अश्वगंधा
- divipawar94
- May 24, 2021
- 2 min read

अश्वगंधा एक औषधी वनस्पती असून, तिचे वैज्ञानिक नाव Withania somnifera आहे. त्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. तीन ते पाच फुटांपर्यंत वाढते. यामध्ये दोन जाती असतात. एक जंगलात व दुसरी पडीक जमिनीत आढळते तिला ढोरगुंज म्हणतात. पाने पाच ते दहा सेमी. लांब व अडीच ते पाच सेमी. रुंद असतात.पानांवर पांढरट लव असते. फुले गोलाकार पुष्पकोषाने झाकलेली हिरवी असतात. ही फुले पक्व झाल्यावर तांबूस केशरी रंगाची होतात. ही वनस्पती महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये भरपूर प्रमाणात आढळते.
अश्वगंधा चे फायदे -
अश्वगंधा चे वस्त्रगाळ केलेले चूर्ण तीन ग्राम सकाळ संध्याकाळ तूप तीन ग्राम व साखर एक ग्राम घालुन घेतले असता संधीचे दुखणे चार ते पाच दिवसात बरे होते.
अश्वगंधा अत्यंत वीर्य वृद्धी करणारा आहे आहे म्हणून त्याची प्रसिद्धी आहे अश्वगंधा तीन ग्राम चूर्ण पाव लिटर गाईचे दूध दहा ग्रॅम खडीसाखर या बरोबर घ्यावे शक्ती वाढते अश्वगंधा क्षयावर फार मोठे औषध आहे.
अश्वगंधामध्ये तिखट, उष्ण, मधूर, रसायन, वाजीकर, कफ,वात,शोध, श्वेतकुष्ठ, क्षय, कृमी, श्वास, पुष्टीकर, धातूपोषक इ, गुणधर्म असतात.
बाळाची वाढ होण्यासाठी गर्भिणीस अश्वगंधा दुधातून द्यावे म्हणजे बाळ सशक्त उपजते.
रोज अश्वगंधा दुधातून घेतल्यास तरूणपण टिकून राहते.
अर्धशिशीवर अश्वगंधा चूर्ण नाकात ओढावे. वातविकारामध्ये अश्वगंधा चूर्ण गुळातून घ्यावे. छातीत दुखत असल्यास अश्वगंधेचे मूळ पाण्यात वाटून लेप करावा. धातूक्षयावर अश्वगंधा, साखर, तूप, मध, पिंपळी ही एकत्र करून घ्यावी व दूधभात खावा. चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी अश्वगंधा चूर्ण, आवळ्याचा रस व जेष्ठमधाचे चूर्ण एकत्र करून घ्यावे.
मेंदूचा थकवा घालवण्यासाठी, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी, बुध्दीचा विकास होण्यासाठी अश्वगंधा चूर्ण एक ते तीन ग्रॅम या प्रमाणात रोज दिवसातून दोन ते तीन वेळेस दूध किंवा मधातून घ्यावे.. स्त्रियांच्या प्रदर यावरही आस्कंद देतात तसेच स्त्रीयास गर्भ राहण्यासाठी व तो वाढवण्यासाठी व दूध चांगले येण्यासाठी अश्वगंधा देतात . तसेच गाठ व्रण उठानू दृष्ट व्रण व शूज हेही अश्वगंधा च्या लेप केला असता बरे होतात . कोणत्याही वेदनेवर बाहेरून अश्वगंधा चा लेप लावावा वेदना कमी होतात तसेच खरूज व नारु वरही अश्वगंधा तेलातून लावतात त्याने खरूज व नारू बरे होतात चोपचिनी व अश्वगंधा यांचे समभाग चूर्ण तूप व मध यातून घेतले असता रक्त शुद्ध होऊन अंगाची कांती वाढते. टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher)
[योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments