गर्भ धारणेपूर्वीची शरीर व बीज शुद्धीचे महत्व
- divipawar94
- May 12, 2021
- 2 min read

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे म्हटले आहे. सृष्टीतील हाच नियम मानवी शरीरालाही लागू पडतो. ज्या बीजापासून संपूर्ण मनुष्य आकृती तयार होते त्याच बिजात त्या मनुष्याचे सर्व शरीर सूक्ष्म किंवा अव्यक्त रूपात असते. स्त्री-पुरुष बीज संयोगातून पुढे त्यास व्यक्त स्वरूप येते आणि म्हणून हेच स्त्रीबीज व पुरुषबीज शुद्ध असणे आवश्यक आहे.
बीज शुद्धी म्हणजे काय?
प्रत्येक स्त्रीबीज वा पुरुष बिजावर त्या-त्या स्त्री-पुरुषाचा प्रभाव असतो, म्हणूनच होणारे बाळ हे आई-वडिलांचा रंग रूप गुण इत्यादी घेऊन येत असते. ज्याप्रमाणे चांगले गुण बीजातून बाळाकडे येतात. त्याच प्रमाणे आईवडिलांचे काही दोष व आजार ही बाळाकडे येत असतात. उदाहरणार्थ, ज्यां घरांमध्ये डायबेटिस,ब्लडप्रेशर, कॅन्सर, सोरियासिस, थायरॉईड किंवा अंगावर पांढरे डाग असणे इत्यादी आजार आई वडील व आजी-आजोबांना असतात. ते आजार बाळाकडे येण्याची संभावना खूप असते. आई-वडिलांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीचा परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, आईच्या अतिप्रमाणात आंबट,तिखट, आंबवलेले पदार्थ जास्त खाण्यामुळे बाळाला त्वचाविकार होऊ शकतात. हे आजार बिजा मधून बाळाकडे जाऊ नयेत म्हणून जी उपचार पद्धती आयुर्वेदात सांगितली आहे, तिला बीज शुद्धी चिकित्सा असे म्हणतात. यामध्ये गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या Couples ची प्रथम शरीरशुद्धी केली जाते आणि नंतर योग्य आहार व औषधे दिली जातात आणि त्यानंतर गर्भधारणेचा सल्ला दिला जातो. या चिकित्सेमुळे स्त्री शरीर गर्भधारणेसाठी योग्य व सक्षम होते.
चिकित्सेसाठी लागणारा कालावधी
ज्या जोडप्याना ही गर्भ धारणेपूर्वी बीज शुद्धी ची चिकित्सा करून घ्यायची आहे, त्यांना असणाऱ्या शारीरिक व्याधी नुसार चिकित्सेचा कालावधी तीन ते सहा महिन्यापर्यंत असतो.
गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी करून घेण्याचे फायदे
1) अनुवंशिक आजार गर्भामध्ये येण्याची शक्यताकमी असते.
2) होणारे मूल निरोगी होते.
3) बाळाचा वर्ण व बुद्धी उत्तम होते.
4) बाळाचे व्याधी क्षमत्व होते.
5) जे पालक आईवीएफ(IVF) करणार आहेतत्यांच्या बीजाची quality चांगली होण्यासाठी हेअत्यंत उपयुक्त उपचार आहेत.
6) त्यामुळे आई वी एफ(IVF) चा failure rateफार कमी होतो.
7) वारंवार गर्भस्राव किंवा गर्भपात होणाऱ्याजोडप्यासाठी अत्यंत उपयुक्त चिकित्सा.
8) गर्भ धारणेपूर्वीची शरीर व बीज शुद्धी ही काळाचीगरज आहे.
9) कित्येक मूल नसणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यातआनंद निर्माण होणे म्हणजेच आतापर्यंतच्याअभ्यासाला आलेले यश होय आणि हा खूपच सुखदअनुभव आहे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher)
[योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments