गरोदरपणाचे निदान
- divipawar94
- May 12, 2021
- 2 min read

कोणत्याही स्त्रीसाठी आई होणे ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि आनंदीदायी गोष्ट असते. पण गरोदरपणा अशी स्थिती आहे जी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. गरोदरपणासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. काही स्त्रिया अशा असतात ज्यांना लग्नानंतर आपण लवकर गरोदर व्हावे असे वाटते. मात्र फक्त वाटून काही उपयोग नाही तर त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या गोष्टी सामन्य स्त्रियांना माहित नसतात. आज याच गोष्टी टिप्सच्या रुपात आम्ही या लेखातून सांगणार आहे. आपण आज जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने स्त्री लवकर गरोदर राहू शकते आणि आई होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. या टिप्स जाणकारांकडूनच दिल्या गेल्या असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मात्र मनाची शंका दूर करण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
गरोदरपणाची प्राथमिक लक्षणे
गरोदरपणाची सुरुवातीची लक्षणे सर्वच स्त्रियांमध्ये एकसारखी नसतात. काही स्त्रियांमध्ये गरोदरपणाची लक्षणे पहिल्या आठवड्यापासूनच दिसून येतात आणि काही स्त्रियांमध्ये दोन ते तीन आठवड्यांचा काळ लागू शकतो आणि त्यानंतर त्यांच्यात लक्षणे दिसून येतात. मासिक पाळी उशिरा येणे, स्पॉटिंग किंवा हलक्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे, सतत भीती वाटणे, मळमळ होणे, उलटी होणे, जेवणाला चव न येणे, वारंवार लघु शंका होणे, बद्धकोष्ठतेची समस्या वाढणे, पोटात जळजळ निर्माण होणे, स्तनांना सूज येणे अशी लक्षणे गरोदरपणाची सामान्य लक्षणे म्हणून ओळखली जातात.
1) मासिक पाळीवर लक्ष
जर स्त्रीला आई व्हायचे असेल तर तिने यावर लक्ष ठेवले पाहिजे की तिच्या मासिक पाळीचा पहिला दिवस दर महिन्याला एकाच दिवशी येतोय का, जर येत असेल तर ती नियमित मासिक पाळी असते. जर हे स्वरूप दर महिन्याला बदलत असेल तर याला अनियमित मासिक पाळी म्हणतात. यानुसार स्त्री डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा स्वत:हून यावर लक्ष ठेवून हे ठरवू शकते की ती कधी ओवूलेट होऊ शकते. हि ती वेळ असते जेव्हा तिची ओवेरी दर महिन्याला एक अंडे सोडते.
2) ओव्युलेशनचे दिवस आणि संकेत
स्त्रीने आपल्या ओव्युलेशनच्या दिवसांकडे लक्ष ठेवण्यासाठी एक कॅलेंडर बनवून ठेवावे. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या 11 ते 21दिवसांच्या दरम्यान ओव्युलेशन होते. स्त्रीने सोबतच आपल्या शरीरातील ओव्युलेशनचे संकेत ओळखण्यास सुरुवात करायला हवी. गर्भाशय ग्रीवा मधून निघणाऱ्या म्युकस मध्ये बदल नजरेस येणे हा पहिला संकेत असतो. अजून असे अनेक संकेत ओळखल्यास वेळीच पुढील पाऊले उचलण्यास मदत मिळते आणि गरोदर होण्यासाठी वेळीच आवश्यक उपाय करता येतात.
3) फर्टिलिटी डाएटवर भर
याबद्दल फार कमी कपल्सना ठावूक असते. फर्टिलिटी डाएट म्हणजे तुमची प्रजनन क्षमता वाढवणारा आहार होय. गर्भधारणेसठी प्रजनन क्षमता सुद्धा मजबूत असणे गरजेचे असते आणि ती अधिक सक्षम करायची असेल तर तुम्ही फर्टिलिटी डाएटला महत्त्व देणे गरजेचे आहे. यातील पदार्थ ओव्युलेशनला नियंत्रित करून प्रजनन तंत्राला सपोर्ट करतात आणि स्त्रीला गरोदर राहण्यात मदत करतात. या फर्टिलिटी डाएटमध्ये असे पोषक तत्वे असतात हे हार्मोन्सना संतुलित करतात आणि पुरूषांमध्ये निरोगी स्पर्म्स आणि स्त्रियांच्या एग्ज क्वालिटीमध्ये सुधारणा आणण्याचे काम करतात.
4) एस्ट्रोजन
हा गरोदर राहण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. स्त्रियांच्या शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन मध्ये संतुलन कायम राहिले पाहिजे त्यामुळेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता राहते. जर यापैकी कोणताही एक हार्मोन जास्त झाला तर दुसऱ्या हार्मोनचा स्तर आपोआप कमी होऊ लागतो. म्हणून गरोदर होण्यासाठी काही अशा पदार्थांचे सेवन करावे जे एस्ट्रोजनचा स्तर वाढवतात. या पदार्थांमध्ये गाजर, छोले आणि अन्य पदार्थांचा समावेश आहे. तुम्ही डॉक्टर व डाएटिशीयनचा सल्ला घेतलात तर तुम्हाला एस्टोजनचा स्तर वाढवणारे अनेक चांगले पदार्थ ते सांगू शकतात. तर तुम्हालाही लवकर गरोदर राहायचे असेल तर या काही टिप्सचा नक्की वापर करा आणि त्याचे तुम्हाला चांगले व अपेक्षित परिणाम नक्की दिसून येतील व लवकरच तुमच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचे आगमन होईल.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher)
[योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments