top of page
Search

कोरोना आणि आयुर्वेद

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 18, 2021
  • 3 min read


कोरोना महामारीचे जागतिक संकट अद्याप पर्यंत टळलेले नाही. आता पुन्हा कोरोना ची दुसरी लाट आलेली आहे. त्यावर मात करण्यासाठी शासकीय स्तरावर व आरोग्य संगठनांच्या द्वारा तसेच कोरोना लसीद्वारे कोरोनाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोव्हिड १९चा (Covid 19) प्रादुर्भाव जलद गतीने वाढतच आहे. या व्हायरसला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार सांगितले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही जण घरगुती उपचारांचीही मदत घेत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल अशा काही आयुर्वेदिक टिप्स येथे दिल्या आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणं आवश्यक आहे.


रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स

1) वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.

2) वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे

3) खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा

4) ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.

5) जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.

6) दुपारच्या जेवणानंतर लगेचच झोपणे टाळा, जेवणानंतर लगेचच झोपल्यास पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होत नाही.

7) लहान मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पुदिना तेलाचा वापर करावा. दोन ते तीन थेंब पुदिना तेलामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि हे चाटण तयार करून लहान मुलांना खायला द्या. वयोवृद्धांसाठीही हा रामबाण आयुर्वेदिक उपाय आहे.

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

1) ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा

2) आयुर्वेदामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे. तुळशीतील औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. एक लीटर पाणी घ्या. त्यामध्ये तुळशीचे पाने मिक्स करा आणि उकळा. थोड्या वेळानंतर पाण्यामध्ये काळ्या मिरीचे ४ ते ६ दाणे, थोडासा गूळ आणि एक चमचा लिंबू रस मिक्स करा. या पेयाचं तुम्ही हर्बल चहाच्या स्वरुपात दिवसभरातून एक किंवा दोन वेळा सेवन करू शकता. पण याचे नियमित सेवन करणे टाळा. ५ ते ६ दिवसांतून एकदा या पेयाचे सेवन करावे. किंवा

3) तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.

4) सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर पुदिना, काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.

5) कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.

6) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये वयोवृद्धांच्या विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या वृद्धांच्या आरोग्याची योग्य ती देखभाल होणे गरजेचं आहे. वृद्धांनी नियमित सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, प्राणायाम, कपालभाती या मूलभूत बाबी नियमित कराव्यात.

7) मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.

8) सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी – आयुर्वेदिक औषधी

1) संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस.

2) तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० ml उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.

3) च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे. (मधुमेही रुग्णांसाठी साखरविरहित)

4) सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.

5) तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.


कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्यांसाठी आयुर्वेदिक औषधी

1) टॅबलेट आयुष्य ६४ - (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.

2) अगस्त्य हरितकी - ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.

3) अणुतेल - तीळतेल - दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.

4) ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून १/२ घ्यावी.

5) खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page