खाईन तर तुपाशी
- divipawar94
- Jul 23, 2021
- 2 min read
भारतीयांसाठीतूप ही श्रद्धा आहेचम्हणा ना! शतकानुशतके बहुतेकभारतीय स्वयंपाकघरात तूप केलं जातआहे. मिठाईमध्ये आणि जेवणात तूपवापरणे म्हणजे भरभराटीचे प्रतीक म्हणून पाहतात. पण अलिकडच्या दशकातमधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब (मेटाबोलिक सिंड्रोम एक्स) या भारतातील चयापचयाशीसाथीच्या रोगांनी भारतीय लोकांच्या आवडत्या स्वयंपाकाच्या तुपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळेतूप खाऊ की नकोअसा प्रश्न पडतो. तूप चांगले किंवावाईट याबद्दल लोकांमध्ये मतभेद आहेत. काही बाबा, गुरू, बापू आणि इतर आहाराततूप वापरायचा सल्ला देतात. तर काही डॉक्टरतूप खाणे बंद कराम्हणतात. विवादास्पद सल्ल्यामुळे सामान्य माणूस गोंधळलेला असतो. आजच्या ह्या लेखातून, तूपखाण्याचे फायदे आणि तोटे, तूपकसे खावे, तूप केव्हा खावे, वनस्पती तूप खाण्याचे तोटेह्याबद्दल आपण माहिती घेऊया. हा लेख आपल्या सर्वशंका दूर करेल जेणेकरुनआपण आपल्या रोजच्या आहारात तूप सुरक्षितपणे घेऊकरू शकाल. तुपाची पौष्टिकता आधी बघूया. ह्यावरूनतूप किती पौष्टीक आहेहे समजेल.
तुपातीलपोषक घटक
एकाचमचा (15 ग्रॅम) तूपात सुमारे 135 कॅलरीज असतात, त्या सर्व चरबीतूनयेतात. त्या तुपात थोड्याप्रमाणात 15 ग्रॅम एकूण चरबी आणि 9 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असतात. एकाचमचा तूपात 45 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. तूप सोडियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर, साखर आणि प्रथिनेयुक्तपदार्थांपासून मुक्त आहे.
लोणीकिंवा तूप काय जास्तआरोग्यदायी आहे?
1) तूपलैक्टोज आणि केसिन मुक्तआहे –
देशीगायीचे शुद्ध तूप हे उत्तमतूप आहे. त्यानंतर म्हशीचेतूप येते. पारंपारिक भारतीय पद्धतीद्वारे, पाणी आणि दुधाचाघट्टपणा संपेपर्यंत आपण लोणी कढवतो. त्यामुळे लोण्यातला चरबी युक्त भागनिघून जातो. आणि साजूक तूपनिघते. जे लैक्टोज आणिकेसिन मुक्त असते.
2) तूपतळण्यासाठी उत्तम मानले जाते:
तुपाचास्मोकिंग पॉइंट हा (160-2900 डिग्री सेल्सियस) लोण्यापेक्षा (200-2600 डिग्री सेल्सियस) जास्त आहे. स्वयंपाकाचा स्मोकिंगपॉईंट म्हणजे जेव्हा आपल्या आरोग्यासाठी तेल किंवा तूपजळून विषारी बनू शकते. तूपलवकर जळत नाही म्हणूनतळण्यासाठी उत्तम आहे.
3) तूपालापौष्टिक अशी गोड चवआहे:
थोडेतूप अन्नाची चव वाढवते. एकचमचा तूप आपल्या रेसिपीमध्येतीन चमचे तेल किंवालोणी ह्यांची जागा घेऊ शकते.
दररोजतूप खावं का?
अर्थातह्याचं उत्तर तुम्हीच ठरवा.
आपलीरोग प्रतिकारशक्ती वाढवते – तुपामध्ये विरघळलेली अशी जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि केआहेत, तर ते अँटीऑक्सिडंट्सनेदेखील समृद्ध आहे. हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवून शरीराला विविध रोगांवरील प्रतिकार शक्ती वाढवते.
अन्नपचनसोपे होते – तूप पचनात मदतकरण्यासाठी पोटातल्या आम्ल स्रावाला उत्तेजितकरते, तर इतर चरबीआणि तेले शरीरातील पाचनप्रक्रिया कमी करतात आणिपचायला जड होऊ शकतात.
कोलेस्टेरॉलचीपातळी कमी करते – तूपखराब रक्ताच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणिरक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते.
प्रजननक्षमता (fertility) वाढवते – चांगल्याप्रजननासाठी आहारात चांगल्या प्रतीचे प्रोटीन्स स्त्रोत आणि चांगली चरबीअसणे आवश्यक आहे. शुद्ध तूपचांगल्या चरबीचे सर्वोत्तम रूप आहे. हेवीर्य गुणवत्ता आणि वीर्य प्रमाणवाढवते.
त्वचासुधारते – तूपखाईल त्याला रूप येईल असंम्हणतात ते खोटं नाही. तूप आतून त्वचेला पुन्हाजिवंत करते आणि त्याचीचमक वाढवते.
दररोजतूप किती वापरावे?
निरोगीलोकांनी सर्व फायदे मिळविण्यासाठीदररोज 3 टिस्पून (15 ग्रॅम म्हणजे १ टी स्पून) देसी तूप खावे. शक्यतोदिवसातून तीन वेळा चमचाभरतूप खात जा. तसंतूप पूर्णपणे चरबीयुक्त आहे. जास्त तूपखाल्ल्याने वजन वाढू शकतं. जरी ते ‘स्वस्थ’ अशा Saturated Fats नी युक्त आहे तरी मोठ्याप्रमाणात खाणे चांगले नाही.
वजनकमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तरतूप खावं का ?
होयनक्की खा. पण हेमध्यम प्रमाणात खात जा.
वनस्पतीतूप हेल्दी आहे का?
नाही. काही भारतीय रेस्टॉरंट्स कमी तुलनेत शुद्धतूपाच्या जागी अर्धवट हायड्रोजनेटेडवांसोटिर तेलाचा वापर करतात, वनस्पतीतूप किंवा डालडा हे भयानक आहे. ह्या तूपात ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त आहे. ट्रान्स फॅटला अत्यंत हानिकारक मानले जाते आणि आरोग्याचीगंभीर स्थिती त्याने उद्भवू शकते.
रोजच्याआहारात तुपाचा समावेश कसा करावा?
अहा ! तूप खाण्यासारखे सुख नाही. चपाती, पुरणपोळी, पराठा, वरण भात ह्यातघालून किंवा रोज गुळ तूपइ. प्रकारे तूप खाऊ शकता. भारतीय मिठाई जास्त खाणे टाळा कारणतूपासोबत साखर असते.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments