top of page
Search

Vitamin C

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 6, 2021
  • 2 min read

Vitamin C हे एक अँटिऑक्सिडेन्ट आहे. या जीवनसत्वाला ऍस्कॉर्बिक ऍसिड ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी व आपल्या शरीरातील कार्य चांगले चालू राहण्यासाठी क जीवनसत्व खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीरातील पेशींना स्वस्थ ठेवण्यास मदत करतात Vitamin C तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकार (Immunity Power) शक्तीचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ऍस्कॉर्बिक ऍसिड हे असे एक घटक हे जे काही प्राणी हे स्वतःचे स्वतः बनवू शकतात. परंतु माणसांना Vitamin C हे अन्न , पूरक आहार व फळे असे इत्यादी स्रोतांकडून मिळवणे आवशयक आहे.


शास्त्रीय नाव :ऍस्कॉर्बिक ऍसिड Scientific Name : Ascorbic Acid


Vitamin C मुख्य स्रोत

संत्री ,मोसंबी,पपई , स्ट्रॉबेरी, टमाटर, लिंबू ,केळी, आवळा , पालक, डाळ ,अंगूर, किवी, अननस, लाल आणि हिरवी शिमला मिर्च, वांगी, ब्रोकोली, मनुका, दूध, बिट


Vitamin C दरदिवशी लागणारा डोस

पुरुषांना – ९० मिलिग्रॅम

स्रीयांना – ७५ मिलिग्रॅम

गरोदर स्त्रियांना – ८५ मिलिग्रॅम

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना – १२० मिलिग्रॅम


Vitamin C फायदे

ज्या लोकांना दमा आहे.अश्या लोकांच्या शरीरात Vitamin C ची कमतरता असते. ज्यांना दम्याचा विकार आहे त्यांनी क जीवनसत्व युक्त पूरक आहार, फळे घेतल्यास दम्याचा आजार होण्याची शक्यता कमी होते. व त्यावर नियंत्रण ठेवता येते. Vitamin C सेवन नियमितपणे केल्यास कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहतो. Vitamin C पूरक आहार, फळ, हिरव्या पालेभाज्या या पदार्थांचे नियमित सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या कर्करोगांवर नियंत्रण ठेवता येते. जसे की, मूत्राशयाचा कर्करोग, कोलन कर्करोग, गुदाशयाचा कर्करोग इत्यादी. त्वचेसाठी फायदेशीर आहे Vitamin C नियंत्रित सेवनाने त्वचा चांगली राहते चेहऱ्यावर काळे डाग पडत नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ लागतात. चेहऱ्यावरील ग्लो देखील वाढतो व त्वचाही चमकदार होते. आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यास देखील फायदेशीर आहे Vitamin C. अस्कोर्बीक ऍसिड मुळे आपली त्वचा आपले लिव्हर तसेच शरीरात डॅमेज झालेल्या ज्या पेशी आहेत त्यांना रिपेअर करण्याचे काम हे Vitamin C चांगल्याप्रकारे करते. Vitamin C हा अँटिऑक्सिडेंटचा भरपूर मोठा स्रोत आहे. जेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा क जीवनसत्व युक्त फळे आहार घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


Vitamin C अभावी होणारे रोग व समस्या

१. Vitamin C मुळे भूक कमी लागणे. २.हाडे कमजोर होऊ लागतात. ३.पचनशक्ती कमी होते. ४.रक्ताची कमतरता होऊ लागते. ५.स्कर्व्ही रोग -हिरड्याना सूज येणे.त्यातून रक्तस्त्राव होणे ६.सांधेदुखीचीसारख्या समस्या निर्माण होणे. ७.केस कोरडे पडणे तसेच केसाला फाटे फुटणे. ८.त्वचा खडबडीत व कोरडी होऊ लागते. ९.डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते व मोतियाबिंदू सारखे आजार होऊ शकतात. १०. Vitamin C मुळेस्वभाव चिडचिडा होऊ लागतो. ११.तोंडाचा वास येणे. १२.कोणत्याही प्रकारची एलर्जी होऊ शकते. १३.चर्म रोगासारख्या समस्या होऊ शकतात १४.पांडूरोग व शरीरात अशक्तपणा जाणवणे.



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page