अस्थिधातु
- divipawar94
- Jul 10, 2021
- 1 min read
Updated: Jul 17, 2021
शरीरालामूर्त रूपदेणाऱ्या घटकांनाआयुर्वेदात धातूअसे म्हणतात. धातू पोषणक्रम विचारातघेतल्यास, एकूणसात धातूंपैकीअस्थीधातू हा पाचव्या क्रमांकाचाधातू आहे. अस्थी शब्दातील‘स्था’ धातूत्याचे चिरकालीम्हणजेच शरीराच्यानाशानंतरही टिकणारेअस्तित्व दर्शवते. शरीराची स्थितीप्रामुख्याने या धातूवर अवलंबूनअसल्यानेही यासअस्थी असेम्हणतात. अस्थीद्वारेतयार झालेल्यासापळ्यामुळे आतल्यामृदू अवयवांचेसंरक्षण होते. प्राचीन आयुर्वेदग्रंथांत अस्थींचीगणना केलीआहे. चरकाचार्यांनीत्यांची संख्या३६० सांगितलीआहे. तर सुश्रुताचार्यांनी ही संख्या ३००सांगितली आहे. आधुनिक वैद्यकीयशास्त्रानुसार शरीरातीलहाडांची संख्या२०६ आहे. मोजण्यातील भिन्नतेमुळेसंख्येत ही तफावत आहे. चरकाचार्यांनी अस्थीप्रमाणेकडक वाटणाऱ्यानखांचाही समावेशअस्थींमध्ये केलाआहे. त्याचप्रमाणेदात व दातांना धरूनठेवणाऱ्या रचनाज्याला दंतोदूखलम्हणतात, त्यांचाहीसमावेश अस्थींमध्येकेला आहे. आधुनिक वैद्यकीयशास्त्रानुसार सांध्यांच्याठिकाणी, दोनहाडांच्यामध्ये असणाऱ्याचिवट रचनाम्हणजे कूर्चाकिंवा उपास्थी (Cartilage) यांचाही समावेशआयुर्वेदाचार्यांनी अस्थींमध्येकेला आहे. तसेच छातीच्याफासळ्यांची संख्या२४ आहे. आयुर्वेदात प्रत्येकसलग फासळीच्याठिकाणी तीनवेगळे अस्थीमानल्यामुळे ही गणना २४×३अशी केलेलीआढळते. इतरहीकाही मोजण्यातीलफरकामुळे संख्येतही भिन्नताआढळते. सुश्रुताचार्यांनीअस्थीचे रचनेनुसारपाच प्रकारसांगितले आहेत. पसरट आकाराच्याअस्थींना कपालास्थी, गोलाकार अस्थींनावलयास्थी, लवचिकहाडांना तरुणास्थी, चावण्याचे कामकरून अन्नाचीचव जाणवूनदेण्यात सहभागीहोणाऱ्या दातांनारुचकास्थी, तर लांब आकाराच्याअस्थींना नलकास्थीम्हटले आहे. याचे क्रियात्मककार्य म्हणजेहा धातूत्याच्या पुढच्याधातूचे म्हणजेचमज्जाधातूचे पोषणव धारणकरतो. शरीरावरीलकेस, लव व नखेहे अस्थीधातूचेमल सांगितलेआहेत. अस्थीधातूअधिक प्रमाणातवाढल्यास अस्थीअर्बुद, अस्थीअधिक जाडहोणे, केसव नखेअतिशय वाढणेही लक्षणेजाणवतात. या धातूचा ऱ्हासझाल्यास हातांमध्येवेदना, दातव नखेठिसूळ होणेकिंवा तुटणे, शरीरावरील लव व केसगळणे, थकवा, सांध्यांच्या ठिकाणीशिथिलता येणेही लक्षणेजाणवतात. उत्कृष्टअस्थीधातू असणारीव्यक्ती अस्थिसारम्हणविली जाते. अस्थिसार व्यक्तींच्याटाचा, घोटे, गुडघे, मनगट, खांदे, हनुवटी, डोके, बोटांचीपेरे मजबूतव स्थूलअसतात. तसेचनखे व दातही दृढअसतात. या व्यक्ती उत्साही, सतत कामकरणाऱ्या व शारीरिक तसेचबौद्धिक कष्टसहन करूशकणाऱ्या असतात. स्थिर व बलवान शरीरअसलेल्या अशाव्यक्ती दीर्घायुषीअसतात.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments