टाचा भेगा उपाय
- divipawar94
- Aug 14, 2021
- 1 min read

वातावरणात बदल झाला की आपल्या शरीराच्या त्वचेत सुद्धा हळू हळू बदल व्हायला सुरू होतो, त्वचा कोरडी पडायला सुरू होते. थंडीचे दिवस चालू झाले की आपल्या त्वचेत फरक पडायला सुरू होतो, पायाला चिरा पडतात. अत्ता तुम्हाला वाटत असेल की हे एवढं काय पण बोलायला खूप सोपे आहे पण ही समस्या खूपच बिकट असते, काही लोकांच्या पायमधून म्हणजेच त्या भेगातून रक्त यायला चालू होते.
१. एलोवेरा जेल
तुम्ही एक बकेट घ्या त्यामध्ये कोमट पाणी असावे त्यामध्ये तुमचा जो पाय ज्याला इजा झाली आहे तो ठेवा, थोड्या वेळाने त्याला साफ करा. नंतर जिथे भेगा पडल्या आहेत आणि जिथून रक्त येते तिथे हे जेल लावा, काही वेळा नंतर जेल सुखले की पायमोजे घाला. हा प्रयोग दोन – तीन दिवस केला की तुम्हाला बरे वाटेल.
२. व्हिटॅमिन – ई
जिथे तुमच्या भेगातून फक्त येते तिथे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल लावणे खूप फायद्याचे आहे, ही कॅप्सूल मेडिकल मध्ये उपलब्ध असते. त्यामध्ये हाइड्रेटिंग गुण असतात त्यामुळे त्वचेला आराम भेटतो. जेव्हा तुम्ही ही कॅप्सूल लावला त्यावेळी धुळी पासून सावध राहा.
३. लिंबू-मीठ-ग्लिसरीन-गुलाबजेल –
हा एक खुप जुना उपाय आहे जो की अगदी फायदेमंद आहे, या सर्व पदार्थाना एकत्र मिक्स करायचे, ज्यावेळी तुम्ही तुमचे पाय स्वछ धुवाल त्यावेळी हे सर्व त्या ठिकाणी लावा व नंतर आराम करा. सकाळी तुम्ही स्वतः फरक पाहाल.
४. नारळाचे तेल –
तुमचा पाय एका स्वछ नरम पाण्याच्या कपड्याने पुसून घ्या, नंतर काही तास तुमचा पाय जमिनीवर ठेवू नका. व त्यानंतर तुमचे हे तेल तिथे लावा त्यामुळे तुम्हाला चांगला फरक पडेल.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments