top of page
Search

कंटोळी (Kantola)

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 7, 2021
  • 2 min read

भारतातील एक डॉक्टर रंगनायुकुळु पीएच.डी.आयुर्वेद. ह्यांनी असं म्हटलं आहे की, “प्राचीन भारतातील कृषी संस्थांनी फार आधीच ह्या हंगामी कंटोळी (Kantola) फळाचे असंख्य आरोग्य फायदे ओळखले आहेत.



कंटोळी खाण्याचे फायदे


• कंटोळीच्या ताज्या फळांचा रस घेतल्यास रक्तदाब नियमित होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले अँटी-लिपिड पेरोक्सिडेटिव्ह गुणधर्म धमनीच्या वॉल आणि त्यांना आतून बाहेरून बरं करायला मदत करते. कंटोळी सर्दीचं संक्रमण रोखते: कंटोळी (Spine Gourd) कधी येतात तर पावसाळ्यात म्हणजेच माणसासाठी निसर्ग किती उपकारक आहे कारण सर्दी आणि इतर फुफ्फुसाच्या संसर्गाला पावसाळ्यात सुरुवात होते.कंटोळी खाऊन ह्या सामान्य विषाणूजन्य संक्रमणाला तुम्ही आळा घालू शकता. यात अँटी-ॲलर्जीक, अँटी-बॅक्टेरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात.

• शरीरातील फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीला आणि पेशी टिकून राहण्यास अडथळा आणतात. कंटोळी मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स ह्या फ्री रॅडिकल्सचा नाश करू शकतात. अशा प्रकारे कंटोळी खाऊन आपलं आयुष्यमान वाढतं. तसेच हे यकृताचे रक्षण करते आणि त्यामध्ये चरबी जमा होऊ देत नाही.

• कंटोळी कमी उष्मांक असलेली भाजी आहे आणि त्याचे सेवन वजन कमी करायला मदत करते. यामुळे शरीरात आर्द्रता चांगल्या प्रमाणात वाढते.

• कंटोळी ही फळभाजी खात असाल तर मुतखडा (किडनी स्टोन) तयार होण्याची शक्यता कमी होते आणि कंटोळी खाल्ल्याने किडनी स्टोन निघून जाऊ शकतो. मुतखडा असलेल्या बऱ्याच लोकांनी ह्याचा अनुभव घेतला आहे.

• कंटोळी मध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यात बीटा कॅरोटीन, ल्युटीन, झेंथाइन्स इत्यादी असतात, जे त्वचा निरोगी आणि तुकतुकीत राहायला मदत करतात.

• कंटोळी मध्ये व्हिटॅमिन ए असतं जे चांगल्या दृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आणि पोषक आहे. म्हणून, व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेली ही फळ भाजी डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करते.

• त्वचेच्या अनेक समस्या आहेत, ज्याचा सामना एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर करावा लागतो. बरेचसे लोक सांगतात की कंटोळी च्या भाजलेल्या बिया हे इसब आणि त्वचेच्या इतर रोगांवर गुणकारी ठरतात.

• पेप्टिक अल्सर मध्ये पोटातील अस्तर, खालची अन्ननलिका आणि लहान आतडे ह्यात जळजळ होते. कुठलेही मसाले न घालता केलेली कंटोळीची भाजी किंवा कढी पेप्टिक अल्सर आणि मूळव्याध असलेल्यांसाठी उत्कृष्ट आहे.

• कंटोळी या फळ भाजीमध्ये अनेक न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात जे मेंदूची कार्यक्षमत सुधारते. या व्यतिरिक्त, विसरण्याचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी देखील हे चांगले ब्रेन टॉनिक आहे.


टीप - वरील कोणतेही उपचार तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page