top of page
Search

आयुर्वेद आणि पथ्यापथ्य

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 21, 2021
  • 4 min read

विशिष्टआजारांमध्ये काही गोष्टी करणंआणि काही गोष्टी टाळणंआवश्यक असतं. पण नेमकं कायकरायचं आणि काय टाळायचंते आपल्याला माहीत असतंच असं नाही. म्हणूनचआपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी..

प्रसन्नात्मेन्द्रियमन: स्वस्थइत्यभिधीयते।

आयुर्वेदाचेघोषवाक्य ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्’ व ‘आतुरस्य रोग- निवारणम्’ असे आहे. आयुर्वेदीयप्रमुख ग्रंथांत रोग झाल्यावर उपचारकरण्यावर भर न देता; रोग होऊ नये; निरोगीमाणसाचे स्वास्थ्य कसे टिकवता येईल; वाढवता येईल यावर भरदिलेला आहे. याकरिता आयुर्वेदातीलअष्टांगसंग्रह, अष्टांगहृदय व श्रीचरकसंहिता याग्रंथांतील सूत्रस्थान अध्याय १ ते अध्याय७ पर्यंत स्वस्थवृत्तात या स्वरूपाचा विचारक्रमवार सांगितला आहे. दिनचर्या, ॠतुचर्या, आहारातील पातळ स्वरूपाचे पदार्थउदा.- पाणी, दूध, मध, उसाचारस इत्यादी व ६ व्याअध्यायात मांसाहारासकट सविस्तर आहारविचार मांडलेला आहे. याशिवाय अन्नरक्षाअध्याय, व्यायाम, निद्रा, मैथुन यांसंबंधी उपयुक्त माहिती सविस्तरपणे सांगितली आहे. नैसर्गिक वेगमल, मूत्र, वायू; भूक, निद्रा इत्यादीवेग अडविले तर काय रोगहोतात व त्यांचे निवारणाचेहीउपाय या स्वस्थवृत्त स्वरूपाच्याअध्यायात सांगितले आहेत. हे सर्व सांगतअसताना विविध पदार्थ, व्यायाम व अन्य शरीरधर्म, शरीरास हितकर काय व अहितकरकाय याचा विचार याग्रंथांतून त्या काळानुरूप केलेलाआहे. आज ५००० वर्षांनंतरया ग्रंथांतून वर्णन केलेले धान्य, फळे, पालेभाज्या, कडधान्येयांची कदाचित नावे वा रंग, रूप बदललेले असेल पण मानवीस्वास्थ्य टिकविण्याकरिता सांगितलेले यमनियम हे मोलाचे आयुर्वेदधनआहे. उदा. पाणी प्यावेन प्यावे? पाण्याचे विविध प्रकार व त्यांचे गुणधर्म; मीठ खावे न खावे? त्यांची पांचभोतिक रचना; ताक व दहीयांच्यातील परस्पर विरोध; जुना व नवातांदूळ; अल्पायू पालेभाज्या; मलमूत्रांचे वेग अडविण्याचे दुष्परिणाम; व्यायामाचा अतिरेक सांगताना सिंह व हत्तीयांचा दाखला हे सर्व मार्गदर्शनमोठे चपखल आहे. पथ्यव कुपथ्य हे शुद्ध वैद्य- डॉक्टरांच्या रोजच्याच व्यवहारात आवश्यक शब्द आहेत, पणत्यापेक्षा हितकर व अहितकर मानवीजीवनाला उपयुक्त व अनुपयुक्त असाविचारही पथ्यापथ्यात हवा. पथ्यापथ्य हेतात्पुरते नसावे. रोग असला तरतो मुळापासून दूर व्हावा हीअपेक्षा पथ्यापथ्य सांगताना असली पाहिजे. कारणतात्पुरता रोग बरा करण्याचेकाम औषधांकडे आहे; रोग पुन्हाहोऊ नये; शरीर सक्षमव्हावे; रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, म्हणून आहार-विहार यावरआयुर्वेदाचा भर आहे. असेदिनचर्या,ॠतुचर्येला धरून वर्तन झालेतर माणसाचे शरीरस्वास्थ्य दीर्घकाळ टिकते. शरीरस्वास्थ्य असले तर मनस्वस्थ राहाते. मन नुसतेच स्वस्थअसून चालत नाही तरते प्रसन्न हवे. असे शरीर, मन स्वस्थ व प्रसन्न राहिलेतर आत्म्याचे बल टिकाऊ स्वरूपाचेहोते. यालाच शास्त्रात, ‘स्वस्थ’ अशी भावपूर्ण व्यापकसंज्ञा आहे. इंग्रजी भाषेतरोग या शब्दाला ‘डिस-इज’ ‘डिसीज’ म्हणजे ‘नॉट अ‍ॅट ईज’ असा प्रतिशब्द आहे. हा शब्दसुटसुटीत आहे. पण या ‘ईज’ शब्दात आयुर्वेदाच्या स्वस्थ या व्यापक अर्थाच्यासंज्ञेचा फारच थोडा भागयेतो. त्यामुळेच की काय अ‍ॅलोपॅथिक शास्त्रात स्वस्थवृत्त, पथ्यापथ्य यांना जवळपास काहीच स्थान नाही. याउलट हा प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाच्याआग्रहाचा; पथ्यापथ्याच्या आग्रहाचा सांगावा, आयुर्वेदांत अग्रक्रम असलेला दिसेल.


पथ्ये सतिगदार्तस्यभेषजग्रहणेनकिम्।

पथ्ये सतिगदार्तस्यभेषजग्रहणेनकिम्।।

अर्थ :

पथ्यसांभाळले तर रुग्णाला औषधकशाला? (म्हणजे औषधे न घेताहीरोग बरा होऊ शकेल.) आणि पथ्य सांभाळले नाहीतर औषध कशाला? (म्हणजेऔषध घेऊन काय उपयोग?) म्हणजेच औषध घेतले, पणपथ्य सांभाळले नाही तर काहीहीउपयोग होणार नाही.


A) अग्निमांद्यअजीर्ण, गॅस, उदरवात, ढेकरा, उचकी, पोटदुखी, वायुगोळा


पथ्य :

1. खात्रीचेसुरक्षित साधे पाणी किंवाउकळून गार केलेले पाणी, दूध शक्यतो गाईचे व खात्रीचे असावे. रोगलक्षणे अधिक असल्यास सुंठचूर्णकिंवा आले तुकडा उकळूनदूध द्यावे.

2. ताक, भाताची पेज, जिरे पाणी, गरम पाण्यातील लिंबूसरबत, ज्वारीची भाकरी, ताकाची कढी, बाजरी, नाचणीकिंवा तांदूळ भाजून भात. नाईलाज म्हणूनगहू वापरायचा असेल तर सुकीपातळ चपाती. मूग, मुगाची डाळ, नाइलाज म्हणून तूर डाळ.

3. सर्वपालेभाज्या व बटाटा, रताळेसोडून सर्व फळभाज्या. गोडचवीचेसंत्रे, अननस, वेलची केळे, ताडफळ, गोड द्राक्षे, पपई, वाफारून सफरचंद. हिंग, लसूण, आलेयुक्त ताक. मनुका, खारीक, भात, ज्वारी व राजगिऱ्याच्या लाह्य़ा.

4. माफकव कोवळे ऊन, आवश्यक तेवढाहलका व्यायाम, अन्नपचन होईल एवढे श्रम, मोकळ्या हवेतील राहणी, रात्रौ जेवणानंतर १५ मिनिटे फिरणे. रात्रौ वेळेवर झोप.


कुपथ्य :

1. फ्रीजचेकिंवा खूप गार पाणी, कोल्ड्रिंक, गार दूध, म्हशीचेकसदार दूध, दुधाचे जडपदार्थ, दही, चहापान.

2. गहू, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, मटकी, उडीद, मटार, कुळीथ, बटाटा, रताळे, कांदा, हिरव्या साळीची केळी, चिक्कू , मोसंबी, खूप मसालेदार पदार्थ, पोहे, चुरमुरे, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, सुकामेवा, मांसाहार.

3. फाजीलश्रम, खूप वजन उचलणे, पंख्याखाली किंवा वातानुकूलित राहणी, ओल व कोमटहवा, बैठे काम, जागरण, दुपारी झोप, विश्रांतीचा अभाव, मानसिक अस्वास्थ्य व चिंता, फोमकिंवा खूप मऊ अंथरुणपांघरूण; धूम्रपान, मद्यपान, तंबाखूचा विविध प्रकारे वापर.


B) आम्लपित्त, उलटी, अल्सर, पोटदुखी, पोटडब्बहोणे


पथ्य :

1. खात्रीचेसुरक्षित साधे व मर्यादितपाणी, किंवा उकळून गार केलेले पाणी. नारळपाण्ी, गाईचे दूध, खात्रीचे बिनसायीचेम्हशीचे दूध. तांदुळाची जिरेयुक्तपेज, कोकम सरबत.

2. तांदूळभाजून भात, तांदुळाच्या पिठाचीभाकरी, ज्वारी, नाचणी, साबूदाण्याची पातळपेज, भाताच्या, राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्य़ा. मूग, मुगाची डाळ. दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, तांबडा माठ, राजगिरा, कोथिंबीर, धने, गोड द्राक्षे, जुन्याबाराचे मोसंब, वेलची केळी, ताडफळ, अंजीर, नारळाचे दूध, शहाळे, गोडव मऊ दाण्याचे डाळिंब, मनुका, सुके अंजीर, केमिकलविरहितगुळाचा वापर.

3. माफकव्यायाम, सकाळी व रात्रौ जेवणानंतरकि मान पंधरावीस मिनिटेफिरणे, सायंकाळी लवकर व कमीजेवण, दुपारी वेळेवर जेवण. पोटाला विशेषत: आतडय़ांना ताण पडणार नाहीअसा व्यायाम.


कुपथ्य :

1. चहा, गरम पेये, फाजील गार पाणी, कृत्रिमकोल्ड्रिंक, तहान मारणे, शंकास्पददूध, फार पातळ पदार्थवारंवार घेणे. तहानेच्या बाहेर उगाचंच पाणी पिणे, शिळेपाणी.

2. बाजरी, गव्हाचा अतिरेकी वापर, वाटाणा, हरभरा, उडीद, चवळी, मटकी, मटार. मुळा, पालक, मेथी, गोवार, शेपू, शेवगा, लसूण, मिरची, पुदिना, कारळे, मोहरी, लोणेचे, पापड, व्हिनेगार, मसालेदार पदार्थ, जेवणावर जेवण, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले शिळे अन्न वशंकास्पद अन्न. पपई, अननस, संत्रे, आंबा, हिरव्या सालीची केळी, काजू, बदाम, खजूर, पिस्ता, चॉकलेट, मांसाहार.

3. खूपउन्हातान्हांत काम, ताकदीच्या बाहेरफाजील श्रम, कोंदट व ओल असलेल्याजागेत निवास, दुपारी झोप, रात्री जागरण, आतडय़ांना ताण पडेल असेव्यायाम, फाजील पश्चिमोत्तानासन, व्यायामाचा अभाव, बैठे काम, धूम्रपान, मशेरी, मद्यपान इ. जेवणाच्या वेळानेहमी अनियमित असणे; फाजील चिंता.


C) जुलाब, पोटफुगी, पोटखराबहोणे, अजीर्ण, गॅसेस, पोटदुखी


पथ्य :

1. उकळूनगार केलेले पण शिळे नसलेलेपाणी. सुंठपाणी, ताजे ताक, सुंटमिश्रितताक; आले व लसूणयुक्तताकाची कढी; गरम पाण्यांतीललिंबूसरबत, कोकम सरबत. तांदुळाचीजिरेयुक्त पातळ पेज. सूंठचूर्णयुक्तकोरी कॉफी.

2. जुनातांदूळ भाजून भात, तांदुळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, मुगाचे लसूणयुक्त वरण, साळीच्या लाह्य़ा. राजगिरा लाह्य़ा, लाह्य़ांचे पीठ; लाह्य़ा वताक, कुळीथ, कुळीथ कढण (जिरे आलेयुक्त), दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, मुळा, गवार, डिंगऱ्या, पुदिना, आले लसूण अशीचटणी; मेथी, चकवत, शेपू इ. (पालेभाज्याकाळजीपूर्वक धुवून घेणे). ताडफळ, अननस, पपई, गोड संत्रे, सफरचंद वाफारून, धने, जिरे, मिरी, आले, सुंठ, लसूण, तमालपत्र इत्यादी माफक प्रमाणात, केमिकलविरहित गूळ.

3. अन्नपचनहोईल इतपत माफक हालचाल; सायंकाळी लवकर व कमीजेवण. रात्रौ जेवणानंतर किमान दोन हजार पावलेचालणे.


कुपथ्य :

1. खूपपातळ पदार्थ, दूध, खवा, मलई, पेढा, बर्फी, चहा, शंकास्पद दुधाचीपेये; शिळे व शंकास्पदपाणी. गहू, नवीन तांदूळ, बाजरी, मका, वाटाणा, हरभरा, मटकी, मटार, राजमा, वाल, पोहे, चुरमुरे, भणंग, मक्याची कणसे, साबुदाणा, वरई. काळजीपूर्वक नधुतलेल्या पावसाळ्यांतील पालेभाज्या; फ्लॉवर, बियांची वांगी, कांदे, बटाटा, रताळे, गाजर, टोमॅटो. आंबा, फणस, केळी, चिक्कू, मोसंबी, पेरू, बोरे, करवंदे, जांभूळ.

2. खूपतिखट पदार्थ, लोणचे, पापड, मिरच्या, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा इ. बेकरीचे पदार्थ, मेवा-मिठाई, मांसाहार.

3. जेवणावरजेवण, भूक नसताना जेवण, बैठे काम, व्यायामाचा अभाव, रात्रौ उशिरा जेवण, दुपारी झोप, रात्रौ जागरण, जेवणानंतर लगेच खूप पाणीपिणे, जेवणामध्ये वारंवार पाणी पिणे, जेवणानंतरलगेच खूप लांबचा प्रवास, अतिरिक्त पेयपान, मद्यपान, धूम्रपान.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page