top of page
Search

तांबूलभक्षण

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 21, 2021
  • 2 min read

कर्पूरकङ्कोल लवङ्ग पूग जातिफलैर्नागर खण्डपर्णैः।

सुधाअश्मचूर्णं खदिरस्य सारं कस्तूरिकाचन्दन चूर्णमिश्र।।

ताम्बूलमेतत्करंवदन्ति सौभाग्यद कान्तिसुखप्रदं चार।

आरोग्यमेधास्मृति बुद्धि वृद्धिम् करोति वहेरपि दीपनं च।।

अनङ्गसन्दीपिनभावमध्ये प्रधानमेतत् समुदाहरन्ति।

अतोहि सर्वे सुखिनो मनुष्या अहर्निशं प्रीतिकरं भजन्ते ।।

ताम्बूलपत्राणिहरन्ति वातंपूगीफलं हन्ति कफप्रसेकम्।

चूर्णम्निहन्यात् कफवातं उच्चैर्हन्याच्च पित्तं खदिरस्य सारः।।

इत्थंहि ताम्बूलमुदाहरन्ति दोषत्रयस्यापि निवारणाय।

अतोअत्र सेवेत नरः कथञ्चित् विचक्षणःप्राकृतमानुषो अपि।।


जेवल्याबरोबरकफ वाढतो. अन्न जिरत असतापित्त वाढते. अन्न जिरल्यावर वायुवाढतो. यासाठी सुगंधी द्रव्यांच्या धूम्रपानाने किंवा सुपारी, कापूर, कस्तुरी, लवंग, जायफळ इत्यादिकांनी किंवा तिखट, तुरट अशा तोंडस्वच्छ करणार्‍या फळांनी किंवासुगंधी द्रव्यांने युक्त अशा विड्याच्या पानांनीजेवणानंतर होणार्‍या कफास जिंकावे.


तांबूलभक्षण केव्हाकरावे :-


अथ ताम्बूलकाल नियमः॥

भुक्त्वा अन्नंसलिलंपीत्वाभुक्त्वाचबहुभोजनम्।

प्रतीक्ष्य घटिकामेकांताम्बूलंभक्षयेन्नरः।।


संभोगसमयी, झोपून उठल्यावर, स्नान केल्यावर, जेवल्यावर, उलटि केल्यावर, युद्धाच्यावेळी, विद्वानांच्या व राजाच्या सभेमध्येविडा खावा. प्रातःकाळी मुखशुद्धी करण्यासाठी,जेवल्यावर अन्न पचण्यासाठी वअतिरीक्त कफ तयार होऊनये म्हणून, रतिसमयाचे पूर्वी कामभावना वाढवण्यासाठी, रतिसमयानंतर थकवा निर्माण होऊनये म्हणून व विद्वान मंडळींच्यासभेत झोपेची गुंगी जाऊन मेंदु तल्लखकरण्यासाठी विडा खाणे उत्तमअसते.


विड्याचे गुणधर्म :-

विडाहा कडू, तिखट, गोड, क्षारीय, तुरट व उष्णअसतो. तो वातनाशक, कफनाशक, कृमिनाशक, मुखदुर्गंधीनाशक, मुखशोभाकारक, तोंड स्वच्छ करणाराव कामोत्तेजक आहे. विड्याचे हेतेरा गुण स्वर्गामध्ये देखीलदुर्लभ आहेत. विडा हा रुचिकारक, सारक, कामवर्धक, रक्तपित्ताला वाढवणारा, पचायला हलका व वश्यकारकअसून कफ, तोंडाची दुर्गंधीव मळ, वात आणिश्रम यांचा नाशक आहे. उत्तमकांतिकारक व सौष्ठवकारक आहेयाचाच अर्थ दातांचे तेजकिंवा चमकदारपणा नि दातांची मजबूतीवाढवणारा आहे. विड्याने जिभस्वच्छ होते, तोंडाला पाणी सुटणे बंदहोते व गळ्याचे रोगनाहिसे होतात. विड्याचे कोवळे पान गोड, किंचिततुरट ,पचायला जड कफकर असतात. बंगाल प्रांतामध्ये होणारी पाने अतिशय तिखट,उष्ण व सारकअसून पाचक, पित्तकर व कफनाशक असतात. जून पिकलेली विड्याची पाने तिखट नसूनहलकी, पांढुरकी व विशेष गुणकारीअसतात. याखेरीज इतर पाने गुणहीनसमजावीत.


सुपारी, कात व चुन्याचे गुणधर्म :-

सुपारीअधिक शीत, पचायला जड, रुक्ष, तुरट, कफपित्तनाशक, मोह निर्माण करणारी, अग्निदिपक, रूचिकारक असते. कठिण व शिजवलेलीसुपारी त्रिदोषनाशक असते. ओली सुपारी पचायलाजड, स्रावी व अत्यंत अग्निमांद्यकरअसते. कात कफपित्तनाशक असते. चुना वात व कफनाशकआहे आणि यांचा संयोगत्रिदोषनाशक असून मन सुप्रसन्नकरतो. सकाळी सुपारी अधिक घालून, दुपारीकात अधिक घालून वरात्री चुना अधिक घालूननेहमी विडा खावा. पानाचादेठ भक्षण केला असता व्याधीउत्पन्न होतात व पानाचा शेंडापापकारक आहे. यासाठी पानाचादेठ व शेंडा काढूनटाकावा. पानाच्या अग्रभागी आयुष्य, मूळाकडे यश व मध्यभागीलक्ष्मी वास करते. विड्याचाप्रथम येणारा रस गिळला असता, तो विषासमान असतो, दुसर्‍यावेळी येणारा रस जिरण्यास कठीणअसून मोहकारक असतो. तिसर्‍यावेळी व त्यापुढे निघणारारस अमृतासमान असतो, तो गिळावा. जायपत्री, लवंग, कापूर, कंकोळ, लताकस्तुरीचे फळ व सुपारीयांनी तयार केलेला खाऊच्यापानाचा (नागवेलीचा विडा) चघळावा.


विडा कोणीखावा ? :-

आळस, करट, टाळूचे रोग, दाताचे रोग, अर्बुद, गळा व तोंडाचेरोग, कफरोग यांवर विडा फार प्रशस्तआहे.



विडा कोणीखाऊनये ?:-


नेत्रराग नचरक्तापत्तक्षतंचदोषनविषनशाषा

मदात्यये नापिनमोहमूर्छाश्वासषुताम्बूलमुशान्तवैद्याः।।


नेत्रविकार, तोंड, नाक, मल, मूत्रइत्यादि मार्गे रक्त पडणे, व्रण, खोकताना रक्त पडणे, अंगाची आग होणे, विष, राजयक्ष्मा (AIDS), मदात्यय (Alcoholism) व चक्करयेऊन पडणे या विकारांमध्येविडा खाऊ नये. ज्याला जुलाब झाले आहेत व जो भूकेलेला आहे, त्याने अतिविडा खाऊ नये.


अति विडा खाण्याने काय होते ?:-


ताम्बूलं क्षतपित्तास्ररूक्षोत्कुपितचक्षुषाम्।

विषमज़मदार्तानामपथ्यं शोषिणामपि॥


अतिविडा खाण्याने देह, दृष्टि, केस, दात, कान, जाठराग्नि, शरीराचा वर्ण व बल यांचानाश होतो. पित्त, वात व रक्तविकार होतात.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page