top of page
Search

एरंडेल तेलाचे गुणकारी फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 27, 2021
  • 4 min read

एरंडेल तेलाचे गुणकारी फायदे


1. सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.


2. पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.


3. आमवात संधिवात - सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.


4. कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.


5. अनेकांना गळवे होतात. लवकर फुटत नाहीत. गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगळावी व गरम करुन गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.


6. अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.


7. बाळंतिणीच्या स्तनाला सतत बाळाच्या दुधासाठी चोखण्यामुळे सूज येते काही वेळा यामुळे स्तनांना ठणका लागतो. अशावेळी एरंडाची पाने खूपच गुणकारी आहेत. एरंडाच्या पानांच्या वाटून थोडेसे कोमट करून त्याचे पोटिसाने ठणका ताबडतोब कमी होतो.


8. काहीवेळा काही बाळंतिणींना अंगावर खूपच दूध येते. त्याचा त्यांना त्रासही होतो. सतत छाती दूधाने भरून आल्याने कधीकधी छातीत दुखूही लागते. अशावेळी या स्त्रियांच्या स्तनातील दूध कमी करणे आवश्यक होऊन बसते. अशावेळी नुसत्या एरंडाच्या पानांचा स्तनांस शेक दिला तरी अंगावरचे दूध कमी होते.


9. अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळुचा भाब गरम होतो, डोक्यावर घण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मालिका सुरु झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे व तळपायांनाहि तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधवे. हि गोष्ट सातत्याने व्हावी. गुण खात्रीने येतो.


10.हात, पाय, नाभी यांन सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमुत्र एक कप गाळुन घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालुन रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते.


11.वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.


12.सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.


13.गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.


14.पुष्कवेळा छातीत दुखण्याचा तक्रार असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायुमुळे होण्याचा संभव बऱ्याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालुन देत जावा. गर्भारशीबाईने नियमीतपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसुती होते.


15.अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.


16.पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.


17.नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत जावे.


18.तोळाभर एरंडमुळ, थोडे कुटुन अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा (मंदग्नीवर). तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकुन ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाचाई पाने वाटून गरम करऊन सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ ३ मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवातचे दुखणे आटोक्यात येईल.


19.डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा. शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page