top of page
Search

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी उपाय

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 28, 2021
  • 3 min read

सुंदरआणि उजळ कांती असलेल्यालोकांना पाहताच क्षणी आपल्याला भुरळ पडते. पणचेहऱ्यावरचा ग्लो काही एकारात्रीत मिळत नाही त्यासाठीकाही उपाय नक्कीच करावेलागतील. सध्याच्या धावपळीच्या जीवनात तसेच प्रदूषणाने भरलेल्यादूषित हवेत काही नैसर्गिकउपायच कामी येतील. असेचत्वचा चमकदार दिसण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपायह्या लेखातून जाणून घेऊया.


चेहऱ्यावर ग्लोयेण्यासाठीकाहीमहत्वाच्याटिप्स

1. चेहरास्वच्छठेवा

दररोजदोनदा चेहरा ताज्या पाण्याने धुवा आणि कधीहीकोणत्याही प्रकारचे मेकअप चेहऱ्यावर ठेवून झोपू नका. ह्यानेत्वचेला ग्लो येईल (Glowing Skin Tips In Marathi) आणि त्वचा चमकदारदिसेल.


2. नैसर्गिकमॉइश्चरायझर – मध

नैसर्गिकशुद्ध मध आपल्या त्वचेसाठीवरदान आहे. जेव्हा जेव्हाचेहरा फाटल्यासारखा निस्तेज होताना दिसेल तेव्हा थेट चेहऱ्यावर थोडासामध लावा. मधात मुरुम कमीकरण्यात मदत करणारे अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-इंफ्लेमेटरीगुणधर्म आहेत. मध लावल्याने चेहऱ्यावरनक्की ग्लो येईल आणित्वचा चमकदार दिसेल.


3. कोरफडलावाचेहराचमकदारदिसेल

बागेतकोरफड वनस्पती लावा आणि त्याचीपाने कापून त्यातला गर काढून चेहऱ्यावरथेट घासा. किंवा तुम्ही बाजारात मिळणारे ॲलोवेरा जेल घेऊन रात्रभरचेहऱ्यावर लावून ठेवा. कोरफड लावल्याने चेहरा उजळेल (Glowing Skin Tips In Marathi).


4. घरच्याघरीतयारकरुशकताअसेफेसमास्क

A. मुलतानीमाती, एक चिमूटभर हळद, गुलाब पाणी

B. हरभरापीठ (बेसन), एक चमचा दही, हळद आणि कोरफड किंवाॲलोवरा जेल

C. मोंडसूब वापरून केलेला Charcoal Peel mask (हा कोळशासारखा असतो)

D. तांदूळपीठ, दूध, कोरफड जेल

E. कॉफीपावडर + पाणी किंवा कोकोपावडर + पाणी. (हे 5 मिनिटे चेहऱ्यावरलावून ठेवा आणि धुवा)


5. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीग्रीनटी

दररोजसकाळी न्याहारीपूर्वी ग्रीन टी प्या आणिचहाच्या त्या पिशव्या थोड्यावेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यांचा वापर चेहरा आणिडोळ्याच्या खाली ठेवण्यासाठी करा. ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतातजे त्वचेला उजाळा देतात, मुरुमांना रोखतात, डोळे शांत करतातआणि डोळ्यांखालील फुगवटा, काळे डाग कमीकरतात.


6. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीबडीशोपआणिओवा

एकूणचत्वचेचे आरोग्य आणि केसांचं आरोग्यसुधारण्यासाठी एक खरोखरच असाएक घरगुती उपाय खाली नमूदकेला आहे. हे वजनकमी करण्यास मदत करते आणिआरोग्य सुधारण्यास मदत करते. कायकरा तर, बडीशेप, ओवा (अजवाइन), जिरे आणि मेथीसमान प्रमाणात घ्या. हे सर्व साहित्यथोडेसे भाजून घ्या आणि बारीकपूड करा. एका घट्टडब्यात ठेवा. हे मिश्रण एककप गरम पाण्यात अर्धाचमचा मिसळा आणि दररोज हेरिकाम्या पोटी प्या. आपणकिमान 30 मिनिटांसाठी काहीही खाणार नाही याची खात्रीकरा आणि औषधाला त्यांचकाम करू द्या. चमकदारत्वचेसाठी आणि चेहऱ्यावर ग्लोयेण्यासाठी हे प्रभावी आहे.


7. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीटोमॅटो

भारतीयस्वयंपाकघरातच आपली त्वचा निरोगीबनविणारी सर्व सामग्री असतानाइतके दिवस आपण कशीशोधू शकलो नाही ह्याचंतुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा जेव्हा आपण उन्हात बराचवेळ घालवितो तेव्हा टोमॅटो अर्धा कापून त्यावर काही थेंब मधकिंवा ॲलोवेरा जेल घाला आणि 5 मिनिटांसाठी चेहऱ्यावर घासा.हे आणखी 5 मिनिटे ठेवा. आणि मग पाण्यानेधुवा. जर तुमची निस्तेजत्वचा असेल तर दररोजटोमॅटो असा घासा आणिटोमॅटोने तुमच्या चेहऱ्यावर चमत्कारिकरित्या ग्लो येईल. चेहराउजळेल. चेहराचमकदार दिसेल.


8. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीखोबरेलतेल

हिवाळ्यातआपण नेहमी रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल मॉइश्चरायझर म्हणूनवापरू शकतो. उन्हाळ्यातही आपण झोपेच्या आधीकोरफड गर किंवा ॲलोवेराजेल आणि खोबरेल तेलमॉइश्चरायझर म्हणून वापरू शकतो. झोपी जाण्यापूर्वी नेहमीआपला चेहरा धुवा.आणि मॉइश्चरायझरलावा. ह्याने आपल्याला सकाळी मऊ, गुळगुळीत चेहरामिळेल.


9. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीएरंडेलतेल :

अलीकडेबरेच लोक एरंडेल तेलसुंदरता वाढवण्यासाठी वापरतात. किंचित कोमट एरंडेल तेलचेहऱ्यावर मालिश करा. आणि साध्यापाण्याने धुवा. कोरड्या त्वचेवर उपचार म्हणून, मुरुम बरी करण्यासाठीं आणिआपल्या त्वचेला मऊ करून चमकदारग्लो देण्यासाठी एरंडेल तेल खरोखर प्रभावीआहे.


10. चेहऱ्यावरग्लोयेण्यासाठीसंत्र्याच्यासालीचीपावडर

उन्हातनारिंगी किंवा संत्रीची साल सुकवून बारीकवाटून घ्यावी. हे कच्चे दूधआणि गुलाबपाण्यासोबत लावा. सध्या फारच प्रदूषण असतंम्हणून ह्या उपायाने निरोगीत्वचा राखण्यास मदत होते.


11. ब्यूटीपार्लरशिवायघरीचफेशियल :

महिन्यातूनएकदा घरगुती उत्पादने किंवा बायोटिकद्वारे मिळणार फेशियल किट वापरुन घरीफेशियल करा. आपला चेहराफेस वॉशने धुवा आणि थोडासाकोरडा करून सुमारे 5 मिनिटेहलका गोलाकार फिरवत आपला चेहरा स्क्रबकरा. आपल्या चेहऱ्यावर मसाज क्रीमने पाचसहा मिनिटांसाठी किंवा आपल्या त्वचेमध्ये शोषून घेईपर्यंत मसाज करा. फेसपॅक लावा. ते 5-6 मिनिटे ठेवा आणि धुवा.


12. खूपहसाआणिसुंदरदिसा :

हसण्यानेत्वचा सुंदर दिसते. ते म्हणतात ना “हसऱ्या स्त्रिया सुंदर स्त्रिया”. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि ज्यादिवशी आनंदी नसाल त्या दिवशीकाही मजेदार कॉमेडी व्हिडिओ पाहा आणि हसा.


13. पुरेसेपाणीप्या.

सर्वातशेवटचे आणि महत्वाचे नेहमीहायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि इतरपेय प्या. पाणी भरपूर प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेवरग्लो येतो. याव्यतिरिक्त, निरोगी त्वचा मिळविण्यासाठी ताज्या भाज्या, फळे, दूध, तूपआणि फळांसह पौष्टिक आहार घेणे आवश्यकआहे.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page