top of page
Search

खोबरेल तेलाचे फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 30, 2021
  • 5 min read

खोबरेलतेल आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी इतकंफायदेशीर आहे की भारतातआपल्या पूर्वजांनी आदीकाळापासूनच नारळाचे तेल किंवा खोबरेलतेल वापरायला सुरुवात केली असावी. भारतभरआणि कॅरिबियन, आग्नेय आशिया आणि उत्तर अमेरिकेमध्येखोबरेल तेल मोठ्या प्रमाणातस्वयंपाकासाठीचे तेल म्हणून वापरलेजाते. हे तेल नारळापासूनकाढले जाते. ह्यात 85% फॅटी ॲसिडस् आहेत. त्यामुळेच हे तेल फायदेशीरठरते. खोबरेल तेलात बुरशीनाशक आणि संसर्ग रोखणारेगुणधर्म आणि पोषक तत्वआहेत.


खोबरेलतेलाचे प्रकार (TYPES OF COCONUT OIL)

कच्चेकिंवा रीफाइंड न केलेले खोबरेलतेल:

हे खोबरेल तेल जास्त काढण्यासाठीयांत्रिकी पद्धत न वापरल्याने ह्यातेलात जास्त खोबरेलची अस्सल चव आणि पौष्टिकमूल्य जास्त असते. यात कोणतेही अ‍ॅडिटीव्ह, रसायने वगैरे नसतात. व्हर्जिन किंवा रीफाइंड न केलेले खोबरेलतेल मुख्यतः साबण, सौंदर्यप्रसाधने आणि त्वचा आणिकेसांची निगा राखण्यासाठी वापरतात.


रीफाइंडकेलेले खोबरेल तेल:

खोबरेलतेलाचा शुद्ध प्रकार नसला तरी खोबरेलतेलाचा हा प्रकार सर्वाधिकप्रमाणात वापरला जातो. हे खोबरेल तेलकोपरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाळलेल्या खोबऱ्यापासून काढले जाते. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत ब्लीचिंग आणि डीओडोरिझिंगचा समावेशहोतो. हे खोबरेल तेलसहज उपलब्ध आहे, दीर्घ काळटिकणारे आहे आणि कच्च्याखोबरेलाच्या तेलापेक्षा अधिक स्वच्छ आणिस्वस्त आहे.


खोबरेलतेल पौष्टिक का आहे? खोबरेलतेल पिण्याचे/खाण्याचे फायदे

खोबरेलतेलाच्या फायद्याचे श्रेय त्याच्यातील समृद्ध पौष्टिक मूल्यांना दिले जाऊ शकते. खोबरेल तेलात चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्स आहेत. खोबरेल तेलात बहुतेक कॅलरीज फॅट्स मधून येतात. खोबरेलतेलात असलेल्या 90% फॅट्स मध्ये संतृप्त चरबी (Saturated fat) असते. आरोग्यासाठी सॅचुरेटेड फॅट्स चांगले नसतात. पण खोबरेल तेलातीलअर्ध्या सॅचुरेटेड फॅट्स मध्ये लॉरीक ॲसिड असल्याने तेआपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू शकते. खोबरेल तेलामध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाणजास्त असल्याने जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी तेल कमी प्रमाणातवापरणे चांगले. खोबरेल तेल जेवणात फोडणीसाठीतसचं भाकरी-पोळी सोबत वापरापण तळण्यासाठी नकोच.


चेहऱ्यासाठीखोबरेल तेलाचे फायदेः

आपल्याखोबरेल तेल उत्तम आहेहे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाही. त्वचेच्या अनेक समस्यांवरील उपचारांसाठीहे जुन्या काळापासून घरोघरी वापरले जाते. आपल्या चेहऱ्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.


मुरुमांवरउपचार करण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे :

खोबरेलतेल मुरुमांवर एक प्रभावी उपायआहे. मुरुमांच्या उपचारासाठी कच्च खोबरेल तेलवापरू शकता. मुरुमांवर खोबरेल तेल लावल्याने मुरुमातीलकिडे मरतात. आपण चमचाभर तेलपिऊ शकता. नियमित खोबरेल सेवन केल्याने मुरुमयेत नाही. आपण आपल्या फेसपॅकमध्ये खोबरेल तेल देखील वापरूशकता. मध आणि खोबरेलतेल एकत्र करून चेहऱ्याला लावल्यानेचेहरा चमकदार होतो. मृत त्वचा निघूनजाते.


सुरकुत्यावरउपयुक्त :

त्वचेवरसुरकुत्या पडणे कोणालाही आवडतनाही. अनेकदा लोक सुरकुत्या रोखण्यासाठीकिंवा लपवण्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधने वापरतात. खोबरेल तेल हा सुरकुत्यावर उपचार करण्याचा एक नैसर्गिक उपायआहे. फ्री रेडिकल हेत्वचा वयस्कर दिसण्याचे प्रमुख कारण आहे.खोबरेलतेलाचा अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्स काढूनटाकण्यास मदत करते, ज्यामुळेत्वचा म्हातारी होण्याची प्रक्रिया कमी होते आणिसुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. खोबरेलतेल कोरड्या त्वचेला मुलायम बनवते.


चमकदारत्वचा मिळवण्यास मदत करते :

खोबरेलतेलाने मालिश केल्याने आपल्याला निरोगी आणि तेजस्वी त्वचामिळते. हे रक्ता भिसरणवाढवते, मृत त्वचा काढूनटाकते आणि आपली त्वचाहायड्रेट करते. हे एक नैसर्गिकमॉइश्चरायझर आहे जे आपल्याचेहऱ्यावर एक नैसर्गिक चमकआणते.


डोळ्यांखालीयेणारी वर्तुळे:

डोळ्याखालीलकाळी वर्तुळे घालवण्यासाठी खोबरेल तेल प्रभावी आहे. काळी वर्तुळ रोखण्यासाठी, खोबरेल तेल घ्या आणिबोटांनी डोळ्यांखाली गोलाकार मसाज करा. नियमितपणेकेले पाहिजे. एका आठवड्यात आपल्यालाफरक दिसून येईल.


कोरडेओठ मऊ करते:

खोबरेलतेल ओठांच नैसर्गिक मलम आहे.तेओठांना मॉइश्चरायझ करते, खोबरेलाच्या तेलाचा उपयोग कोरड्या ओठांना मऊ गुलाबी बनवते. रात्री झोपताना ओठांवर खोबरेल तेल लावून ठेवाआणि फरक बघा.


चेहर्‍यावरील कोरडे पॅचेस काढून टाकते:

त्वचेचाकोरडेपणा आणि त्यानंतर पॅचयेणे ही समस्याच आहे. खोबरेल तेल कोरड्या त्वचेवरलावल्यास त्वचेचे मॉइस्चरायझिंग करते आणि आपलीत्वचा मऊ आणि गुळगुळीतकरते.


लालआणि थकलेले डोळे

लालथकलेले डोळे आपल्या डोळ्यांच्यासौंदर्यावर विपरित परिणाम करतात. सतत स्क्रीन समोरकाम करून जर डोळेथकत असतील किंवा संसर्गाने लाल होत असतीलतर डोळ्याभोवती खोबरेल तेलाची मालिश डोळ्याच्या पिशवीवर उपचार करण्यास मदत करते. यामुळेडोळ्याचा लालसरपणा आणि थकवा कमीहोतो.


केसांसाठीखोबरेल तेलाचे फायदे :

खोबरेलतेल आपल्या केसांसाठी एक वरदान आहे. आज बाजारात मोठ्या प्रमाणात खोबरेल तेल उपलब्ध आहे. पण व्हर्जिन किंवा कच्चे खोबरेल तेल सर्वोत्कृष्ट आहे. खोबरेल तेलाचा नियमित वापर आपल्या केसांनाखालील फायदे देऊ शकतो.


नैसर्गिककंडिशनर:

खोबरेलतेल एक नैसर्गिक कंडीशनरआहे. हे केसांची पोतसुधारते आणि केस मऊआणि चमकदार ठेवते. झोपायच्या आधी कोमट खोबरेलाच्यातेलाने मालिश केल्याने आपले केस निरोगीलांबसडक बनतात.


केसांचेरक्षण करण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे:

सूर्याचेकिरण आणि पर्यावरणीय प्रदूषणआपल्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. पणआपण खोबरेल तेलाच्या वापराने हे नुकसान थांबवूशकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने केसांचे पोषण होत कारणत्यात प्रथिने आणि नैसर्गिक आम्लअसतात जी आपल्या केसांसाठीफायदेशीर असतात.


केसगळणे :

केसगळतीसाठी खोबरेल तेल लावणे हाएक जुना उपचार आहे. हे आपल्या टाळूचे पोषण करून केसांच्यावाढीस चालना देते. जर केस गळतअसतील तर झोपण्याच्या वेळीकोमट खोबरेल तेलाने केसांना बोटांनी मुळातून हळूहळू मालिश करा. आपल्याला काहीआठवड्यांत फरक दिसून येईल.


उवांचाउपचार करण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे :

आपल्याकेसात उवा होणे खरोखरलाजिरवाणे असू शकते. उवांनादूर करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारातउपलब्ध आहेत, परंतु त्यातील रसायने आपल्या केसांचे नुकसान करू शकतात. खोबरेलतेल हा उवा काढूनटाकण्याचा एक नैसर्गिक उपायआहे कारण त्यात फॅट्सअसतात ज्यामुळे उवांचा दम घोटतो तसेचतेलाने उवा केसात स्थिरराहू शकत नाहीत. ओल्याकेसांवर खोबरेल तेल लावू शकताआणि नंतर उवा काढूनटाकण्यासाठी बारीक कंगवा वापरून केस विंचरा.


त्वचेसाठीखोबरेल तेलाचे फायदेः:

खोबरेलतेल आपल्या त्वचेला आश्चर्यकारक फायदे प्रदान करते. हे तेल आपल्यात्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते असेकाही मार्ग खालीलप्रमाणे आहेत.


मॉइश्चरायझरम्हणून वापर :

खोबरेलतेल एक उत्तम मॉइश्चरायझरआहे. हे त्वचा मऊ, कोमल आणि गुळगुळीत देते. खोबरेलाचे तेल शॉवरनंतर शरीरावरलावा किंवा आपण कोमट पाण्यामध्येखोबरेल तेल घालून आंघोळकरा. बाजारामध्ये उपलब्ध साबणांमध्ये खोबरेल तेल वापरले जाते.


खरुजवर प्रभावी

त्वचेवरकोरडी खाज सुटणे, पुरळउठणे असा प्रकार म्हणजेनायटा किंवा खरुज. ती बरी करण्यासाठीखोबरेल तेल एक प्रभावीउपाय आहे. त्या जागीखोबरेल तेल लावू शकताकिंवा आपण ते चमचाभरपिऊ शकता. तेल कोरडे पॅचमॉइश्चराइज करते आणि खाजकमी करते. खोबरेल तेलातील एंटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियलगुणधर्म इसब किंवा नायट्यावरउपचार करण्यास मदत करतात.


स्ट्रेचमार्क जाण्यासाठी उपयोगी

जर शरीराचे वजन कमी जास्तहोत असेल तर गुलाबीकिंवा पांढर्‍या रेषा शरीरावरयेतात. गर्भधारणेदरम्यान, तारुण्यात किंवा अचानक वजन वाढल्यामुळे येऊस्ट्रेच मार्क शकतात. स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी झोपताना अंगाला कोमट कच्च खोबरेलतेल लावू शकता. गर्भधारणेदरम्यानस्ट्रेच मार्क्स आले तर आपणतेल आपल्या पोटावर लावू शकता किंवाआपल्या आहारात खाऊ शकता.


सर्वांगीणआरोग्यासाठी उपयुक्त :

खोबरेलतेल आजच नव्याने वापरा. खोबरेल तेलातील बॅक्टेरियाविरोधी, अँटी-फंगल आणिअँटी-व्हायरल गुणधर्म बुरशी, विषाणू आणि बॅक्टेरियांमुळे होणाऱ्यासंसर्गजन्य रोगांचा सामना करण्यास मदत करतात. हेसर्दी, फ्लू आणि संक्रमणरोखते. त्याचे सुंदर आरोग्यलाभ खालीलप्रमाणे आहेत.


कोलेस्ट्रॉलपातळी कमी करते:

कोलेस्टेरॉलचीसामान्य पातळी शरीरासाठी आवश्यक असते. खोबरेल तेलाचे सेवन केल्यास खराबकोलेस्ट्रॉल कमी होते आणिकोलेस्टेरॉलची पातळी चांगली होते. आधी सांगितल्याप्रमाणे, खोबरेल तेलातअसलेले लॉरिक ॲसिड चांगले एचडीएलकोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करते.


दातांचीकाळजी :

खोबरेलतेलातील एंटी-फंगल आणिअँटी-मायक्रोबियल गुणधर्म तोंडातल्या जंतूंच संक्रमण रोखतात. दात किडणे, श्वासदुर्गंधी कमी करते. खोबरेलतेलामुळे कॅल्शियम सारख्या खनिजांचे पोषण वाढते, यामुळेदात मजबूत बनण्यास मदत होते. चमचाभरखोबरेल तेल तोंडात ठेऊनगुळण्या करा.


लघवीचासंसर्ग आणि किडनी

मूत्रप्रणालीत मूत्रपिंड म्हणजे किडनी, गर्भाशय, मूत्राशय आणि मूत्रमार्ग असतात. मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग आणि जळजळ हीएक समस्या आहे, विशेषत: महिलांमध्ये. खोबरेल तेलाचे सेवन केल्याने हानिकारकजीवाणू, बुरशी आणि विषाणू नष्टहोतात ज्यामुळे संसर्ग कमी होतो. हेकिडणी स्टोन विरघळण्यास देखील मदत करते. खोबरेलाच्यातेलाचे नियमितपणे सेवन केल्यास किडनीच्याआजारापासून बचाव होतो.


अल्झायमररोग:

अल्झायमररोग हा मेंदूचा विकारआहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशी नष्ट व्हायलासुरुवात होते. बर्‍याच अभ्यासांमधूनअसे दिसून आले आहे कीखोबरेल तेलाचा वापर अल्झायमर रोगातमेंदूच्या कार्याला चालना द्यायला मदत करतो कारणत्यात मिडल चेन ट्रायग्लिसरायड्सअसतात.


यकृताचेसंरक्षण (LIVER PROTECTION)

खोबरेलतेल लिव्हरमधून विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्याचीअँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी फ्री रॅडिकल्स काढूनटाकण्यास मदत करते, जीलिव्हरला हानी पोहोचवू शकतात. अभ्यासातून असे दिसून आलेआहे की खोबरेल तेलहेपेटायटीस सीच्या उपचारात देखील मदत करते.


वजनकमी करण्यास मदत करते:

वजनकमी करणे एक तसेकठीण काम आहे, पणखोबरेल तेल तुम्हाला मदतकरू शकते. ह्या तेलात अद्वितीयअसे हलके फॅटी ॲसिडअसतात, जे शरीरात इतरचरबींसारखे चरबी म्हणून साठवलेजात नाहीत. खोबरेल तेल चयापचय वाढवतेआणि कॅलरी बर्न करण्यात मदतकरते. खोबरेल तेल थोडे जेवणातखाल्याने वाढलेली चरबी कमी होतेआणि कमरेचा घेर कमी होतो.


खोबरेलतेलाचे इतर फायदे:

फिलीपिन्समध्येझालेल्या संशोधनाने हे सिद्ध केलेआहे की खोबरेल तेलातलॅरिक ॲसिड एचआयव्ही / एड्सविरूद्ध प्रभावी आहे कारण त्याच्यातविषाणूविरोधी गुणधर्म आहेत. आतापर्यंत आईचे दुध हेलॉरीक ॲसिडचे एकमेव स्त्रोत होते जे स्तनपानदेणा-या अर्भकांमध्ये HIV संक्रमणकमी करते. अशा प्रकारे खोबरेलाच्यातेलाचे नियमित सेवन प्रतिकारशक्ती सुधारतेआणि आजार कमी करते.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page