top of page
Search

उत्तरबस्ती

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 19, 2021
  • 3 min read

उत्तरबस्ती म्हणजेच स्त्रियांच्या मूत्राशय, मूत्रमार्ग, स्त्रियांचे गर्भाशय व योनीमार्गामध्ये असलेल्या व्याधी लक्षणानुसार विशेष औषधी वनस्पती सिद्ध तेल/ तुप प्रविष्ट करणे म्हणजे उत्तरबस्ती होय. पंचकर्म मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात दिली जाणारी.


अ) गर्भाशयात दिली जाणारी उत्तरबस्ती :

उत्तरबस्तीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक असते. त्यानंतर गर्भाशयात सोडायचे विशिष्ट औषधी सिद्ध तेल किंवा तूप सुद्धा निर्जंतूक करून घ्यावे लागते. त्यानंतर हे विशिष्ट औषधी सिद्ध तेल तूप iui canula च्या साहाय्याने गर्भाशयात सोडले जाते. हा विधी फक्त विवाहित स्त्रियांमध्येच करता येतो. त्यातही पाळीच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांपर्यंतच गर्भाशयाचे मुख खुले असल्याने हा विधी करता येणे शक्य होते. इतर वेळी गर्भाशयात उत्तरबस्ती करता येत नाही.जिथे गर्भाशयात उत्तरबस्ती शक्य नसतो त्या ठिकाणी योनीपिचू हा विधी करावा लागतो.


फायदे : वारंवार होणारे गर्भपात, पीसीओडी, पाळीतील अनियमितता, ट्युबल ब्लाॅक, विविध कारणांनी असलेले वंधत्व यासारख्या आजारात उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. गर्भाशयाला बल देण्यासाठीसुद्धा उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत, असा अनुभव आहे.


ब) मूत्रमार्गात दिली जाणारी उत्तरबस्ती :

मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी औषधीसुद्धा निर्जंतूक करून घ्यावी. नंतर कॅथेटरच्या साहाय्याने हे औषध मूत्रमार्गात सोडले जाते. युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) मात्र कॅथेटर न घालता ग्लास सिरिंजच्या साहाय्याने उत्तरबस्ती द्यावी लागते.


फायदे : मूत्रप्रवृतीवर नियंत्रण नसणे, खोकताना-शिंकताना मूत्रप्रवृती होणे, युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) पुरुषामध्ये पौरुषग्रंथी वृद्धी (प्रोस्टेट ग्लॅड), अडखळत मूत्रप्रवृती होणे यात उपयोग होतो. पुरुषांमध्ये मूत्रमार्ग व वीर्यस्रावाचा मार्ग एकच असल्याने वीर्यासंबंधी दोषांमध्येसुद्धा उत्तरबस्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे शुक्रजंतूची संख्या कमी असणे, शुक्राणूंचे बल किंवा गती कमी असणे, अशा विविध कारणांमुळे पुरुषांत येणाऱ्या वंध्यत्वावर उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो.


इतर फायदे –

स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती-

१. पाळीच्या सर्व तक्रारी

२. पाळीमध्ये पोट, कंबर जास्त दुखणे

३. पाळीमध्ये स्राव (अंगावरुन) जास्त जाणे

४. पाळीमध्ये स्राव (अंगावरुन) कमी जाणे

५. अनियमित पाळी येणे

६. योनीविकार

७. योनीशूल (Pain in Vaginal region)

८. चांगले संतान प्राप्तीसाठी


वंध्यत्व संबंधीत-

१. बीजवाहिन्या बंद असणे (Tubal block)

२. PCOD

३. वंध्यत्व (Primary or Secondary Infertility)

४. गर्भाशयात गाठी असणे

५. गर्भाशयाचा आकार लहान असणे

६. गर्भाशयमुख संकुचित असणे (Pinhole cervical opening/os)

७. योनीमार्गाची अपुर्ण वाढ

८. स्त्री-बीज न फ़ुटणे (Ovulation न होणे)

९. गर्भाशयाला सुज असणे

१०. TORCH test positive


मी करत स्रीरोग व प्रसुतीशास्र चे शिक्षण घेत असतांना पुढील रुग्णांना उत्तरबस्ती दिल्यामुळे झालेले फायदे –


रुग्ण क्र. १.

एक २८ वर्षीय तरुणी वंधत्वाच्या उपचारासाठी आमच्या Hospital ला आली. तिची एक गर्भाशय नलिका बंद होती. दुसऱ्या बाजूची गर्भाशय नलिका उघडी होती. परंतु त्या बाजूच्या बीजग्रंथीत गाठी तयार झाल्याने त्यातून ओव्ह्युलेशन होत नव्हते. अशा दुहेरी अडचणींमुळे लग्नानंतर ५ वर्षे होऊनही मूलबाळ होत नव्हते. अनेक उपचार घेऊनही फायदा झाला नव्हता. या रुग्णेला पंचकर्माची माहिती दिली.बस्ती व गर्भाशयगत उत्तरबस्ती याचे ३ कोर्स करण्याचा सल्ला दिला. जोडीला आयुर्वेदीय औषधे सुरू केली. दरमहा ही रुग्ण ८ दिवसांसाठी आमच्याकडे उपचाराला येत असते. गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत. वंध्यत्वावर उत्तम उपयोग होतो.


रुग्ण क्र. २.

एका ४२ वर्षीय महिलेला अनेक वर्षांपासून अनियंत्रित मूत्रप्रवृतीचा त्रास होता. खोकताना, शिंकताना तिला मूत्रप्रवृत्ती होत असे. मोठया संकोचाने तिने हा त्रास कथन केला. तिला आश्वस्त करून, काही आयुर्वेदीय औषधीसोबत मूत्र मार्गातील स्नायूंना बल देणाऱ्या औषधाच्या साहाय्याने मूत्रमार्गाद्वारे उत्तरबस्ती दिला. एक दाेन दिवसाआड असे ७ उत्तरबस्ती दिले. केवळ दीड महिन्याच्या उपचारात तिचा हा त्रास पूर्णपणे बंद झाला. आज ६ महिने उलटूनही तिला परत हा त्रास झालेला नाही. उत्तरबस्तीमुळे अनेक वर्षांचा त्रास केवळ दीड महिन्यात पूर्णपणे थांबला.


रुग्ण क्र. ३.

एक ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला मूत्रनलिका संकोच ( युरेथ्रल स्ट्रिक्चर)चा त्रास होता. अडखळत मूत्रप्रवृती होणे, वारंवार मूत्रप्रवृती होणे, मूत्रप्रवृतीच्या वेळी वेदना होणे ही लक्षणे होती. डाॅक्टरांनी आॅपरेशनचा सल्ला दिलेला होता. तसेच मूत्रमार्गात टाकण्यासाठी डायलेटर दिलेले होते. परंतु रुग्ण सततच्या त्रासाला कंटाळून आयुर्वेदिक चिकित्सेसाठी आमच्या Hospital ला आला. या रुग्णाला उत्तरबस्तीविषयी माहिती देऊन मूत्रमार्गात उत्तरबस्ती सुरू केली. हळूहळू या रुग्णाचा त्रास कमी झाला. आता रुग्णाला न अडखळता साफ लघवी होते.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page