तूप / घृत
- divipawar94
- Jul 1, 2021
- 2 min read
तूप / घृत
गीरगायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून रोज साय एकत्रितकरून त्याचे दही, दह्यापासून केलेलेलोणी व त्या लोण्याचेतयार केलेले तूप हेच साजूकतुप. दूध काढण्यापासून तेतुप होईतोपर्यंत पाच अग्निसंस्कार कार्यरतअसतात. परिणामी, सेवन केल्यानंतर लगेचचशरिरस्थ धातूंमध्ये रुपांतरीत होऊन शरीराचे बलवाढविण्यासाठी फारच उपयोगी ठरते.सर्व तुपांमध्ये गायीचेतुप हे सर्वश्रेष्ठ होय.त्याने शरिरस्थ सप्तधातूंची वाढ होऊन मेंदूशांत राहतो.उष्णता दूर होते वरक्ताची शुद्धी होते. शारीरिक कष्ट करणार्यालोकांनी तुपाचे सेवन करणे अत्यंतहितावह असते. बाजरीची भाकरी, घट्ट तूप वत्या बरोबर वाटीभर दाट ताक (कोथिंबीर,लसूण,आले घातलेले) घेणार्यास बाहेरील जीवनसत्वेघेण्याची गरज नसते. सकाळ,संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने सूक्ष्मजंतूचानाश होतो.म्हणूनच यज्ञामध्येयाचा वापर केला जातो.तूप रसायन डोळ्यांसाठीहितावह,अग्निप्रदीपक,शीतवीर्य,विष,दारिद्र्य,पाप,पित्त,वातशामन,रसवाही,नाड्यांचे प्रसादक,कांती,बल,तेज,लावण्य,बुद्धीवर्धक स्वर सुधारणे,स्मृती,मेधा हिंमत,प्रतिभावाढविणारे, पवित्र, शक्तिप्रद, जड, स्निग्ध,कफकारकआहे.शरिरात वात वृद्धि होऊनमंदाग्नी, क्रूशता असता तसेच अतीप्रमाणात मद्यपान सेवन किंवा विविधआजारांसाठी घेतल्या गेलेल्या अॅलोपॅथिक औषधांचा परिणाम होऊन पित्ताची हानीहोते व परिणामी मेंदूचासमतोल डळमळीत झाल्याने उतावळेपणा,कंप,आवेश,उन्मादनिर्माण होते.अशा परिस्थितीतघृत सेवनाने वाताचे शमन होते.क्षीणकफाचे पोषण होते, जठराग्निप्रदिप्त होऊन शरिरस्थ समतोलटिकवला जातो. गर्भाचे चांगले पोषण होऊन प्रसूतीमध्येत्रास होऊ नये म्हणूनपहिल्या महिन्यापासून तुपातील शिरा किंवा तुपातीलसुखडी देण्यात येते.उचकीसाठी गायीचेकोमट तूप थोड्या सैंधवलवणासह प्यायले असता उचकी थांबते. वरचेवर लागणारी तहान दूध वतूप एकत्रित प्यायल्याने कमी होते.पोटस्वच्छ होण्यासाठी अर्धा शेर दुधातून दोनचमचे तूप घ्यावे. वरचेवरनाकातून रक्त येत असेलतर गायीचे तूप दोन थेंबसकाळ,संध्याकाळ दोन्ही नाकपुडीत सोडावे.अर्धशिशिसाठी गायीच्या तुपाचे नस्य घेतल्याने खूपचफरक पडतो.वरचेवर डोळेलाल होणे किंवा मधुमेहाचाउपद्रव स्वरुप दिसणारी रेटायनोपेथी डोळ्यांमध्ये दूध व तूपएकत्रित करून सोडले असताकमी होते. पित्ताच्या उष्णतेमुळे होणारा पाद दाह हाशतघौत घृत(शंभर वेळाधुतले गेलेले तूप) या घृतानेदोन्ही पायाला मसाज केला असताकमी होते.शरीराची विशेषतःचेहर्याची कांती टिकविण्यासाठीकाही विशेष औषधी सिद्ध घृतांचाचेहर्यावर हळूवार मसाजकरावा.अग्निदग्ध व्रणासाठी तूप लावल्याने उत्तमरोपण कर्म बघायला मिळते.डोळ्यांमध्ये अॅसिड किंवा चुना,किंवा काहीविषारी रासायनिक द्रव्ये गेली तर लगेचचडोळ्यांत काही थेंब गायीचेतूप सोडावे.दारुची नशा उतरविण्यासाठी सुद्धातूप व साखर दुधाबरोबरप्रभूत मात्रेत दिली जातो. गायीचेतूप,स्वर,मेघा,आयुष्य,रक्तविकार व पित्तविकार दूरकरते. म्हशीचे तूप, वातविकारासाठी वापरावे,शेळीचे तूप डोळ्यांच्या विकासासाठीवापरावे. उंटिणीचे तूप विषविकार वत्वचाविकार नाहीसे करते. मेंढीचे तूप अस्थिवाढीसाठी उपयुक्तअसते. एक वर्षापूर्वीच्या तुपासपुराणघृत म्हणतात व ते मानसिकविकारात वापरतात.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments