top of page
Search

कोविंड रुग्णांसाठी आहार

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Dec 16, 2021
  • 4 min read

आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन दोष (एनर्जी) असतात. पित्त आग आणि पाणी, कफ पृथ्वी आणि जलाच्या दोषांना प्रदर्शित करतात. आपल्या सर्वामध्ये ही एनर्जी वेगवेगल्या टाइप्समध्ये अस्तित्वा आहे. आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये यांपैकी कोणत्या ना कोणता दोष प्रभावी असतो, जो बाकी दोन दोषांना संतुलित ठेवतो. आयुर्वेद एका सिम्पल सिद्धांतावर काम करतो. जर तुमच्या आहार मध्ये गडबड असेल तर अनेकदा कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. पण जर आहार योग्य असेल तर कोणत्याही औषधांची गरज भासणार नाही. जर तुम्हाला आयुर्वेदानुसार, डाएट घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये या पदार्थांचा नक्की समावेश करा... जाणून घ्या हेल्दी आहारा बाबत.

नाश्ता –

• चहा घेत असल्यास त्यात आले-वेलदोडे घालूनच सकाळी अर्धा कप व संध्याकाळी अर्धा कप घेणे. यासोबतच काळा चहा, तुळशीचा काढा आणि लिंबू पाणी यासारखे पेय देखील प्या. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल.

• उप्पीट, भाजणी थालिपीठ, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, साळीच्या लाह्यांचा चिवडा, मूगडाळ भाजून धिरडे, गहू भाजून दलिया असा नाश्ता भूक लागल्यास करणे.

• जेवणाव्यतिरिक्त भूक लागल्यास धने, जिरे, मीठ, तुपाची फोडणी दिलेल्या साळीच्या लाह्यांच्या चिवडा २ मूठ या प्रमाणात खावा.

• सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यावे

• रोज ४ भिजलेले बदाम खावे. सुकामेवा, शेंगदाणे, अक्रोड, काळे खजूर खाल्ल्यासही रोगप्रतिकार शक्ती वाढते. सुकामेव्यातही प्रथिने, क्षार, fatty acids असतात. सोबतच आहारामध्ये दही, लिंबू पाणी, लसूण चटणीचा समावेश करावा. आहारात प्रथिने, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ई आणि अँटी ऑक्सिडेंट, पॉलिफिनॉल आणि महत्त्वाचे क्षार या सर्व घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे.

• सकाळचा नाश्त्यामध्ये मोड आलेलं कढधान्य , आंबवलेले पदार्थ आणि ओट्स हा प्रोटीन परिपूर्ण आहार घ्यावा

• योग्य प्रमाणात प्रोटीन आणि खनिजांचा शरीराला पुरवठा झाला पाहिजे. एक संत्र /डाळिंब / कलिंगड / टरबूज/ कीवी / बेरी 3 व्हिटॅमिन युक्त फळ खावे. फळांचा आपल्या आहारात समावेश करा.

दुपारचे जेवण

• मुगाच्या डाळीचे पहिले चार दिवस सूप घ्यावे मुगाच्या डाळी सोबत पोळी ज्वारीची भाकर बाजरी भाकर घ्यावी.

• पडवळ, दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, घोसावळे, तोंडले, पांढरे वांगे, नवलकोल, कोहळा, केळफूल, श्रावण घेवडा, मुळा, गाजर, बीट, लाल मुळा, करटोल, सिमला मिरची, कारले, फुल गोबी, पान गोबी, भेंडी, काशीफळ, तांदूळजा, कुंद्रा भाज्या घ्याव्या आणि या फळभाज्या तयार करताना धने, जिरे, कोथिंबीर, ओले खोबरे, कांदा, लसूण, कढीपत्ता, साजूक तुपाची फोडणी द्यावी. लाल तिखट कमी प्रमाणात चालेल. हिरवी मिरची, गरम मसाले वापरु नये.

• जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. जेवणाची वेळ सकाळी १० ते १ च्या दरम्यान व सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान असावी.

• ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, गव्हाचा फुलका (तेल-तूप लावू नये), मूग-तुरीची आमटी (धने, जिरे, मीठ, कमी तिखट यांची फोडणी दिलेली) घ्यावी. फोडणी शक्यतो साजूक तुपाची असावी अथवा शेंगदाणा तेलाची द्यावी.

• कडधान्ये भाजून मोड न आणता, मिरे, लसूण घालून सांगितले असल्यास दुपारी जेवणात चालेल.

• अन्न चावून-चावून, माफक प्रमाणात व कमीत कमी २५ मिनिटांपर्यंत जेवावे.

• जेवणानंतर शतपावली करणे

• दुपारी जेवल्या नंतर एक तासांनी वामकुक्षी अर्धा तास झोपावे. शरीराला आराम हि गरजेचा असतो.

• रुग्णाने शक्यतो उपवास टाळावेत करायचाच असल्यास गोड मोसंबी, खजूर, मनुका, पपई, अंजीर, डाळिंब, साबुदाणा खीर, शिंगाडा थालिपीठ, आमसूल सार, भगर, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ चालेल.

काय बंद ?

• तांदुळजा, तांबडा माठ, साधा माठ, या पालेभाज्या, राजगिरा घेणे बंद.

• डाळिंब, अंजीर, मनुका, पपई व गोड मोसंबी सोडून कुठल्याही प्रकारची फळे खाऊ नयेत.

• भात बंद करावा.

• आंबट, आंबवलेले, शिळे पदार्थ, बेकरी पदार्,थ ब्रेड, बिस्किट, दूध, दही, पोहे, शेंगदाणे, तेलकट, मसालेदार पदार्थ बंद करणे. दूध+फळे, आईस्क्रीम, चीज, पनीर, मूग-तांदूळ

• खिचडी+दूध, दूध+भात, दही+भात बंद.

• पालक मेथी फळे आंबट गोड लोणचे पापड दहीभात फळांचे रस ज्यूस केळी चिकू सीताफळ अंगूर हे फळे देऊ नयेत या सर्वांनी कफ वाढतो.

• मांसाहार बंद करणे. अंडी मटन चिकन हे शक्यतो देऊ नये हे पचण्यासाठी जड असतात आणि त्यांनी शरीरात कफाचे प्रमाण वाढते अगदिच हवे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने देऊ शकतो.

• सुपारी / पान / तंबाखू / मद्यपान आदि सर्व प्रकारची व्यसने पूर्णपणे बंद करावीत.

पाणी -

पाणी सकाळी एकदा गरम करणे. गरम पाणी थर्मासमध्ये भरावे. तहान लागल्यावरच माफक प्रमाणात पाण्याच्या भांड्याला तोंड लावून घोट-घोट पाणी पिणे. बाहेर जाताना उकळून गार केलेल्या पाण्याच्या २ बाटल्या सोबत ठेवाव्यात.

झोप

रात्री १० वाजता झोपावे व सकाळी ६ वाजता उठावे.

गुळण्या :

हळद, मीठ व गरम पाण्याच्या गुळण्या सकाळ, संध्याकाळ उपाशीपोटी कराव्यात. ७ दिवस सलग केल्यावर ३ दिवसांचा खंड करावा. डोके व मान वर करुन मोठ्याने आवाज करत गुळण्या कराव्यात.

धूपन :

घर स्वच्छ करुन घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने धूपन औषध किंवा कापुर निखाऱ्यावर / गोवरीवर टाकावे व घरात सर्वत्र धूर फिरवावा, धूर बाहेर गेल्यावर घरात / खोलीत जावे.

इतर –

• पौष्टिक खाण्या व्यतिरिक्त, जीवनशैलीत चांगले बदल करा

• रोज अर्धा तास व्यायाम.

• अनावश्यक ताण घेऊ नका

• शांत आणि स्वस्थ झोपा

• नियमितपने व्यायाम करा

• व्हिटॅमिन D साठी कोवळ्या उन्हात फिरा

• सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही नियमित हळदीच्या दुधाचेही सेवन करू शकता. शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा हळदीचे दूध प्यावे. दूध पिण्यापूर्वी तसंच प्यायल्यानंतर लगेचच अन्य पदार्थ खाऊ नका. तसंच तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले आणि काळे मनुके एकत्र घ्या आणि त्याचा काढा तयार करा. या काढ्याची चव अतिशय तिखट वाटल्यास गूळ किंवा लिंबू रस त्यामध्ये मिक्स करू शकता.

• सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा प्राणघातक विषाणू तुमच्या आसपासही फिरणार नाही.

टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page