गर्भसंस्कार PART 1
- divipawar94
- Nov 16, 2022
- 3 min read
गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते कसे करावेत?
बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते. प्रत्येक आई-वडिलांचेच आपल्या मुलाचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते. घरात लहान बाळ येणार असलं की त्याची तयारी घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने करु लागतो. मग त्या नव्या पाहुण्याचे स्वागत कसे करायचे ? त्याला कम्फर्टेबल वाटेल अशी घरातील जागा कोणती? त्याचं नाव काय ठेवायचं? त्याच्यासाठी शॉपिंग काय करायची? याविषयी घरातील सर्वजण उत्सुक असतात. तर आई-वडिलांचा आनंद तर या काळात गगनी मावत नसतो. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात. जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहवं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते त्यापैकीच गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बालावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भावस्थे दरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मुल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय!
महर्षि वेद व्यास स्मृती शास्त्रानुसार
गर्भाधानं पुंसवनं सीमंतो जातकर्म च।
नामक्रियानिष्क्रमणेअन्नाशनं वपनक्रिया:।।
कर्णवेधो व्रतादेशो वेदारंभक्रियाविधि:।
केशांत स्नानमुद्वाहो विवाहाग्निपरिग्रह:।।
त्रेताग्निसंग्रहश्चेति संस्कारा: षोडश स्मृता:।
हे सोळा संस्कार आहेत - गर्भधारणा, पुंसवन, सिमंतोनयन, जातकर्म, नाम करण, निष्क्रमण, अन्नप्राशन, मुंडन, कर्णवेधना, उपनयन, विघ्रंभ, केशांत, संवर्तन, विवाह, विवाह अग्नि संस्कार आणि शेवटी अंत्यसंस्कार. यापैकी गर्भसंस्कार हे अत्यंत जरुरी आणि महत्त्वाचे वर्णन केले आहे. गरोदर स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला या संस्काराद्वारे संस्कार दिले जातात जेणेकरून तो या जगात आल्यावर प्रतिभावान बनतो, चांगला माणूस बनतो, चांगल्या मार्गावर चालतो आणि वाईटापासून दूर राहतो. त्याच्या अद्वितीय आणि दैवी प्रतिभेने समाजात बदल घडवून आणा आणि त्याला विकसित विचार द्या. चला तर मग जाणून घेऊया गरोदर स्त्री आणि तिच्या गर्भाच्या सुरक्षेसाठी कोणते संस्कार केले जातात आणि संस्काराशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट जी आपल्या शास्त्रात लिहिली आहे
याची अनेक उदाहरणे आपणास पाहायला मिळतात जिजाऊ ह्या शुर मातेच्या पोटी जन्मलेले त्यांचे शुर पुत्र शिवराय,जिजाऊ ह्या शिवबा त्यांच्या गर्भात असताना सुदधा घुडसवारी,तलवारबाजी करत होत्या. परिणामी त्यांच्या पोटातुन देखील शुर योदधा ह्या पृथ्वीवरून जन्माला आला.आणि जेव्हा मोगल सत्तेमुळे भारत त्रस्त झाला होता तेव्हा जिजाऊंना जनतेची ही अवस्था पाहावली जात नव्हती म्हणुन त्या मनोमन नेहमी हीच ईच्छा बाळगायच्या की देशाचे संरक्षण करण्याकरीता माझ्या पोटी एक शुरवीर बालक जन्माला यावा.आणि तेव्हा शिवबा हे जिजाऊंच्या गर्भात होते. शिवबा जन्माला आल्यावर आपल्या मातेचे हेच राष्टप्रेमाचे राष्टसंरक्षणाचे विचार भावना आणि शौर्याचे गुण शिवबांमध्ये देखील पाहायला मिळाले. स्वामी विवेकानंद आपल्या आईच्या गर्भात असताना त्यांच्या माता ध्यानधारणा करीत होत्या. अणि हेच ध्यानधारणेचे,वैचारिक संस्कार विवेकानंद यांच्यावर आईच्या पोटात असतानाच झाल्याने पुढे जाऊन जन्माला आल्यावर स्वामी विवेकानंदाच्या रूपात एक ध्यानयोगी सर्व जगाला लाभला. यावरून आपणास कळून येईल की प्राचीन काळापासुनच गर्भसंस्कार हे खुप महत्वाचे मानले जाते. याचसोबत अजुन एक उदाहरण आपल्यासमोर आहे ते म्हणजे अभिमन्यू आणि सुभद्रा यांचे.जेव्हा सुभद्रेला अभिमन्यू तिच्या गर्भात असताना अतिशय तीव्र प्रसुती वेदना होत होत्या तेव्हा अजुर्नाने सुभद्रेचे लक्ष तिच्या वेदनेवरून हटवायला तिला चक्रव्युह मध्ये कसा प्रवेश करतात हे सांगितले होते. म्हणुन आईच्या गर्भात असतानाच चक्रव्युह भेदनाची शिक्षा प्राप्त झाल्याने अभिमन्यु कौरव पांडव यांच्यात झालेल्या युदधात कौरवांने रचलेल्या चक्रव्युहचे भेदन करू शकला होता.
काय असतं गर्भसंस्कार?
पारंपारिक मान्यतांनुसार बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरु होतो आणि याच काळात त्याची पर्सनॅलिटी देखील विकसित होते. खूप पूर्वीपासूनच विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे. Research अनुसार विचार केला तर बाळाच्या ५०% मेंदूचा विकास हा गर्भामध्येच होतो. भारतीय संस्कृती नुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. महाभारतामध्ये अर्जूनचा मुलगा अभिमन्यूने देखील आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
DR. DIVYA PRAKASH PAWAR – RATHOD
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments