top of page
Search

औषधी वनस्पती

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Sep 22, 2021
  • 1 min read

चविष्ट पदार्थ बनवताना मसाला म्हणून वापरात येणाऱ्या वनस्पतींची लागवड केली जाते. पण त्याचबरोबरीने औषधी गुणधर्म असलेल्या छोट्या छोट्या वनस्पतींचा वापर करणं अगदी सहज शक्य आहे.


तुळस –

भारतीय घरांमध्ये अगदी सहज दिसणारं रोप म्हणजे तुळस! सर्दी खोकल्यावर अत्यंत गुणकारी असलेली तुळस फार औषधी आहे. तुळशीच्या १५-२० पानांचा रस काढून, त्यात थोडासा आल्याचा रस व मध घालावं. हे मिश्रण घशासाठी लाभदायक असतं.


अडुळसा –

कफावर गुणकारी असलेल्या अनेक आयुर्वेदिक औषधांमधील महत्त्वाचा घटक असलेला अडुळसा श्वासनलिकेच्या आजारांवर मात करण्यास उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या काळातही अडुळसा उपयुक्त ठरतो. अडुळशाच्या तीन-चार पानांना योग्यप्रकारे वाफ देऊन त्याचा रस काढून घ्यावा. त्यात किंचितशी साखर घालून तो प्यावा.


कोरफड –

जखमा, भाजणं यावर औषध म्हणून कोरफड फारच गुणकारी आहे. आतड्यांच्या कामात नियमितता आणण्याचं कामही कोरफड करू शकते. चेहऱ्यावर सुरकुत्या न येऊ देता, त्वचा टवटवीत ठेवण्याची क्षमताही यात आहे. झाडाचं पान उभे कापून, त्यातील गर काढून घेऊन तो पाण्यासह प्यावा. कोरफडीचा गर केसांच्या मुळांपाशी लावल्याने केसांना बळकटी येते. चेहऱ्यावर लकाकी आणण्यासाठी त्याचा गर चेहऱ्यावर लावून तीस मिनिटं ठेवावा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.


ब्राह्मी –

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, विचारांना चालना देण्यासाठी व बोलण्यात स्पष्टता आणणं अशा गोष्टींसाठी ब्राह्मी उपयोगी आहे. दहा-पंधरा पानांचा रस करून तो दररोज पिणं मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


लाजाळू –

लाजाळू मूळव्याधावर गुणकारी आहे. शिवाय थंडावा मिळण्यासाठी उपयुक्त आहे. दोन छोट्या फांद्या कुस्करून त्यात थोडीशी साखर घालून करण्यात आलेली पेस्ट पाण्याबरोबर प्यावी.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)


 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page