VITAMIN B9
- divipawar94
- Jun 5, 2021
- 2 min read
VITAMIN B9
Vitamin B9 शोध लूसी विल्स या शास्त्रज्ञाने १९३३ मध्ये लावला. बी समूहातील सर्व जीवनसत्वाप्रमाणेबी९जीवनसत्वपाण्यातसहजविरघळते. बी ९ जीवनसत्वाला फॉलिक ऍसिड किंवा फोलेट या नावाने देखील ओळखले जाते. ह्या जीवनसत्वाचे प्रमुख कार्य आपल्याला ऊर्जा मिळवून देणे आहे. आपल्या शरीरात असणाऱ्या कार्बोहैड्रेट चे रूपांतर ग्लुकोज मध्ये करते. B9 जीवनसत्व मज्जासंस्था सुरळीत चालण्यास मदत करते त्याचप्रमाणे हे आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. B9 जीवनसत्व हे एक पोषकतत्व आहे. हे जीवनसत्व आपल्या शरीरातील प्रोटीन व अनुवांशिक पोषणतत्वांचे संश्लेषण करण्यासाठी वापरले जाते.फॉलिक ऍसिड हे आपल्या शरीरातील पेशीमध्ये वाढ होण्यास महत्वाची भूमिका निभावतात. अस्थिमज्जा आणि नुरॉन्स सारख्या पेशीमध्ये वाढ होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांसाठी Vitamin B9 हे अत्यंत फायदेशीर आहे. गर्भ धारण करण्याच्या एक वर्ष अगोदरपासूनच स्त्रियांना बी ९ जीवनसत्वाचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते. फॉलिक ऍसिड हे गर्भाशयाच्या विकासासाठी तसेच जन्माला आलेल्या नवीन बाळाच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे.
शास्त्रीय नाव : फॉलिक ऍसिड किंवा फोलेट Scientific Name : Folic Acid Or Folate
VITAMIN B9 फळे व भाज्या
अंडी, वाटणे (बीन्स), मशरुम, चिकन, ओट्स , टमाटरज्युस, मुंग, मटकी, आवळा, फिश
शरीराला दररोज लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना – ०.४ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना – १.८ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना – २.४मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना – २.४ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना – २.४ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना – २.४ मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना – २.६ मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना – २.८ मिलिग्रॅम
VITAMIN B9 कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या
१.होठ फाटणे. २.लवकर थकवा लागणे. ३.भूक कमी लागणे. ४.मन घाबरणे. ५.वनज कमी होणे. मन चलबिचल होणे ६.तोंड येणे. ७.गर्भशयाचा कॅन्सर B9 जीवनसत्व कमतरतेमुळे ८.हाड कमजोर होणे. ९.ऍनेमिया रोग -रक्ताची कमतरता १०.Vitamin B9 कमतरतेमुळे बीपी वाढणे.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments