top of page
Search

आम्रफल (आंबा)

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 11, 2021
  • 4 min read

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, कंटाळवाणा वाटला तरी आंब्यासाठी तोहवाहवासाही वाटतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणीत प्रत्येकाची आंब्याची एक आठवण नक्कीच असेल. आंब्याच्या विविध पदार्थांचाआस्वाद आपण घेऊ शकतो. मॅँगो शेक, पन्हे, आमसर, चटणी इत्यादी. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे आंबा आरोग्यदायी आहे. आंब्याच्या विशिष्ट चवीमुळे फळांचा राजाच म्हणतात. मंगलकार्य, सण, उत्सव, देवपूजाआणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आम्रावृक्षाचा उल्लेख पुराणात आणि प्राचीन साहित्यात बऱ्याच ठिकाणी आढळतो. या झाडाला प्रजापतीचे रूप मानतात. आम्रमंजिरी (मोहोर) हिकामदेवाच्या पाच बाणातील एक बाण आहे असे मानतात. महाकवी कालिदासाच्या साहित्यात मनाला प्रसन्नता देणाऱ्या आमराईचे आणि कोकीळ कुजनाचे वर्णन आढळते. वेदकाळापासून आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी अतिखाण्यामुळे नुकसानही होऊ शकते. तर जाणून घेऊया आंबा खाण्याचेफायदे अन् तोटे...आंब्याचे असे आहेत आयुर्वेदिक गुण...

गण - मूत्रसंग्रहणीय, पुरीषसंग्रहणीय, छर्दिनिग्रहण, हृद्य, कषायस्कन्ध, अम्लस्कन्ध

(च०);.

कुल - आम्रकुल (Anacardiaceae)

लॅटिन नाव - Mangifera indica म. - आंबा.

स्वरूप –

• १० ते १४ मीटर उंचीचा वृक्ष. पर्ण- १० ते ३० सेंमी लांब व २.५ ते ८ सेंमी लांब व २.५ ते ८ सेंमी, रुंद भल्लाकार, तीक्ष्णाग्र, चुरगळल्यानेतुरट सुगंध.

• पुष्प – लहान, सुगंधी, लांब मंजिरीच्या स्वरूपात. फल - अनेकआकारांचे, कच्चे असता हिरवे, पिकल्यावर तांबूस पिवळे.

• फलमज्जा पिवळी किंवा तांबूसपिवळी सुगंधी व गोड.

• आत बाठा व त्याच्या आत कोय असते.

• वसंतात फुले व ग्रीष्म, वर्षात फळे येतात.

प्रकार - अनेक व्यवहारात कलमी व रायवळ असे दोन मुख्य प्रकार,

उत्पत्तिस्थान - सबंध भारतात विशेषत: उष्ण प्रदेशात.

गुण - इतर अवयव.

रस - कषाय, विपाक - कटु, वीर्य - शीत. मु. गुण - लघु, रूक्ष,

पक्वफल - रस - मधुर, विपाक - मधुर. वीर्य

स्निग्ध, फक्त पक्व हापूस आबा उष्ण.

कच्चे फळ - रस - अम्ल. विपाक - अम्ल. वीर्य - उष्ण,

कर्म व उपयोग

शीत. मु. गुण - गुरु,

दोषघ्नता –

त्वचा, पुष्प, पत्र आणि बीजमज्जा कफपित्तशामक, पक्वफलवातपित्तशामक. हापुस आंबा पित्तकर, कच्चे फल - त्रिदोषकर.

स्थानिक

साल इ. रक्तस्तंभन व व्रणरोपण असल्याने व्रणावररक्तस्तंभनासाठी आणि रोपणार्थ त्यांचे चूर्ण वापरावे.

आभ्यंतर

कच्चे फल –

1. रुचिकर, दीपन, रक्तपित्तप्रकोपक, पण पन्हें करून दिल्यास

2. तृष्णादाहशामक व दीपन.

3. पर्ण - कोवळी पाने - रस - छर्दिनिग्रहण, पूयमेहात उपयुक्त. पुष्प - स्तंभन,

4. अतिसारघ्न, त्वचा - व्रणरोपण, गर्भाशय शोथघ्न, बीजमजा – कृमिघ्न,

5. गर्भाशयशोथघ्न, अतिसारघ्न, मूत्र व पुरीष संग्रहणीय, श्वेत - रक्तप्रदरनाशक,

पक्वफल –

स्नेहन, अनुलोमन, हृद्य, शोणितस्थापन, बल्य, वर्ण्य, बृहण व वृष्य,

उपयोगिता –

1) शक्तिवर्धक/ वीर्यवर्धक आंब्याचा रसात दूध मिसळून प्यायल्याने वीर्याची दुर्बलता नष्ट होते. रोज 2-3 पिकलेले आंबे खाऊन नंतर वरून एक ग्लास दूध प्यायल्याने वीर्य वृद्धी होते. शुक्राणु पुष्ट होतात. दोन महिने सातत्यठेवून संध्याकाळच्या वेळी एक आमरसात एक कप दूध मिसळूनप्यायल्याने शारीरिक कमजोरी दूर होते. आयुर्वेदानुसार, या प्रयोगानेरक्त स्वच्छ होते. पुरुषांची ताकद वाढते शिवाय जोडप्याच्या लैंगिकसमस्याही दूर होण्यास मदत होते. शीघ्रपतन ठीक होते. पिकलेल्या आंब्याच्या रसामध्ये खडीसाखर, विलायची, लवंग वा अद्रक स्वादानुसार मिसळून प्यायल्याने शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते. मूत्रविसर्जनही मोकळे होते. स्फूर्ति/चैतन्यात वाढ होते. नियमित सेवनाने हडकुळी व्यक्तीही धष्टपुष्ट होते. आंब्याच्या सालीमध्ये व्हिटामिन A आणि हे भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. फायटोन्यूट्रिइंट्स हे आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आपण लांब राहू शकतो.

2) कॅन्सरपासून बचाव आंब्यातील अँटिऑक्सीडंट कोलोन कॅन्सर, ल्यूकेमिया आणिप्रोस्टेट कॅन्सरपासून बचावासाठी फायदेशीर आहे. यात क्यूर्सेटिन, एस्ट्रागालिन आणि फिसेटिन यासारखे अनेक तत्त्व असतात. जेकॅन्सरपासून बचावासाठी उपयुक्त ठरतात.

3) डोळ्यांसाठी उपयुक्त आंब्यात व्हिटॅमिन ए भरपूर असतो. हे सत्व डोळ्यांसाठी वरदान आहे. मोतीबिंदूच्या धोक्यापासून लांब ठेवतात.

4) त्वचेसाठी उपयुक्त आंब्याच्या चोथ्याचा फेसपॅक तयार करून तो लावल्यास चेहऱ्यावर तजेला येतो, त्वचा उजळते.

5) पाचनक्रिया ठीक राखतो आंब्यात असे अनेक एन्झाइन्म्स आहेत जे प्रोटीन तोडण्याचे काम करतात. यामुळे भोजन लवकरच पचते. शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत करते सोबतच यात साइर्टिक acid, टरटैरिक acid शरीरातील क्षारतत्त्वांचे संतुलन राखते.

6) स्थूलत्व कमी होते स्थूलत्व कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन फायदेशीर आहे. आंब्यातील फायबर शरीराच्या अतिरिक्त चरबी साठी खूप फायदेशीर ठरते. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते, यामुळे ओव्हर इटिंगचा धोकाही कमी होतो.

7) स्मरणशक्ती ज्यांना विसरभोळेपणा आहे, त्यांनी आंब्याचे सेवन केले पाहिजे. यात आढळणारे ग्लुटामिन acid स्मरणशक्ति वाढवण्यासाठी उत्प्रेरकाचे काम करते. सोबतच यामुळेरक्त कोशिकाही सक्रिय होतात. यामुळे गर्भवतींना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.

8) आंब्याच्या सालीमध्ये मॅग्नीफेरीन, कॅम्पफेरोल आणि anthocyanins आणि quercetin हे केमिकल्स असतात जे की आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

9) आंब्याच्या सालीमध्ये ethyl gallete हे केमिकल असतं जे की ट्युमर ची वाढ होण्यापासून रोखण्यास शरीराला मदत करतं आणि हृदय विकारांपासून सुद्धा आपल्याला लांब ठेवतं. यकृत उत्तमराहण्यासाठी मदत करण्यास मदत होते.

10) कोलेस्ट्रॉल नियमित राखतो. आंब्यात फायबर आणि व्हिटॅमिन सी असतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे संतुलन राखण्यात मदत होते.

11) आंब्याच्या कोयीमुळे केसांचं गळणं कमी केलं जाऊ शकतं. केसातील कोंडा कमी करण्यास मदत होते.

12) आंब्याच्या कोयीमुळे त्वचा रोग आणि चेहऱ्यावर येणारी पुरळांना लांब ठेवण्यास मदत होत असते.

13) आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आंब्याची कोय ही हृदयाचे आजार, मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होतअसते.

तोटे

1) एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे १५० कॅलरीज असतात. त्यामुळे आंब्याच्या अधिक सेवनानेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

2) जेवल्यानंतर आंबा खाल्याने कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी नाश्ता, स्नॅक्स म्हणून आंबा खाणे जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे कॅलरीजही नियंत्रित राहतील.

3) अधिक प्रमाणात आंबा खाल्याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेजास्त प्रमाणात आंबा खाऊ नका. एका दिवसात एक किंवादोनपेक्षा अधिक आंबा खाणे टाळा. आंबा कोणाला आवडत नाही. आंबा न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. मात्र आंबा कितीही चविष्ट असला तरी त्याचे अति सेवन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरेल.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page