top of page
Search

कुमारी (कोरफड)

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 14, 2021
  • 3 min read



आयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पतींचा उल्लेख केला गेला आहे ज्याच्या सेवनामुळे आपण आजन्म निरोगी राहू शकतो. फक्त तुम्हाला या वनस्पतींच्या सेवनाची योग्य पद्धत माहित हवी. कोरफड देखील याच औषधी वनस्पतीचा एक भाग आहे. कोरफडीला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसाला सुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते. ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो. कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी अगदी कुंडीतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो. लहान मुलांच्या निरोगी त्वचेसाठी व सुदृढ आरोग्यासाठीही अगदी निश्चिंत होऊन कोरफडीचा वापर केला जातो. खोकला, कफ, मुरुम, रॅशेज आजार कोणताही असो कोरफड तो दूर करण्यात फायदेमंद मानली जाते. चला तर जाणून घेऊया बहुगुणी कोरफडीचे विविध फायदे. कोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. हिंदीमध्ये ग्वारपाठा, घृतकुमारी, इंग्लिशमध्ये अ‍ॅलोव्हेरा आणि मराठीत कोरफड म्हणून प्रसिद्ध असलेल्या या औषधी वनस्पतीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरफडीचा गर त्वचेच्या सुंदरतेसाठी, सौंदर्यासाठी जितका कारक मानला जातो तितकाच तो आरोग्यासाठी देखील लाभदायक असतो. आपल्या सर्वांना नेहमी वाटतं की आपलं शरीर कायम निरोगी राहावं. तुम्हालाही ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नैसर्गिक आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफड एक अशी वनस्पती आहे जिचं सेवन रोज केल्याने कोणताही रोग आसपासही भटकत नाही आणि शरीर निरोगी राहते. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात. डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात. सौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे. कोरफडीचा गर कोरफड ही एक सर्वगुणसंपन्न वनस्पती मानली जाते. कारण आपल्या आरोग्याशी निगडीत कोणती समस्या असो वा सौंदर्याशी जोडलेला त्रास, प्रत्येक त्रासाला नेस्तनाभूत करण्याचे गुणधर्म या कोरफडीच्या गरात आहेत. शरीराच्या आतल्या अवयवांनी ही जितकी नवसंजीवनी देते तितकीच ती बाहेरील त्वचेवर देखील लाभदायक ठरते. कदाचित याच कारणामुळे पूर्वीच्या काळी म्हणजेच आयुर्वेदाच्या जमान्यात कोरफडीला अमरता प्रदान करणारी वनस्पती म्हटलं जायचं. कोरफडीमध्ये अ‍ॅंटीबॅक्टेरियल, अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात. म्हणूनच समस्या शरीराच्या वरील भागावर असो किंवा मग आतील भागावर.. कोरफड हरतर्हेने कारक ठरते. या समस्यांपासून करते बचाव आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण खाण्या- पिण्याच्या बाबतीत आणि लाईफस्टाईलमध्ये अनेक चुका करतो. ज्यामुळे कधी दातदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन, उलटी, गॅस, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या सर्रास होतात. पण तुम्ही नियमित कोरफडीचा गर खाल्ला किंवा कोरफडीचा ज्यूस प्यायला तर या वरील समस्यांचा सामना करण्याची गरज भासणार नाही. कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. कोरफडीच्या गराचे नियमित पण मर्यादीत प्रमाणात सेवन केल्याने डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रोल, हायपरटेंशन सारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही. कारण कोरफडी मधील औषधी घटक शरीरात कोणत्याही आजारांची वाढू होऊ देत नाही. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘अ’, ‘क’, ‘ब1’, ‘ब2’, ब3’, ‘ब6’, फोलिक अ‍ॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. कोरफडीच्या गराचे नियमित पण मर्यादीत प्रमाणात सेवन केल्याने डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रोल, हायपरटेंशन सारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही. कारण कोरफडी मधील औषधी घटक शरीरात कोणत्याही आजारांची वाढू होऊ देत नाही. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘अ’, ‘क’, ‘ब1’, ‘ब2’, ब3’, ‘ब6’, फोलिक अ‍ॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो.

सेवनाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी

कोरफडीचे सेवन करताना या गोष्टी कटाक्षाने पाळा जेणे करुन आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही. यासाठी दररोज मर्यादित मात्रेत याचे सेवन कराप्रत्येक गोष्टीचं अतिसेवन हे हानीकारक असतं. त्यामुळे आपल्या आरोग्यास मानवेल आणि वयानुसार लाभदायक ठरेल इतक्याच प्रमाणात कोरफडीच्या जेलचं सेवन करायचं आहे. यात काही शंका असल्यास आयुर्वेदीक वैद्य तुम्हाला जास्त चांगला सल्ला देऊ शकतात. कोरफडीचे सेवन करताना या गोष्टी कटाक्षाने पाळा जेणे करुन आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही. यासाठी दररोज मर्यादित मात्रेत याचे सेवन करा. प्रत्येक गोष्टीचं अतिसेवन हे हानीकारक असतं. त्यामुळे आपल्या आरोग्यास मानवेल आणि वयानुसार लाभदायक ठरेल इतक्याच प्रमाणात कोरफडीच्या जेलचं सेवन करायचं आहे. यात काही शंका असल्यास आयुर्वेदीक वैद्य तुम्हाला जास्त चांगला सल्ला देऊ शकतात. जर तुम्ही तरुण असाल आणि स्वस्थ असाल म्हणेजच तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर मात्र तुम्ही कोरफडीच्या सालीतील गराचा २ इंच भाग दररोज खाऊ शकता. तसंच तुम्ही अर्धा कप कोरफडीचा ज्यूस करुनही पिऊ शकता. गर्भवती महिलांनी कोणत्याही ज्यूस अथवा फळांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण प्रेग्नेंसी दरम्यान प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सची स्थिती वेगवेगळी असू शकते ज्यामुळे तिच्या आरोग्यास असणा-या गरजा देखील वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे गर्भवती महिला व आजार असणा-या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरफडीचा घर खावा तर इतर लोक याचं सेवन करु शकतात.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)


 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page