कापूर
- divipawar94
- May 21, 2021
- 1 min read

कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते. जुना संधीवाताच्या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल खूप फायदेशीर आहे. कापूरचा वापर अनेक औषधांमध्ये वापर करण्यात येतो.
कापूरचे फायदे.
1. कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काजेच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. त्यामुळे जुलाब थांबतील.
2. पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.
3. त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
4. स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते.
5. खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते.
6. संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.
7. भाजल्यास कापूरचे तेल लावा. जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते.
8. कापूर खूप सुगंधी असते त्याचे सुवास आणि रसायनिक भिन्नता ही देशात होणाऱ्या वृक्षावर अवलंबून असते. कापुराच्या धुराने वातावरण प्रसन्न आणि अल्लाददायक होते.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments