top of page
Search

केटो डाएट

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 1, 2021
  • 2 min read

केटोडाएट हा कमी कार्बोहायड्रेटअसलेल्या आहारासाठी ओळखला जातो. ह्यात भाकरी, भात ह्यातून मिळणारीकार्बोहायड्रेट घेणं थांबवलं जातं. केटो डाएट घेऊन त्यातूनयकृतामध्ये केटोन्स तयार होतात. ज्याचाउपयोग शरीरात उर्जा म्हणून केला जातो. केटोडाएटलाच लो बर्न किंवाउच्च चरबीयुक्त डायट म्हणून सुध्दाओळखतात. जर एखादी व्यक्तीकार्बोहायड्रेट युक्त असा भात भाकरीचाआहार/ डाएट घेत असेलतर शरीर ग्लूकोज आणिइन्सुलिन तयार करण्यास सुरवातकरते. शरीर ग्लूकोजला उर्जेमध्येरूपांतरित करते. उर्जा स्त्रोतांपेक्षा आपण ग्लूकोज निवडतो. मग इन्सुलिन रक्ताद्वारे शरीरात ग्लूकोजच्या वाहतुकीचे कार्य करते. पण केटो डाएटमध्ये आपल्या आहारात कार्बोहायड्रेट् कमी प्रमाणात सेवनकेल्याने शरीरात केटोसिस तयार होतात. केटोसिसही एक नैसर्गिक प्रक्रियाआहे. जी जरी अन्नाचेप्रमाण कमी असेल तरीहीमानवाला जिवंत ठेवायला मदत करते. ह्यातशरीर केटोन्स तयार करते. जेलिव्हर मधली चरबी जाळूनतयार होते. केटो डाएटचा मुख्यहेतू शरीराला केटोसिस प्रक्रियेमध्ये आणणे आहे. ज्यातकार्बोहायड्रेटस् फक्त कमीतकमी घ्यावेलागतात.


केटोडाएटमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ

केटोडाएट, मासे आणि समुद्रातीलप्राणी, कार्बोहायड्रेट्सच प्रमाण कमी असलेल्या भाज्या : शतावरी, एवोकॅडो, ब्रोकोली, कोबी, फुलकोबी, काकडी, हिरव्या शेंगा, वांगं, कराळे, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्यूस, जैतून, मिरेपूड (विशेषतः हिरवी), पालक, टोमॅटो, झुनीच, चीझ, अंडी, कोंबडी, खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, सुकामेवा, डार्क चॉकलेट आणि कोको.


केटोडाएटचे फायदे काय आहेत?

वजनकमी – केटो डाएट घेतल्यानेशरीरात उर्जा वाढते. हा डायट वजनकमी करण्यास देखील मदत करतो. हाडायट घेतल्यास शरीराची चरबी कमी होते. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी खूप कमी होते. केटो डायट रक्तातील साखरेचीपातळी कमी करतो. टाइप 2 मधुमेहासाठी हे अधिक फायदेशीरअसल्याचे सिद्ध होते.


मेंदूचीएकाग्रता वाढते - केटो डायट घेतल्यासमेंदूची एकाग्रता वाढते. कारण केटो डायटहा मेंदूच्या उर्जेचा एक चांगला स्त्रोतआहे. कारण कार्बोहायड्रेटस् कमीप्रमाणात घेतले जातात. रक्तातील साखर वाढवणारा भातआणि भाकरी टाळली जाते. अनेक हुशार संशोधकलोक केटो डायट डॉक्टरांच्यामार्गदर्शनाखाली घेत आहेत.


मुरुमकाढून टाकण्यासाठी - केटो डायट घेतल्यासत्वचा आपोआप सुधारू लागते. ज्यामुळे मुरुमांचा त्रास होत नाही.


कोलेस्टेरॉलआणि रक्तदाब नियंत्रित करते - केटो डायट कोलेस्टेरॉलचांगलं वाढविण्यात मदत करतो. जेरक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे. कारण कार्बोहायड्रेट्सचेकमी प्रमाण खराब कोलेस्ट्रॉल कमीकरते आणि चांगले कोलेस्ट्रॉलवाढविण्यात मदत करते.


मधुमेहावर/डायबिटिस वर नियंत्रण - जरयोग्यरित्या साखर नियंत्रित केलीनाही तर रोजचा आहारघेऊन कुणालाही टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. अशावैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनात असे सांगितले आहेकी केटो डायट कमीकार्बोहायड्रेट आणि केटोजेनिक मुळे, इंसुलिनची पातळी कमी करायला आणित्याचा स्तर चांगला राखण्यासमदत करतो


केटोडायटचे तोटे काय आहेत?

केटोडाएटचा दुष्परिणाम असा आहे कीशरीराला फायबर आणि पोषक द्रव्येमिळत नाहीत. कार्बोहायड्रेट देखील कमी घेतले जातात. याचा पाचन तंत्रावर खोलवरपरिणाम होतो. यामुळे त्या व्यक्तीस पचनसंबंधित समस्येची तक्रार होऊ शकते अर्थातबद्धकोष्ठता होऊ शकते. यामुळेआपल्याला शरीराच्या स्नायूंमध्ये ताठरपणा, ताण आणि थकवाह्यासारख्या समस्या येऊ शकतात. मुख्यत: इलेक्ट्रोलाइट्समध्ये अडथळा येतो आणि कार्बोहायड्रेटच्याकमतरतेमुळे ही समस्या उद्भवूशकते. तुम्हाला ह्या केटो डायटचीसवय नसली तर त्यामुळेशरीरात सुस्तपणा आणि थकवा जाणवतो. पण सतत घेतल्याने हीसवय नाहीशी होते.


ह्यालोकांनी केटो डायट घेऊनये.

थायरॉईड, यकृत संबंधित समस्या, किडनी चा आजार आणिबद्धकोष्ठता समस्या इ. हा केटोडायट त्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page