Vitamin B6
- divipawar94
- Jun 5, 2021
- 2 min read
Vitamin B6 शोध पॉल जॉर्जे ह्या शास्त्रज्ञाने १९३४ मध्ये लावला .ह्या जीवनसत्वाला पायरॉडॉक्सिन ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. Vitamin B6 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. प्रथिने, चरबी, कार्बोहैड्रेट,चयापचय व शरीरातील लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे. आपले शरीर हे Vitamin B6 तयार करू शकत नाही त्यामुळे ते आपल्याला अन्न व पूरक अशा आहारातून घेतले पाहिजे.
शास्त्रीय नाव : पायरॉडॉक्सिन Scientific Name : Pyridoxine
Vitamin B6 फळे व भाज्या
तांदूळ, हिरवे वाटणे, गहू, फिश, अंडी, अंड्यातील पिवळा बलक, सोयाबीन, बटाटे, टमाटर, चणे, पपई, मोसंबी,ओट्स, अक्रोड, एवेकोडा, सोया मिल्क
शरीराला दररोज लागणारा डोस
जन्मापासून ते ६ महिन्यापर्यंतच्या बाळाला – ०. १ मिलिग्रॅम
७ ते १ वर्षापर्यंत बाळाला – ०. ३ मिलिग्रॅम
१ ते ३ वर्षापर्यंत मुलांना – ०. ५ मिलिग्रॅम
४ ते ८ वर्षापर्यंत मुलांना – ०. ६ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंत च्या मुलांना – ०. १ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंत च्या मुलांना – १. ३ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंत च्या मुलीना – १. २ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षपर्यंतच्या पुरुष आणि स्त्रियांसाठी – १. ३ मिलिग्रॅम
५१ वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुषांसाठी – १. ७ मिलिग्रॅम
५१ वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांसाठी – १. ५ मिलिग्रॅम
गरोदर स्त्रियांसाठी – १.९ मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी – २ मिलिग्रॅम
Vitamin B6 कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या
१.रक्ताची कमतरता त्यालाच ऍनिमिया असे म्हणतात. २.कमतरतेमुळे गरोदरपणात उलट्या होणे किंवा मन घाबरल्यासारखे होणे. ३.शरीरातील स्नायू कमजोर पडणे. ४.डोक फक्त एका बाजुने दुखणे. ५.पोटात दुखणे. ६.झोप न लागणे. ७.किडनी स्टोन. ८. शरीरातील हाडे दुखू लागणे. ९. Vitamin B6 कमतरतेमुळे शरीरावर लाल डाग येतात. १०. खरूज, नायटा, गजकर्ण सारख्या समस्या होऊ शकतात.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments