top of page
Search

त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 28, 2021
  • 6 min read

महिलाअसो अथवा पुरुष आपल्याचमकदार सुंदर व निकोप त्वचेमुळेचार लोकांमध्ये आपण उठून दिसावेअसे प्रत्येकालाच वाटते (Best Skin Care Tips In Marathi) आपल्या शरीरावरील आवरण म्हणजे त्वचा. त्वचेचे एकूण सात थरअसतात. त्वचेच्या आतील आवरणामध्ये निर्माणहोणाऱ्या मेलेनिन नावाच्या घटकामुळे त्वचेचा रंग ठरत असतो. व्यक्तीच्या त्वचेचा रंगहा जन्मजात अनुवंशिकतेमुळे ठरत असतो. तसेचत्वचेतील मेलॅनिन नावाचा घटक त्वचेचा रंगकमी अधिक होण्यास कारणीभूतठरत असतो. त्वचेचे सौंदर्य जपण्याकरता आपण अनेक उपायकरतो. आपली त्वचा चिर:तरूण, तजेलदार व निकोप रहावीयाकरता अनेक घरगुती उपायआपण करतो तसेच बरेचलोक हजारो रुपये खर्च करुन महागड्याकेमिकल पील ऑफ ट्रिटमेंट्सकरवुन घेतात. ब्युटी सलून व पार्लरमध्येजाऊन स्त्री-पुरुष त्वचेची देखभाल घेतात. बरेचसे स्किन क्लिनिक आपल्याला या ट्रीटमेंट वसेवा पुरवत असतात. मोठमोठे सेलिब्रिटीज आणि स्टार्स आपल्यास्कीन रुटीनबद्दल सामान्यांना नेहमीच माहिती देत असतात. आपलीस्कीनदेखील आपल्या आवडत्या स्टार्स व सेलिब्रिटीज प्रमाणेचमकावी आणि उजळावी याकरताआपण सेलिब्रिटीजचे स्कीन रुटीन फॉलो करत असतो. शरीरावरील त्वचेच्या सौंदर्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेचे सौंदर्य जपणे देखील महत्वाचेआहे. आपला चेहरा निकोप, तजेलदार,डाग विरहित वचमकदार व तरुण रहावायाकरता अनेक प्रयोग वउपाय योजना केल्या जातात. चंदनयुक्त, हळदयुक्त, गुलाबजलयुक्त हे सगळे जाहिरातीचेफंडे असतात. या क्रीम्समध्ये सुगंधीकेमिकल वापरतात ज्यामुळे केवळ ग्राहकांची फसवणुकव उत्पादनाचा खप करणे हाएकमात्र उद्देश्य कंपनी मालकाचा असतो. ही केवळ मार्केटींगस्किल आणि स्ट्रॅटेजी असते.


त्वचेवी काळजीघेणेकागरजेचेआहे ?

त्वचेचीनिगा राखण्यामागचा एकमेव हेतु म्हणजे आपलेव्यक्तिमत्त्व! आपल्या त्वचेच्या स्वरुपावरुन व्यक्तिबद्दल जाणुन घेता येते. व्यक्तीनेआपल्या त्वचेचा काळजी व निगा कशीठेवलेली आहे यावरुन त्याव्यक्तीचा स्वभाव देखील समजत असतो. स्वत:ची वैयक्तिक काळजीव ग्रुमिंग ही त्वचेवरुन दिसुनयेते.तसेच त्वचेच्या स्वरुपावरुनव्यक्तीचे आरोग्य कसे आहे हेदेखील समजते! त्वचेची निगा ठेवण्याच्या काहीपारंपारिक पद्धती व पूर्वापार वापरातआलेले काही नियम बदलत्याकाळासोबत मागे पडले. नैसर्गिकपदार्थ जसे हळद,मुलतानीमाती, चंदन, बेसन हे पदार्थफार प्राचीन काळापासुन सौंदर्य वृद्धीकरता वापरले जातात. मात्र धावत्या युगात वेळेचा अभाव व सगळेआयतेच हातात पाहिजे ही वृत्ती असल्यानेहाताने करत बसण्यापेक्षा चारपैसे फेकुन काय ट्रिटमेंट करायचीती करु असा कललोकांचा होत चालला आहे. ताेचमध्यमवर्गातील स्त्री-पुरुष कोणत्याही माहितीशिवाय केवळ जाहिराती पाहुनघरात प्रोडक्ट्स घेवुन येतात. या जाहिरातीतील केमिकलयुक्तस्किन केअर प्रोडक्ट्समध्ये पॅराबिन्स, सल्फेट्स यासारख्या घातक केमिकल्सचा भरमसाटवापर केला जातो. त्वचेचीनिगा राखण्याचा दावा करणार्‍याबॉडी लोशन्स, मॉईश्चरायझर, स्किन क्रीम्समधील केमिकल्स त्वचेला हानी पोहचवून त्वचेच्यास्किन सेल्स डॅमेज करतात, ज्यामुळे स्किन डिसिज व स्किन कॅन्सरदेखील होऊ शकतात. त्वचेचीकाळजी व निगा नघेतल्यास पिंपल्स,मुरुम, डाग,ब्लैकहेड,व्हाईटहेड यासारख्या समस्यांनी चेहरा विद्रुप होऊ लागतो. काहीलोकांना तर त्वचेची काळजीन घेतल्यामुळे कमी वयात एजिंगचीसमस्या निर्माण होते. ज्यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येणे, फ्रेकल्स, ब्राऊन स्पॉट्स पिग्मेंटेशनअशी लक्षण दिसु लागतात. याकरताचप्रत्येक वयात त्वचेची काळजीघेणे आवश्यक असते. त्वचा निरोगी व तरुण राहण्याकरतात्वचेच्या देखभालीकरता नैसर्गिक पदार्थांचा वापर केला पाहिजे.


त्वचेचे प्रकार

त्वचेचे प्रामुख्यानेतीनप्रकारआहेत- तैलियत्वचा, कोरडीत्वचावमिश्रत्वचा!

१ : तेलकट त्वचाकिंवाऑइलीस्किन

या स्कीनच्या प्रकारांमध्येचेहऱ्याच्या स्किनमधील तैलिय ग्रंथीमधून जास्त प्रमाणामध्ये ऑइल निर्मिती होतेव हे ऑइल वारंवारत्वचेतुन बाहेर पडत असते. अशीत्वचा असणाऱ्या लोकांचा चेहरा कायमच तेलकटव चिपचिपा चिकट दिसतो. ऑइलीस्किन असलेले लोक लांबुनही ओळखतायेतात,व्यवस्थित त्वचेची काळजी घेतली गेली नाही तरमोठे मोठे मुरुम, खुपपुळ्यांनी भरलेले गाल, कप‍ाळ, तेलाने पचपचलेला चेहरा कुठुनही ओळखता येतो की हीऑइली स्किन आहे.


२ :कोरडी किंवाड्रायस्किन

अगदीसर्व ऋतुंमध्ये कोरडी असणारी व कायम रखरखीतहोणारी त्वचा म्हणजेच कोरडी स्किन. या त्वचेच्या प्रकारांमध्येत्वचा अगदी उन्हाळ्यातही फाटते. त्वचेला चिरा पडणे, पांढर्‍या रेषा पडणे, रॅशेस येणे, उन्हाळ्यातही त्वचा उकलणे हे प्रमुख लक्षणेअसतात. अशी त्वचा नरमराहत नाही. खूप पटकन कोरडीहोते. तसेच हिवाळ्यामध्ये तरजास्तच फाटते अशा त्वचेमध्ये मॉईश्चरटिकुन राहत नाही वलवकर उडुन जाते.


३ : मिश्र त्वचा

भारतामध्येसगळ्यात जास्त मिष त्वचा पाहिलीजाते. ही त्वचा उन्हाळ्यातऑईली होते आणि हिवाळ्यातखुप ड्राय होते. ऑइली व कोरडीया दोन्हीं प्रकारांचे मिश्रण ही त्वचा आहे.


त्वचेच्या देखभालीच्याचुकीच्यासवयी

आपल्यातीलबरेच स्त्री व पुरुष हेटीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा आपले मित्र-मैत्रिणीजे प्रोडक्ट वापरतात त्यांना छान वाटतात म्हणूनते प्रोडक्स वापरण्यास सुरुवात करतात. मात्रप्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्सची निर्मिती केली जाते, अशावेळीआपण आपले मित्र मैत्रिणीसुचवतात व टीव्हीवरील सेलिब्रिटीजजाहिरातीत ओरडून सांगतात म्हणून असे लोक याप्रोडक्सचे अंधानुकरण करून बाजारातुन आणूनवापरु लागतात जे अतिशय चुकीचेआहे. आपल्याला आपल्या त्वचेचा पोत प्रकार माहितकरुन प्रोडक्ट्स घेतले पाहिने. आपण कशाकरता प्रोडक्ट्सविकत घेत आहोत त्यासमस्येबद्दल स्किन स्लेशालिस्ट व डॉक्टरचा सल्लाघेवुन प्रोडक्ट्स वापरावे. पारंपारिक पद्धतीने अगदी दगडाने घासूनघासून अंगाचा मळ काढणे, टॉवेलनेएकसारखे लाल होईपर्यंत त्वचाघासणे. या सवयी चुकीच्याआहेत. वेळोवेळी चेहरा साबण लावुन धुतल्यानेचेहरा उजळतो अशा खोट्या माहितीवरविश्वास ठेवुन पुन्हा पुन्हा चेहरा साबणाने धुवणे, चेहरा घासणे असे अनेक प्रयोगकेल्याने त्वचेचे मॉईश्चरायझर निघून जाते व त्वचाकोरडी होते. आपल्या त्वचेची समस्या काय आहे हेमाहित करुन त्यानुसार त्यावरकाय उपाय केला पाहिजे.हे ठरवावे. आपल्यारोजच्या चुकीच्या आहारामुळे आणि रोजच्या दैनंदिनसवयीमुळे सुद्धा आपल्या स्किन च्या आरोग्यावर चुकीचाइफेक्त्त पडत असतो त्यामुळेआपले आरोग्य चांगले राहावे यावर लक्ष देणेसुद्धा गरजेचे आहे.


स्त्री वपुरुषाच्यात्वचेच्यादेखभालीमधीलफरक

स्त्रीव पुरुषांची त्वचा ही वेगळी असते. वयात आल्यानंतर शरीरवाढीची कारणे ही हार्मोन्सच्या बदलांमुळेहोते. स्त्री-पुरुषांचे हार्मोन्स वेगवेगळे असतात. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुष शरीरामध्ये आंतरिक व बाह्य बदलघडत असतात. या बदलांमध्ये त्वचेमध्येमोठ्या प्रमाणात बदल होतात. वाढत्यावयाबरोबर मुलींची त्वचा अधिक नाजूक होतेतर मुलांच्या चेहऱ्यावर दाढी -मिशा आल्यामुळे मुलांचीत्वचा रुक्ष, जाड व रखरखीतहोते. यामुळे पुरुषांच्या त्वचेकरता स्त्रियांच्या स्किन क्रीमचा उपयोग होत नाही. तसेचपुरुषांच्या त्वचेची निगा राखण्याकरता वदेखभाल करण्याकरता वेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. स्त्री व पुरुषांच्या त्वचेच्यासमस्या वेगवेगळ्या असतात. बाहेरून पाहुन जरी सर्व समस्यासारख्या दिसल्या, तरी ही शरीरातीलहार्मोन्स बदलामुळे या समस्या होतअसतात. त्यामुळे त्वचेतील फरक संवेदनक्षमता लक्षातघेवून स्किन प्रोडक्ट्स बनवल्ले जातात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्यागडबडीमुळे त्वचेमध्ये तैलियना येणे स्किन डॅमेजव डल होणे असेप्रकार पाहायला मिळतात. तर पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनआणि अँड्रोजन या हार्मोनमुळे त्वचेमध्येबदल होताना दिसुन येतात. याकरता स्त्री व पुरुषांचे स्किनकेअर रुटीन देखील वेगळे असायला हवे!


स्त्रियांकरीता त्वचेचीदेखभालकरण्याकरताटिप्स

महिलांनीआपल्या त्वचेची निगा ठेवताना काहीमहत्त्वाच्या लक्षात बाबी लक्षात ठेवाव्यात. प्रत्येक महिलेची त्वचा वेगळी असते तसेच प्रत्येकाच्यात्वचेचा पी.एच लेव्हलवेगळी असते, त्यामुळे आपल्या त्वचेच्या संवेदनशीलतेला लक्षात घेवूनच प्रोडक्ट्स विकत घ्यावे. सेन्सिटीविटीटेस्ट करुनच कोणतेहीस्किन प्रोडक्टस वापरावे. जे प्रोडक्ट्स आपल्यात्वचेला सूट होतील याबाबत२४ तास क्वालिटी सेन्सिटिविटीचेक टेस्ट करुनच असे प्रोडक्ट्स विकतघ्यावेत. स्त्रियांची त्वचा नाजूक व कोमल असते. वारंवार स्क्रबिंग करुन किंवा घासुनचेहरा जास्त काळा पडतो वजास्त स्क्रब केल्याने त्वचेला आतल्या थरापर्यंत दुष्परिणाम होतात. उन्हात बाहेर जाताना कधीही स्कार्फ किंवा रुमालाचा वापर करावा. चेहऱ्यावरचांगले सनस्क्रीन लोशन वापरावे. आंघोळीचासाबण चेहर्‍यांवर वापरु नये. चेहर्‍याकरताचांगला हर्बल फेसवॉश किंवा साधे डाळीचे पीठवापरावे. वॅक्सिंग किंवा हेअर रिमुवलकरत असालतर नियमितपणर त्वचेवरमॉइस्चरायझिंग लोशन वापरा. चेहऱ्याच्यात्वचेकरता देखील चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावावे. ज्यामुळे चेहर्‍याची त्वचा मुलायमव तुकतुकीत होते. महिन्यातून एक वेळेस फेशिअलअवश्य करावे. फेशियल केल्यानंतर ऊन्हात बाहेर पडु नये.कारणफेशियलने त्वचा संवेदनशील झालेली असते. केमिकल पिल ट्रिटमेंट कधीहीकरू नये. हर्बल ट्रिटमेंटकरण्याकडे कल असावा. मैत्रिणीलासुट झाले म्हणून तिनेघेतलेले प्रॉडक्ट्स आपल्याला सुट होईलच असेनसते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपल्याला त्वचेला सूट होतील असेचप्रॉडक्ट्स वापरावे. चेहऱ्यावरील समस्या जसे, मुरूम, पुटकुळ्या, वांगाचे चट्टे इत्यादीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनाने किंवा जाहीराती पाहुन प्रोडक्ट्स विकत घेवू नये. आरोग्य चांगले असले तर त्वचाचांगली राहते, याकरता पोटाच्या समस्या असतील तर त्याचा परिणामत्वचेवर होत असतो. म्हणुनआजर वेगळा उपाचार वेगळा असे करु नये. रोज मेकअप करण्याची सवय असेल तरझोपण्याच्या अगोदर संपूर्ण मेकअप काढून टाकावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा नंतर झोपावे. चेहऱ्यावरव अंगाला कमीत कमी केमिकलयुक्तप्रॉडक्ट्सचा वापर करावा. योग्यआहार व दिवसातून किमान३ लिटर पाणी पिणेचांगल्या त्वचेकरता आवश्यक असते. जेवनात चौरस आहार वज्यस,सलाड यांचा समावेशकायम ठेवावा.


पुरुषांकरीता त्वचेचीकाळजीघेण्याकरताटिप्स

पुरुषांनीआपल्या त्वचेची काळजी घेण्याकरता पुरुषांकरिता बनवलेले विशेष प्रोडक्ट्सचा वापर करावा. स्त्रियांकरताअसलेले स्किन केअर रुटीन पुरुषांकरतावापरणे चुकीचे असते. उन्हामध्ये बाहेर जाताना पुरुषांनी देखील सन स्क्रीन लोशनवापरले पाहिजे. चेहऱ्याला रुमालाने झाकले पाहिजे. बर्‍याचशा पुरुषांनातैलीय त्वचवमध्ये खुप पुटकुळ्या वमुरुम येतात. याकरता बेसनाचा फेसपॅक निश्चित फायदेशीर आहे. दाढीेचे ब्लेडवापरानंतर निर्जंतुक करुन घ्यावे. दाढीकेल्यानंतर त्वचेला डिसइन्फेक्टंट जेल किंवा तुरटीवापरावी. वारंवार दाढी केल्याने दाढीदाट होते हा गैरसमजदूर करावा. दाढी ची ग्रोथही हार्मोन्स व अनुवांशिकतेवर अवलंबुनअसते. स्किन टाईप नुसार फेसवॉश,फेसपॅक व स्किन ट्रिटमेंटकरावी. फेशियल पुरुषांनी देखील केलेच पाहिजे ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी काढून टाकल्या जातात व त्वचेला नवीचमक येते. गंभीर त्वचेच्या समस्यांवर घरगुती उपचार किंवा इंटरनेटवर सर्च करण्यापेक्षा चांगल्यात्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावे. महिलांप्रमाणेच आहाराबाबत जागृक असावे. तेलकट, जंकफुड, फास्टफुड बंद करावे.


कोरड्या किंवाशुष्कत्वचेकरतास्किनकेअर

कोरडीत्वचा असणाऱ्या व्यक्तींनी कायम वर्षभर मॉईश्चरायझरचावापर केला पाहिजे. हिवाळ्यामध्येकोरडी त्वचा जास्त डॅमेज होत असते त्याकरताहिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेला फाटण्यापासुन कोकम तेल किंवापेट्रोलियम जेली वापरले पाहिजे. हिवाळ्यात त्वचेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मध, दही, दुधाची सायअसे पदार्थ त्वचेवर लावावे त्यामुळे चेहर्‍यामध्ये मॉइश्चर लॉक होते वचेहरा मऊ राहतो. तसेचहिवाळ्यातील डॅमेज पासून संरक्षण करण्याकरता अंगाला नियमित तेलाने मालिश करावी व नंतर अंघोळकरावी. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी सर्व ऋतुंमध्ये मॉइश्चरायझरचावापर केला पाहिजे.


तेलकट त्वचेकरतास्किनकेअरटिप्स

ऑइलीत्वचा असणाऱ्या लोकांनी आपल्या चेहऱ्याची नियमित स्वच्छता ठेवावी. वातावरणातील धूळ, माती, प्रदूषणामुळेचेहऱ्याच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन चिकटतात वत्यामुळे चेहऱ्याचे रोमछिद्रे बंद होतात वचेहऱ्यावर पिंपल मुरूम अशा समस्या निर्माणहोतात. ऑइली स्किन असणाऱ्यालोकांनी कधीही वॉटर बेस प्रॉडक्ट्सवापरावे. चेहऱ्याला तेलकटपणा आल्यावर लगेच कॉटन, टिश्युकिंवा रुमालाने पुसुन घ्यावा. चेहरा घामाने ओला झाला तरीही लगेच स्वच्छ करूनघ्यावा. चेहऱ्यावर अधिक तेल जमाहोत असेल तर बेसनपीठाचाघरगुती फेसपॅक वापरत जावा. बेसणामुळे तैल ग्रंथी जास्ततेल निर्माण करत नाहीत. ऑइलीस्किन असणाऱ्या लोकांनी चेहऱ्यावर कधीही तेल किंवा ऑईलबेस असलेले प्रोडक्ट्स वापरु नये. ऑइली स्किनअसणार्‍या लोकांनी तेलकट, तुपकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.


त्वचेची निगाराखण्याकरतासर्वोत्तम

त्वचेचाप्रकार कोणताही का असेना मात्रत्वचेची काळजी व निगा घेणेही आपली जबाबदारी आहे. वैयक्तिकरीत्या त्वचेची काळजी घेतल्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्यांना जास्त सामना करावा लागत नाही. चेहरास्वच्छ करण्याकरता नेहमी चांगला हर्बल फेस वॉश वापरावा. अंगाच्या साबणाने चेहरा कधीही धुवू नये. केमिकल्सयुक्तप्रोडक्ट्समध्ये जास्त हानिकारक केमिकल असतात, म्हणुन किमान पॅराबिन नसलेले प्रोडक्ट्स निवडुन मग वापरा. चेहऱ्यावरनाजुक असतो. पिंपल्स,डाग, वांग कोणत्याहीसमस्या एका रात्रीत येतनाहीत व रात्रीत बर्‍या होत नाहीत! हे लक्षात घेवुन खाण्या-पिण्याच्या सवयी, योग्य झोप व चांगलेस्किन केअर रुटीन पाळावे. जास्त वेळा स्क्रबिंग करूनये. चेहरा कशानेच घासु नये. वयाच्यातिशीनंतर फ्रूट फेशियल करणे उत्तम असते. चेहरा स्वच्छ करताना कधीही जास्त जोराने घासू नका फक्तहळुवार पाणी टिपुन घ्यावे. चेहऱ्याला रोज चांगल्या मॉईश्चरायझिंगक्रीम किंवा साध्या खोबरेल तेलाने मसाज करावा. चेहर्‍यावर वर्तुळाकार मसाजदेतांना चेहऱ्यावरील नाकाचे हाड, गालाचे हाड, हनुवटी, भुवयांजवळ प्रेशर पॉईंट्स हळुवारपणे दाबावे. आपल्या बोटांच्या अग्रांनी चेहर्‍याच्या स्नायूंचा व्यायाम होतो व रक्ताभिसरणसुरळीत होते. पंधरा दिवसातून एकदा क्लीन अपकरावे. हेअर रीमुव्हल प्रोडक्सवापरताना किंवा हेअर रीमुव्हल करतानायोग्य काळजी घ्यावी. सेन्सिटीवीटी तपासण्या करता कधीही प्रॉडक्टवापरताना 24 तास अगोदर हीटेस्ट करून घ्यावी. कोणीरेकमेंड केले किंवा जाहिरातीपाहिले म्हणून कोणतेही प्रॉडक्ट्स बाजारातुन विकत आणुन चेहऱ्यावरट्राय करत बसु नका. महिन्यातून एखादी वेळा स्टीमबाथ किंवाचेहर्‍याला स्टीम द्यावी.यामुळे विषारी तत्व घामावाटे शरीरातूननिघुन जातात. व्यायाम, योगासने, ध्यानधारणा नियमित करावी ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य आतून खुलुन येते. ताज्या हिरव्या पालेभाज्या,काकडी ,गाजर, फळे यांचा आहारातसमावेश करावा.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page