top of page
Search

कर्णपूरण

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 26, 2021
  • 1 min read

कर्ण म्हणजे कान व पूरणम्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवाऔषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेलाकर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण असेहीम्हणतात. तर्पण म्हणजे तृप्तता. ऐकण्याचे काम योग्य प्रकारेहोत असल्याने कान तृप्त होतात, म्हणून कर्णतर्पण असा शब्दप्रयोग आलाआहे. कानाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी तसेच कानाशी संबंधित आजारांच्या उपचारासाठीही कर्णपूरण करतात. दररोज जर कानात योग्यपद्धतीनुसार तेल टाकले, तरकान निरोगी राहतात. वाढलेल्या वातदोषाच्या उपद्रवामुळे मान अकडणे, हनुवटीजखडणे, ऐकायला कमी येणे यांसारखेविकार होत नाहीत. कुठल्याआजारासाठी कुठल्या औषधाचे पूरण करावे याचेनिर्देश आहेत. शिवाय ते औषध कितीवेळ कानात टाकून ठेवावे याचेही वर्णन आहे. हा कालावधी ‘मात्रा’ यासंज्ञेद्वारे सांगितला आहे. जसे निरोगीव्यक्तीने कानाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी तेलाचे कर्णपूरण केले असता तेशंभर मात्रा एवढा वेळपर्यंत कानाततसेच ठेवावे व नंतर पुसूनघ्यावे. एक मात्रा म्हणजेनिरोगी व्यक्तीत आपसूकपणे डोळ्यांची उघडझाप होण्यासाठी लागणारा वेळ. कुठल्या हेतूसाठीकर्णपूरण करावयाचे आहे त्यानुसार हाकालावधी शंभर मात्रा तेहजार मात्रा एवढा असू शकतो. कर्णपूरण करण्यासाठी ज्या कानात औषधकिंवा तेल टाकायचे असेलत्याच्या विरुध्द कुशीवर व्यक्तीस झोपविले जाते व त्याकानाभोवती सहन होईल इतक्यागरम कापडाने शेकले जाते. नंतर सहन होईलइतपत कोमट तेल किंवाऔषध टाकून आवश्यक मात्रांपर्यंत ते कानात ठेवलेजाते. औषध किंवा तेलकानात असेपर्यंत कानाच्या मुळाशी हळूवार चोळले जाते. नंतर हे औषधकिंवा तेल स्वच्छ कापसाच्यासाहाय्याने पुसले जाते. निरोगी व्यक्तीत तेलाचे कर्णपूरण सूर्यास्तानंतर करणे जास्त लाभदायकअसते.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page