषेतील पैंटाऊ ह्या शब्दातून घेतला आहे. ह्यचा अर्थ असा होतो कि प्रत्येक ठिकाणी असणारा म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये Vitamin B5 थोड्याफार प्रमाणात असते. आपल्या शरीराचे कार्य चांगले चालू राहण्यासाठी या जीवनसत्वाचा फायदा भरपूर होतो. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती(Immunity power) वाढवण्यास मदत करतात. बी ५ जीवनसत्व हे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम चे कार्य चांगले चालू राहण्यासाठी देखील मदत करतात. बी ५ जीवनसत्व मुळे आपली त्वचा, केस, डोळे यांचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
शास्त्रीय नाव : पैंटोथैनिक ऍसिड Scientific name : Pantothenic acid
VITAMIN B5 युक्त फळे व भाज्या :
अंडी, चिकन, टमाटर, वाटणे, बटाटे, दूध, दुधापासून तयार झालेले पदार्थ, ब्रोकली, सोयाबीन, मसूर ची डाळ, काजू,
शरीराला दररोज लागणारा डोस
· जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना – ०.२ मिलिग्रॅम
· ९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना – ०.९ मिलिग्रॅम
· १४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना – १६मिलिग्रॅम
· १४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना – १४ मिलिग्रॅम
· १९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना – १६ मिलिग्रॅम
· १९ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना – १४ मिलिग्रॅम
· गरोदर स्रीयांना – १८ मिलिग्रॅम
· स्तनपान करणाऱ्या महिलांना – १७ मिलिग्रॅम
VITAMIN B5 -फायदे:
1. शरीरातील हार्मोन्स चा स्तर नियंत्रित राहतो
2. मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
3. बी ५ जीवनसत्व आपले मूड संबंधीत हार्मोन्स चांगले ठेवण्यास मदत करतात.व मन शांत राहते.
4. हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.
5. Vitamin B5 मुळे शरीरातले मेटाबॉलिज्म चे कार्य चांगले चालू राहते.
6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
7. बी ५ जीवनसत्व शरीरातले हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
8. त्वचा आणि केसांचे स्वास्थ्य चांगले राहते. चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत करते.
9. जखम लवकर भरते व त्यातील रक्तस्त्राव कमी होतो.
VITAMIN B5 जीवनसत्व अभावी होणाऱ्या समस्या :
1) Vitamin B5 च्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा जाणवणे.
2) भूक कमी लागणे.
3) गॅस चा प्रॉब्लेम होणे.
4) चक्कर येणे.
5) उलट्या होणे.
6) झोप खराब होणे (अनिद्रा)
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments