top of page
Search

गुळवेलाचे फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 17, 2021
  • 3 min read

गुळवेलाचेफायदे

भारतीयआयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या जडीबुटीआणि वनौषधींचा समावेश केलेला आहे. सर्दी -खोकल्यापासूनते अगदी कॅन्सरसारख्या जटीलआजारांमध्ये देखील अनेक औषधी जडीबुटीउपयुक्त ठरतात. भारतात अगदी सहजपणे आढळणारीगुळवेल (Giloy In Marathi) अनेक असाध्य आजारांवर उपायकारक आहे. गुळवेलीच्या मुळापासूनते गुळवेलीच्या पानांपर्यंत गुळवेलीचा प्रत्येक भाग हा आयुर्वेदामध्येमहत्त्वाचा मानला गेला आहे. गुळवेलीलाआयुर्वेदामध्ये व हिंदीमध्ये गिलोयअसे म्हणतात. गुळवेल या एकमेव औषधीमध्येवातनाशक आणि कफ नाशकगुणधर्म असतात. यामुळे वात आणि कफदोषामुळे होणार्‍या सर्व प्रकारच्याआजारांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो. गुळवेलीला अनेक भाषांमध्ये वेगवेगळीनावे आहेत. मधुपर्णी, गुरुची, अमृता, रसायनी ही गुळवेलची इतरनावे आहेत. Tinospora cordifolia हे गुळवेलाचे Botanical name आहे.


गुळवेलाचे फायदे

1. एकसारखे बैठे काम किंवाहार्मोनल असंतुलनामुळे काही लोकांचे वजनजास्त वाढते. वजन नियंत्रणात आणण्यासाठीगुळवेलीचा उपयोग अगदी प्राचीन काळापासूनकेला जातो. नियमितपणे एक ते दोनचमचे गुळवेलीचाज्यूस रोज सकाळ-संध्याक‍ाळ सेवन केल्यासआपले वजन एक तेदोन महिन्यांमध्ये कमी होते. तसेचवजन अगदी आपल्या उंचीनुसारयोग्य प्रमाणात नियंत्रणात राहते.


2. गुळवेलीचाउपयोग रोग प्रतिकारक क्षमतावाढविण्यासाठी केला जातो. डेंग्यू ,चिकुनगुनिया, ताप, व्हायरल फ्ल्यु, कोरोना तसेच प्लेटलेट्स कमीकरणारे सर्व रोग वआजारांवर पुढील उपचार करावा. गुळवेल (Giloy In Marathi) +कोरफडीचा गर+ पपईची पाने+ डाळिंब +तुळशीची १०-१५ पानेयांना एकत्र दळून घ्यावे. या मिश्रणाचा रस वस्त्रगाळ करुनघ्य‍ावा. रुग्णास हारस दिवसातून तीन वेळा द्यावा. या उपायाने अगदी एका दिवसात 25000 प्लेटलेट्‌स वाढतात वरुग्णाची तब्येत स्थिर होते. डेंग्यु,मलेरिया, चिकनगुनिया, फ्ल्यु या आजारांमध्ये प्लेटलेट्‌सचे प्रमाण कमीझाल्यामुळेच लोकांचे मृत्यू होतात. गुळवेल (Giloy In Marathi) आणि पपईच्या पानामध्येप्लेटलेट्‌सचे वाढवण्याचे गुणधर्मअसतात. त्यामुळे हा उपाय अतिशयप्रभावी ठरतो.


3. जखमझाल्यास किंवा सूज आल्यास गुळवेलीच्या पानांचालेप त्या जागी लावल्याससूज उतरते व जखमा देखीललवकर भरून येतात. केसगळती होणे, केसांत चाई पडणे, टक्कलहोणे, केसांत कोंडा होणे, केसांच्या संबंधित विविध समस्या निर्माण होणे यामध्येदेखील गुळवेलीचारस रोज नियमितपणे सकाळीउपाशीपोटी प्यायल्यास सर्व समस्या दूरहोतात.


4. डोळ्यांच्यासर्व समस्यांवर गुळवेलीचा अतिशय लाभ होतो. डोळ्यांमध्येखाज सुटणे, डोळ्यांमधून एकसारखे पाणी येणे, डोळेसतत लाल होणे, डोळ्यांनासूज येणे, डोळे येणे, डोळ्यांचीदृष्टी कमी होणे, चष्म्याचानंबर येणे या वयासारख्या डोळ्याशी संबंधित सर्व विकारांवर गुळवेलीचाउपयोग केला जातो. रोजसकाळी उपाशी पोटी गुळवेलीचे ज्यूसप्यायल्यामुळे डोळ्यांसंबंधित सर्व विकार बरेहोतात तसेच व्यक्तीची दृष्टीनितळ व निकोप होते.


5. आपल्या शरीराच्यामेटाबोलिजमसंबंधी होणारे आजार जसे डायबेटिस, हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लडप्रेशरचा त्रास होणे यासारख्या आजारांवरगुळवेलीचा काढा व गुळवेलीच्यापानांचा रस पिणे लाभदायकअसते. लिव्हरसंबंधी आजारांमध्ये देखील गुळवेलीचा उपाय आपल्याला फायदेशीरहोवू शकतो.गुळवेलीचा सेवनामुळेआपली पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे आपले पचन तंत्रचांगले होते. खाल्लेले अन्न चांगल्याप्रकारे पचलेजाते त्यामुळे आपल्या शरीराचा मेटॅबोलिझम सुधारतो व मेटॅबॉलिझम संबंधितअसलेल्या या आजारांमध्ये फरकपडुन लवकर उपाय होतो.


6. डायरिया, जुलाब, उलट्या यासारख्या आजारांमध्ये गुळवेलीचा पानांचा रस किंवा गुळवेलीचामुळीचा किंवा पानांचा काढा करून प्यायल्यामुळेहे आजार मुळापासून बरेहोतात.दीपम पाचन वगुळवेलीमधील अौषधी गुणांमुळे डायरिया लवकर बरा होतोव आटोक्यात येतो.


7. गूळवेलीमध्ये वातनाशक गुण असतात. त्यामुळेसर्व प्रकारच्या वात विकारांमध्ये गुळवेलीचा (Giloy In Marathi) उपयोगव वापर केला जातो. सर्व प्रकारच्या सांधेदुखीच्या दुखण्यांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो. गुळवेलीच्या पानांचा ज्यूस किंवा काढा करून प्यायल्यामुळेसांध्यांची सूज आणि सांधेदुखणे थांबते व सांधेदुखीमध्ये चांगलाआराम मिळतो.


8. लहानबालकांमध्ये भूक मंदावणे, भूकन लागणे अशा समस्या नेहमीचपाहायला मिळतात. तसेच लहान मुलेतापामुळे नेहमी चिडचिड करतात. लहान मुलांची पचनशक्तीदेखील अतिशय अशक्त असते. याकरता त्यांचे पचन सुधारावे वअन्नपचन चांगले व्हावे याकरता लहान बालकांना गुळवेलीचेसत्त्व किंवा गुळवेलीचा काढा देण्यात यावात्यामुळे मुलांना चांगली भूक लागते वमुलांची तापामुळे होणारी किरकिर देखील कमी होते.


9. जखमझाली असल्यास किंवा सूज आली असल्यासगुळवेलाच्या (Giloy In Marathi) पानांचा लेप बनवून त्याजागी लावल्यास आराम मिळतो. मात्रगुळवेलीचा लेपाचा प्रयोग आपल्या शरीरावर व त्वचेवर लावण्याअगोदरटेस्ट करावे. जर गुळवेलीचा लेपत्वचेवर लावल्यामुळे आपल्याला खाज, फोड, चट्टे, पुळ्य‍, सूज किंवा कुठल्याहीप्रकारचे रॅशेस येत नाहीत नायाची खात्री करून घ्यावी.कारणबर्‍याचशा लोकांनागुळवेलामुळे ॲलर्जी होते. गुळवेलीचा लेप शरीरावर वत्वचेवर लावण्यासाठी आपण नेहमी मधकिंवा दुधासोबतच गुळवेलाच प्रयोग करावा.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page