top of page
Search

आसव – अरिष्ट

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 26, 2021
  • 1 min read

औषधेदीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविधप्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठीप्रथम एक मातीचे स्वच्छमडके घेऊन त्यात आवश्यकत्या औषधी वनस्पती, पाणीव इतर सहाय्यक वनस्पतींचारस या गोष्टी भरल्याजातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मधव अन्य सुगंधी पदार्थटाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्टमिसळून झाकण लावून त्यालापंधरा ते पंचवीस दिवससमशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधानप्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्तहोतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात. औषधीवनस्पतींचे भरड चूर्ण करूनत्यापासून काढा बनवून त्यानंतरवरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रवपदार्थ तयार होतो, त्यासअरिष्ट असे म्हणतात. आसवबनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते. आचार्यचरकांनी आसव बनू शकणाऱ्याचौऱ्यांशी प्रकारच्या वनस्पतींचे वर्णन केले आहे, त्यांनाआसवयोनी असे म्हणतात. ज्याआसव-अरिष्टांमध्ये पाणी, सुगंधी पदार्थ इत्यादींचे प्रमाण दिलेले नाही, त्या ठिकाणी एकद्रोण (१३ लिटर) पाण्यातएक तुला (५ किग्रॅ.) गूळ, गुळाच्या अर्धा (२.५ किग्रॅ.) मध, तर सुगंधी द्रव्यगुळाच्या दशांश प्रमाणात घालावीत असा नियम आहे. आसव हे शरीर वभूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणादूर करणारे व मनाला प्रसन्नकरणारे असे असते; तरअरिष्ट हे शरीर कृशकिंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादीप्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चववाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारेअसते. वाळा, अफू, कोरफड, चंदनइत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकीजुनी तितकी अधिक गुणकारी असते.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page