कलिंगड खाण्याचे फायदे आणि दुष्परीणाम
- divipawar94
- May 30, 2021
- 2 min read

कलिंगडफळात असणारे आवश्यक घटक
प्रोटीन : ०.६१ ग्रॅम, फॅट : ०.१५ ग्रॅम, कार्बोहैड्रेट्स : ७. ५५ ग्रॅम, कॅलरीज : ३०. ० ग्रॅम, शुगर : ६. २ ग्रॅम, फायबर : ०. ४२ ग्रॅम, व्हिटॅमिनए : २४%, व्हिटॅमिन सी : ११%
कलिंगड खाण्याचे फायदे –
1. वजन कमीकरण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूरसमावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीजकमी असतात. मात्र अधिककाळापर्यंत पोटभरलेले ठेवण्यासमदत करतात. १०० ग्रॅमकलिंगडामध्ये केवळ३० ग्रॅमकॅलरीज असतात. यात १मिलिग्रॅम सोडियम, कार्बोहायड्रेट ८ग्रॅम, फायबर ०.४ग्रॅम, साखर ६ ग्रॅम, व्हिटामिन ए११ टक्के, व्हिटामिन सी१३ टक्के, प्रोटीन ०.६ ग्रॅम असते.
2. उन्हाळ्यातशरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारणपाण्याचे प्रमाण कमी होताच आपणआजारी होऊ शकतो. म्हणूनशरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तमपर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवतेआणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.
3. उन्हाळ्यातबाहेर फिरल्यामुळे अनेक लोक आजारीपडतात. यामुळे घराच्या बाहेर जाताना कलिंगड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते. काम करताना धकवाही जाणवत नाही.
4. इम्युनिटी सिस्टीममजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी - कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणिए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढतेतसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगलेआहे.
5. बद्धकोष्ठता आणि गॅस ही एकमोठी समस्या बनली आहे जवळ जवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठता पासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, यामुळे पाचन तंत्रही ठीक राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
6. कलिंगडाची प्रवृत्ती ही थंडअसते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटचनाही तर डोकेही थंड राहण्यास मदतहोते. याच्या बियावाटून डोक्यावरलावल्या डोकेदुखीबरी होते.
7. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास - ज्यांना उच्चरक्तदाबाचा त्रासअसल्यास अशा व्यक्तींनी कलिंगडजरूर खावे. कलिंगडामध्ये कमीप्रमाणात सोडियमअसते तसेचहे थंडअसते.
8. कलिंगडनियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
कलिंगड खाण्याचे दुष्परीणाम
1. अशा व्यक्तींनी कलिंगड खाऊ नये ज्यांना अस्थमा अथवा अॅलर्जीचा त्रासआहे. कारण याची प्रवृत्ती थंड असते. यामुळे नलिकेत सूज निर्माण होते. यासोबतच शिंका येण्याची समस्याही वाढू शकते.
2. जर तुम्ही भात आणि दही खाल्ले असेल तर त्यावर कलिंगड खाऊ नये. कारण कलिंगड खाल्ल्याने फायदे होण्याच्या जागी नुकसानच होऊ शकते.
3. रिकाम्या पोटी कधीही कलिंगड खाऊ नये. सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर ती सवय बदला. रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर उलटी तसेच पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
4. कलिंगड खाल्ल्याने कधीही पाणी पिऊ नये. लगेच पाणी प्यायल्याने उलटी होऊ शकते.
5. रात्रीच्या वेळेस कलिंगड खाऊ नये. कारण यामुळे कफ वाढू शकतो आणि समस्या अधिक वाढू शकते.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments