अश्वगंधा
- divipawar94
- Jul 17, 2021
- 3 min read

ह्या जगात असं कोणतंही द्रव्यनाही ज्याचा औषध म्हणून उपयोगकेला जाऊ शकत नाही. प्राचीन आयुर्वेदाने मानवी जीवन रोगमुक्त आणिसमृद्ध करण्यासाठी विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यासकरून संपूर्ण जगासाठी एक अमूल्य योगदान दिले आहे. प्राचीन काळी वनस्पतींच्या विविध अंगांचा उपयोग औषध म्हणून केलाजात असे. त्यावरून त्यांचेनाव ठरत असे. जसंकी, कुष्ठ नावाची वनस्पती कुष्ठरोगावर उपयुक्त आहे. ब्राह्मी बुध्दीवर्धकआहे. त्याचप्रमाणे अश्वगंधा वनस्पतीचंनाव तिच्या गुणधर्मांचा अभ्यास करून निश्चित केलेआहे. अश्व म्हणजेचघोडा. घोडा हा बलआणि पौरुषत्व ह्यांचे प्रतीक आहे. अश्वगंधाह्या वनस्पतीच्या सेवनाने दुर्बलता नाहीशी होऊन बल तसेचपौरुषत्व वाढते हेच आयुर्वेदाचे सांगणेआहे.
वैज्ञानिकनाव (Botanical name) –
Withania somnifera (L.) Dunal (विथेनिआ सॉम्नीफेरा)
Syn-Physalis somnifera Linn. आहे.
फायदे –
· पचनविकार: अपचन आणि मंदाग्नीयांवर अश्वगंधा गुणकारी आहे. पचनसंस्थेची विविधकामे सुरळीत होतात, पाचन शक्ती वाढवायचीअसल्यास अश्वगंधाचा उपयोग करावा.
· अशक्तपणा: शक्ती वाढवण्यासाठी मुळ्याचे चूर्ण 2 ग्रम रोज घ्यावे. याने अशक्तपणा कमी होऊन शरीराचीताकद वाढते.
· संधिवात: संधिवात चा त्रास असल्यासरोज अश्वगंधा चूर्ण ३ ग्राम घ्यावे. संधिवातावर याचा उपयोग परिणामकारकऔषधी आहे. याने नाक्कीलाभ होतो.
· क्षयरोग: मुळ्यांचा काढा मिरी आणिमध टाकून घ्यावा. हा काढा गंडमाळांसाठीसुद्धा उपयुक्त आहे. दररोज काढाघेतल्याने क्षय रोग समाप्तहोतो.
· निद्रानाश : निद्रानाश होत असल्यास अश्वगंधाच्या मुळा उपयुक्त ठरतात. मुळा शामक असल्याने निद्रनाश होत नाही.
· त्वचारोग : त्वचेच्या अनेक तक्रारींवर याचीपाने गुणकारी आहे.गळवे आणिहात पायाची सूज यांवर पानांचालेप लावावा. याने उवा मारतात. त्याचप्रमाणे पुळ्या, व्रण वैगैरे त्वचाविकारांवर हा लेप गुणकारीआहे. अश्वगंधाची पाने तुपात टाकूनत्याचे मलम करून जखमेवरलावल्यास जखम लवकर बरीहोते.
· नेत्रविकार : अश्वगंधाच्या पानांचा लेप डोळ्यांच्या विकारांवरगुणकारी आहे.
· अंगालाखाज येणे : ३० मि.ली. पानांचा रस जिरे टाकूनघ्यावा. अलर्जी मुळे होणारी खाजथांबते. आग सुद्धा शांतहोते. त्यासाठी दिवसातून दोन वेळा हारस घ्यावा.
· आम्लपित्त: याच्या सालीचे चूर्ण किवा काढा घेतल्यासआम्लपित्त कमी होते. पित्तमुळे अंगावर गांधी झाली असल्यास अश्वगंधाच्यापानांचा रस अंगाला लावावा.
इतर उपयोग :
· फळांचीचटणी किवा रस करूनघेतल्यास उचकी थांबते. पानेसावलीमध्ये वळवून त्याचे चूर्ण करून घेतल्यास शुक्रमेहआणि मधुमेह दूर होतो.अश्वगंधाकॅप्सूलमुळे नैराश्य औदासिन्य दूर होते.
· तणावविरोधी गुणधर्म – ताणतणाव कमी करण्यासाठी अश्वगंधानियमित सेवन करावी
· बॅक्टेरियाच्यासंसर्गाचे फायदे – अश्वगंधा बॅक्टेरियाच्या संसर्गापासून मुक्त होण्यास फायदेशीर आहे.
· जखमाबरे होण्यास उपयोगी – जखमांच्या उपचारांसाठी अश्वगंधाचा वापर पूर्वीपासून केलाजातो.
· अश्वगंधारोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहे
अश्वगंधाचे सेवन कसे करावे?
अश्वगंधाबाजारात गोळी किंवा पावडरस्वरूपात मिळते. झोपण्यापूर्वी दुधातून अश्वगंधा घेण्याने लाभ होतो. बाजारातआजकाल अश्वगंधा गोळी (Ashwagandha Pills) सहज मिळते. एककिंवा दोन गोळ्या दूधकिंवा पाण्यासोबत घेतल्याने खूप फायदा होतो.
अश्वगंधाचे दुष्परिणाम
· अधिकअश्वगंधा सेवन केल्यास काहीहानी होऊ शकते. अधिकअश्वगंधा खाल्ल्याने उलट्या होणे, पोट खराब होणेकिंवा अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना अश्वगंधामुळेऍलर्जी देखील होऊ शकते. गर्भवतीमहिलांनी अश्वगंधाचे सेवन करू नकाकारण ते गर्भाला धोकादायकठरेल.
· अश्वगंधाचेसेवन मोठ्या प्रमाणात टाळा कारण यामुळेअतिसार, अस्वस्थ पोट आणि मळमळयासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
· अश्वगंधावापरताना डॉक्टर सावधगिरी बाळगतात कारण अश्वगंधा सर्वसाधारणपणेघेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतो, खासकरुनमधुमेह, उच्च रक्तदाब, चिंता, नैराश्य आणि निद्रानाश अशाआजारांनी ग्रस्त अशा लोकांसाठी. अश्वगंधाकाही औषधांचा प्रभाव वाढवू किंवा कमी करू शकतो.
· अश्वगंधाझोप आणि शरीरात उर्जावाढवण्याचे काम करते. याऔषधांचा प्रभाव वाढू किंवा कमीहोऊ शकतो. प्रामुख्याने बेंझोडायजेपाइन्स घेत असताना काळजीघ्या. लक्षात ठेवा अश्वगंधा ह्यालोकांनी खाऊन चालणार नाही.
· अश्वगंधासंतुलित करते की आपलेशरीर बाह्य घटकांवर कसे प्रतिक्रिया देते. यासह, यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणार्या औषधांचा प्रभावकमी होतो. ज्यांना ऑटोम्यूनची समस्या आहे त्यांनी अश्वगंधाघेऊ नये.
· अश्वगंधामुळेमधुमेह कमी होतो. हेआपल्या रक्तातील साखरेची पातळी 12% कमी करते. जरआपण आधीच मधुमेहाची औषधेघेत असाल तर अश्वगंधाघेऊ नका कारण यामुळेआपल्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खाली जाईल.
· जरतुम्ही उच्च रक्तदाब/ बीपीकमी करण्यासाठी औषधे घेत असालतर तुम्ही अश्वगंधा त्यांच्याबरोबर घेऊ नका. अश्वगंधाघेतल्यास आपला रक्तदाब खूपकमी होऊ शकतो.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योगशिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments