थायरॉइड (Thyroid)
- divipawar94
- May 21, 2021
- 10 min read

थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. थायरॉइड हा आजार आता भारतात नवीन उरलेला नाही. बदलत्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे हा आजार अनेकांना बळावताना दिसत आहे. थायरॉइडच्या समस्येचा सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रियांना. पुरुषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतात. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाऱ्या अधिक असतात. मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. थायरॉइड हा सायलेंट किलर म्हणूनही ओळखला जातो. थायरॉइडच्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. दिनचर्येत बदल, व्यायाम आणि पौष्टिक आहार याच्या मदतीने थायरॉइडच्या समस्येतून बाहेर पडता येतं.
आपल्या शरीरात काही अंत:स्रव करणाऱ्या ग्रंथी असतात, ज्यांचं काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं असं असतं. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय थायरॉईड ग्रंथी चा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती गळ्याच्या खालच्या बाजूला असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे. ती आपल्या शरीरातील अनेक क्रियांच्यासाठी आवश्यक असते. उदा. - चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीरामध्ये कॅलरी (ऊर्जा) जाळण्याचा वेग नियंत्रणात ठेवणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, स्नायू, नसांना बळकटी देणे, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची इत्यादी ते सांगते. संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पियुषिकाग्रंथी (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पियुषिकाग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते. आता जे follicular cells असतात ते 2 प्रकारचे hormones secret करतात triiodothyronine म्हणजेच T3 आणि tetraiodothyronine म्हणजे T4 तर parafollicular cells या calcitonin secret करतात. T3 हे हार्मोन 10 – 30 मायकोग्राम आणि T4 हे 60-90 मायकोग्राम अशा स्वरूपात बाहेर पडत असतं.
आता पाहुयात thyroid gland या hormones ची निर्मिती कशी करते, तर जे follicle मधले thyroglobulin असते ते hormones बनवण्यासाठि महत्वाचे असते पण यासोबतच 2 असे तत्व आहेत ते म्हणजे iodine आणि typsine जे आपल्याला आहारातुन मिळत असतात. Thyroglobulin मध्ये जेव्हा iodine आणि typsine या दोघांच्या एकत्रिकरणातुन iodination होते तेव्हा त्यातुन monoiodotyrosin म्हणजेच MIT आणि diiodotyrosin म्हणजे DIT तयार होत असतात. MIT आणि DIT या दोघांच्या एकत्रिकरणातुन T3 hormone form होते आनि DIT आणि DIT या दोघांच्या एकत्रिकरणातुन T4 hormone form होते. Thyroid hormones हे thyroglobuline मध्ये 4 – 6 महिने stored आनि बनत असतात. म्हणुनच त्यांचि कमि जास्त level हे 6 महिन्यांनी केली जाते. रक्तातील thyroid hormone चे प्रमाण हे पियुषिका ग्रंथि नियंत्रित करते तिला जेव्हा कळते कि hormones कमि जास्त प्रमाणात होताय तेव्हा ति शरिरात thyroid stimulating hormone हे secret करते आणि level ला कमि जास्त करते.
थायरॉईडचे प्रकार कोणते
साधारणपणे थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे
हायपरथायरोडिझम (Hyperthyroidism)
तुमच्या ग्रंथी क्षमतेपेक्षा अधिक काम करतात. त्याला हायपरथायरोडिझम म्हणतात. लोकांमध्ये हायपरथायरोडिझमचे प्रमाण अधिक असते. रक्ताची चाचणी केल्यानंतर तुम्हाला याबद्दल कळू शकते.
ऑटोइम्यून हायपरथायरोडिझम (Autoimmune Hyperthyroidism)
जर हे प्रमाण अधिक वाढले तर हा प्रकार ऑटोइम्यून हायपरथायरोडिझममझ्ये मोडतो. हा प्रकारही पटकन ओळखता येत नाही. यासाठीही तुम्हाला रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे.
हायपोथायरॉइडिझम (Hypothyroidism)
थायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे आदी प्रमुख लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
गलगंड (Goitre)
थायरॉइड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. हायपो किंवा हायपर थायरॉइडिझममध्ये ही स्थिती येऊ शकते. तसेच, आयोडिनची मात्रा कमी झाल्यानेही गलगंड होतो. गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणाऱ्या बाळात थायरॉइड ग्रंथीशी समस्या आढळू शकतात. अनेक प्रगत देशांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बाळाची हायपोथायरॉइडिझमची तपासणी करण्यात येते.
थायरॉइड नोड्यूल्स (Thyroid Nodules)
ग्रंथींमध्ये गाठी आल्याने हा विकार उद्भवतो. एमआरआय किंवा तत्सम तपासणी करण्यात येतात. गाठ आलेल्या दहा टक्के पेशंटमध्ये ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता असते. उर्वरित पेशंटमध्ये या गाठींवर उपचार किंवा सर्जरी करून काढून टाकता येते.
थायरॉईडहोण्याची कारणे
थायरॉईड होण्याची कारणे आहेत ती देखील तुम्हाला माहीत हवीत. त्यामुळे सगळ्यात आधी थायरॉईड होण्याची कारणे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला आहे की नाही हे लक्षात येईल.
आयोडिनची कमतरता (Iodine Deficiency)
तुमच्या आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. जर तुमच्या आहारातील आयोडिनचे प्रमाण कमी झाले असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते.
औषधांचे दुष्परिणाम (Side Effects Of Medicine)
काही औषधे तुमच्यातील हार्मोन्सचे प्रमाण वाढवत असतात. जर तुम्ही कोणत्या आजाराने ग्रस्त असाल आणि तुमची औषधं सुरु असतील तर त्यांचा परिणामदेखील तुमच्याव होऊ शकतो.
बाळंतपणा (Post Pregnancy)
काही वेळा बाळंतपणानंतरही अनेक महिलांना थायरॉईडचा त्रास होतो. पण हा तात्पुरत्या स्वरुपाचा असू शकतो. या दिवसात स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच हार्मोन्सचे बदल होतात. शिवाय जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुमच्या फर्टिलिटीवर याचा परिणाम होऊ शकतो. जेव्हा महिलांच्या शरीरामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड या हार्मोन्सची निर्मिती करत नागी. त्यावेळी थायरॉईडचा त्रास वाढतो. पुनरुत्पादनक्षमतेवरही याचा परिणाम होतो.
ताणतणाव (Stress)
हल्ली आपले लाईफस्टाईल इतके बदलले आहे.धावपळीच्या युगात कधीही आणि कसेही खाल्ले जाते. तुमची कधीही आणि काहीही खाण्याची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. तुमच्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन तुम्हाला थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.
अनुवंशिकता (Some Genetic Disorder)
अनेकदा थायरॉईडचा आजार होण्याचे कारण अनुवंशिकता असते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला देखील तो होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही आहाराच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.
थायरॉइड दोन प्रकारे असतो –
शरीरात थायरॉइडचे दोन प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. त्या दोन्हींची लक्षणं आणि त्यामुळे होणार्या समस्याही वेगवेगळ्या आहेत. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम.
हायपोथायरॉइडिझम
यामध्ये थायरॉइड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत घट करते. त्यामुळे व्यक्तीला कोणताही आजार नसला, तरीही पचनाचा वेग कमी होतो. त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णाला थायरॉइड हार्मोन्स दिले जाते. एखाद्या व्यक्तीला हायपो थायरॉइडिझम आहे किंवा नाही हे माहीत करून घेण्यासाठी टी थ्री आणि टी फोर यांची कमतरता आहे का किंवा टीएसएचमध्ये वाढ झाली आहे काय, याची तपासणी करून घ्यावी लागते.
खालील स्थितींमुळं हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो
आजच्या काळामध्ये जगामध्ये सुमारे २७ मिलियन लोक हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त आहेत.
थायरॉयडीटीस – म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.
हाशिमोटोज् थायरॉयडीटीस – हा एक प्रतिकार यंत्रणेचा वेदनाविरहित रोग असून तो अनुवांशिक आहे.
प्रसवोत्तर थायरॉयडीटीस – हा रोग प्रसुतिनंतर ५ ते ९ टक्के स्त्रियांमधे होतो. ही सामान्यतः एक तात्पुरती स्थिती असते.
आयोडीनची कमतरता – ही समस्या जगातील अंदाजे १०० दशलक्ष लोकांना आहे. थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी आयोडीनचा वापर करते.
कार्य न करणारी थायरॉईड ग्रंथी – ही समस्या प्रत्येक नवजात ४००० बालकांमधे एकाला होते. ही समस्या ठीक न केल्यास, ते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकते.
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे
· थकवा येणे
· वारंवार, मोठ्या प्रमाणात मासिक स्त्राव होणे
· विसरभोळेपणा
· वजन वाढणे
· कोरडी, खरखरीत त्वचा आणि केस
· घोगरा आवाज
· थंडी सहन न होणे
· बद्धकोष्ठता, चेहर्यावर सूज, चेहरा कोमेजणं, नैराश्य आणि चीडचीड होणं. शरीर थंड होणं, ही या प्रकाराची लक्षणं आहेत. तसंच यामुळे महिलांमधे मासिक पाळीचं चक्रही अनियमित होतं. चयापचयाचा वेग सरासरीपेक्षा खूप कमी होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचे रूपांतर होणं थांबतं आणि वजन वाढतं. हायपो थायरॉइडिझममधे थायरॉक्साईनचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा कमी असतं. यामुळे अप्रत्यक्षपणे थकवा, अशक्तपणा जाणवतं. सध्या हायपोथायरॉईडिझम या प्रकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. बऱ्याचदा गरोदरपणात याची सुरुवात होते.
हायपरथायरॉईडीझम
यामध्ये थायरॉइड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत वाढ करतात. त्यामुळे चयापचयाचा वेगही वाढतो. हायपर थायरॉइडिझममध्ये व्यक्तीच्या शरीरातील टी थ्री आणि टी फोर मध्ये वाढ होते, तर टीएसएचचं प्रमाण कमी होतं.
खालील स्थितींमुळं हायपरथायरॉईडीझम होतो
· ग्रेव्हज् रोगामुळं, संपूर्ण थायरॉईड ग्रंथी ही अतिक्रियाशील होऊ शकते आणि अति प्रमाणात संप्रेरक उत्पादित करते.
· थायरॉईडच्या अंतर्गत नोड्यूल्स अतिकार्यशील होतात.
· थायरॉ
यडीटीस, ही समस्या वेदनामय किंवा वेदनारहित असू शकते, थायरॉईडमधे साठवून ठेवलेले संप्रेरक मुक्त केले जातात, त्यामुळं काही आठवडे किंवा महिने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. वेदनारहित प्रकार हा अधिक प्रमाणात महिलांमधे प्रसुतिनंतर होतो.
· अतिरीक्त आयोडीन हे अनेक प्रकारच्या औषधांमधे आढळते आणि त्यामुळं थायरॉईड ही काही व्यक्तींमधे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात संप्रेरक निर्माण करते.
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे
चिडचिडेपणा / अस्वस्थता
स्नायू कमकुवत होणे / थरथरणे
अनियमित, कमी प्रमाणात मासिक स्त्राव
वजन कमी होणे
झोप नीट न लागणे
वाढलेली थायरॉईड ग्रंथी
दृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणे
उष्णता सहन न होणे
वरील लक्षणांव्यतिरिक्त अंगावर (जास्त करून हात, पाय आणि चेहऱ्यावर) सूज येणे, सांधेदुखाची त्रास, त्वचा कोरडी पडणे, कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढणे, डिप्रेशन येणे यांसारखी लक्षणेदेखील दिसून येतात.
थायरॉईडची समस्या आता सामान्य व्हायला लागली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की थायरॉईडमध्ये काय खायचे आणि काय वर्ज्य आहे.
HYPOTHYROIDISM –
काय खायला पाहिजे...
1. हायपोथायरॉईडिझममध्ये वजन जास्त प्रमाणात वाढते. वजन आटोक्यात ठेवण्याकरिता आहारात भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थांचा समावेश करावा. त्याकरिता रोज पालेभाज्या, फळभाज्या, कच्चे सॅलड, मोडाची कडधान्ये, फळे हे योग्य प्रमाणात घ्यावेत.
2. थोड्या थोड्या अंतराने थोड्या थोड्या प्रमाणात खावे.
3. थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी आयोडिन या खनिजद्रव्याची गरज असते. त्यामुळे आयोडिनयुक्त मीठाचा वापर करावा.
4. या व्यतिरिक्त ब जीवनसत्त्व, लोह, सिलेथियम, टायरोसिन, ओमेगा थ्री फॅटस्, अँटिऑक्सिडंट्स या अन्न घटकांचा देखील रोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा.
5. त्याकरिता रोजच्या आहारात पालेभाज्या, दही, ताक, दूध, अंडी, चिकन, मासे, खजूर, गूळ, आळीव, नाचणी, सुकामेवा (बदाम, अक्रोड, काळे मनुके) फुटाणे सर्व प्रकारची फळे, भाज्या यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.
काय खाऊ नये
1. कॅफेन असणारे पदार्थ म्हणजेच कॉफीचे सेवन टाळावे.
2. गॉयट्रोजेन घटक असणारे पदार्थ रोजच्या आहारात घेणे टाळावे. हा घटक थॉयरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो. या ग्रंथीचे कार्य मंदावते. त्याकरिता आहारात हा घटक असणारे अन्नपदार्थ उदा. सोयाबीन व त्याचे पदार्थ, रताळे, कोबी, फ्लॉवर, शेंगदाणे हे पदार्थ कच्चे खाणे टाळावे. कोबी, फ्लॉवर शिजवून खाण्यास हरकत नाही. रताळे हे उकडून प्रमाणात खावे.
3. अल्कोहोलचे सेवन तंबाखू, गुटखा यांचे सेवन करणे टाळावे. ध्रूमपान करू नये.
4. योग्य आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच शरीरातील चयापचय क्रियेचा वेगळ योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
हायपोथायरॉईडझमच्या उपचारामध्ये खालील योगासनांचा अभ्यास करावा:
सर्वांगासन (खांद्यांवर उभे राहणे) याची या विकारात अतिशय शिफारस केली आहे. या आसनाच्या दबावाच्या परिणामामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते व व्यवस्थित कार्य करू लागते आणि तसेच दबावाच्या परिणामामुळे डोक्यातील इतर ग्रंथी जश्या पियुषीका ग्रंथी आणि तृतीयनेत्र ग्रंथी यांनासुद्धा चालना मिळते ज्या अप्रत्यक्षपणे थायरॉईड ग्रंथींच्या कार्याला नियंत्रण करतात.
· अधोमुख आसन (विपरीतकरणी).
· एका पायावर पुढे वाकणे (जानू शीर्षासन).
· मत्स्यासन (मत्स्यासन).
· हलासन (हलासन).
· मांजराप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरासान).
· वेगाने सूर्य नमस्कार केल्याने वजन ताब्यात ठेवणे चांगल्याप्रकारे शक्य होते.
या योगासानंशिवाय, कपाल भाती (कपाळ चमकवणारे श्वसन तंत्र), नाडी शोधन (नाकपुडी आलटून पालटून श्वास घेणे), भस्त्रिका आणि उज्जयी श्वसन यासारख्या प्राणायामाचा सराव (श्वसनाची तंत्रे) केल्याने हायपोथायरॉईडची लक्षणे कमी होण्यात चांगलीच मदत होते.
HYPERTHYROIDISM
काय खावे
हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, ब्राऊन ब्रेड, ऑलिव्ह ऑईल, लिंबू, हर्बल आणि ग्रीन टी, अक्रोड, जांभूळ, स्ट्रॉबेरी, गाजर, हिरवी मिरची, मध
काय खाऊ नये
मैद्याने बनवलेले पदार्थ, पास्ता, मॅगी, व्हाईट ब्रेड, सॉफ्ट ड्रिंक, अल्कोहोल, कॅफीन, रेड मीट, जास्त गोड पदार्थ, जसे मिठाई, चॉकलेट.
हायपरथायरॉईडझमच्या उपचारामध्ये खालील योगासनांचा अभ्यास करावा:
· पूलासारखे आसन (सेतूबंधासन).
· मांजराप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरासान).
· बालकाप्रमाणे आसन (शिशु आसन).
· मृतक शरीराप्रमाणे (शवासन).
· मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार आणि त्याच्या जोडीला मंत्रोच्चार केल्याने अविचालीत आणि शांत परिणाम साधणारे आहेत.. उज्जयी, भ्रमरी (भ्रमराप्रमाणे श्वसन), नाडी शोधन आणि शीतली आणि शीतकारी यासारखे थंडावा देणारे प्राणायाम हे हायपरथायरोईडझमच्या लक्षणांना नियंत्रणात ठेवण्यात प्रभावी मानले जातात.
थायरॉइड फ्रेंडली आहार
थायरॉइडच्या आजाराने ग्रस्त असाल, तर अतिरिक्त वजन कमी करावं लागतं आणि तीच गोष्ट खूप अवघड असते. पण वजन कमी करण्यासाठी थायरॉइड फ्रेंडली आहार घेऊ शकता.
सकाळी:
थायरॉईड ओव्हर अॅक्टीव्ह झाल्यानंतर झिंक कमी होते. त्यामुळे तुमच्या आहारात झिंकचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यासाठी बदाम खावेत. रात्रभर 5-6 बदाम भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते बदाम खावेत. सकाळी लवकर उठून पाण्याबरोबर थायरॉइडसाठीची गोळी घ्यावी. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला टी किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर ती थांबवा आणि सकाळी म्हणजेच ७-८ दरम्यान उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून एक ग्लासभर पाणी घ्या. आठ ते नऊदरम्यान केळी आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करून खावेत. मोड आलेली धान्यं किंवा सफरचंद, केळी एकत्र मिक्सरमधे वाटून शेक बनवून खावं. साडेदहाच्या सुमारास अर्धी वाटी साय काढलेले लो फॅट दही, त्याच्याबरोबर डाळिंब किंवा एक चमचा भाजलेली अळशी खा. सकाळचा नाश्ता भरपेट हवा. म्हणूनच हे काही पर्याय चांगले आहेत. पोहे, उपमा, आम्लेट करताना त्यात कमी तेल वापरा. ऑलिव्ह ऑईल वापरल्यास उत्तम. उकडलेल्या अंड्यांसोबत टोस्ट हा पर्यायदेखील उत्तम आहे. शाकाहारी लोकांनी अंडी वगळता सगळ्या गोष्टी आलटून पालटून खाल्या तरी चालतील. दिवसाची सुरवात व्हेजिटेबल पोह्यांनी करा. ब्रेकफास्ट दिवसभरात शरीराला 2500 ते 3000 कॅलरीज खाण्याची सवय ठेवा. त्यामधून शरीराला पोषणद्रव्य मिळतात. घरुन नाश्ता करुन निघालो तरी देखील ऑफिसमध्ये गेल्यावर काहीना काही नक्कीच खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाणे किंवा मग फळे खाऊ शकता.
दुपारचं जेवण:
एक बाऊल ओटस् किंवा दोन मल्टिग्रेन पोळ्यांरोबर एक वाटी डाळ किंवा दही-भात किंवा सूप किंवा उकडलेल्या भाज्या खाव्यात. जेवणात गव्हाच्या चपात्या,वाटीभर डाळ, ऋतूमानानुसार भाज्या खाव्यात. जेवणानंतर एक ग्लास ताक किंवा ग्रीन टी. दुपारी ४ वाजता सुकामेवा किंवा मोड आलेली कडधान्यं खावीत.
रात्रीचं जेवण:
संध्याकाळी एक प्लेट सलाड खा. साधारणत: ७-८ वाजता दलिया किंवा एक वाटी पनीर किंवा एक पोळी किंवा एक वाटी ब्राऊन राईस. झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी एक कप गरम लिंबू पाणी प्यावं. अनेकांना गव्हाच्या पोळ्या आवडत नाहीत. त्यांनी भाकरी आवडत असल्यास ती खावी. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदुळाची भाकरी केव्हाही खाण्यास उत्तम. शिवाय तुम्ही मासे खात असाल तर माशाची कढी आवर्जून खा. फळांचा किंवा सुका मेव्याचा मिल्कशेक करताना त्यात साखर घालू नका.
थायरॉईडवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
1. आयुर्वेदातील चिकित्सा हि allopathy पेक्षा वेगळी आहे. आयुर्वेद मध्ये सांगायचा झालं तर पंचकर्मातील वमन हि फार महत्वाचि क्रियाकर्म या ठिकाणि आहे. वमनानंतर विरेचन व बस्ति करावी.
2. एकेरी द्रव्यांमध्ये हरितकी, त्रिफळा, पुनर्नवा, रास्नापंचक, दशमूळ गुडुची इ. चा वापर मध्ये केला जातो. आयुर्वेदिक कल्प जसे आरोग्यवर्धिनी २५०mg जेवणापुर्वी 2 गोळ्या, गोमूत्रहरितकी, धात्वग्नि वाढविण्यासाठी जेवणानंतर लघुमालिनीवसंत १२५mg, गोक्षुरदि गुग्गुळ, धातुपाचके, योगराज गुगुळ, दशमूलारिष्ट, महायोगराज गुगुळ, पुनर्नवाष्टक क्वाथ, पुनर्नवा गुग्गुळ, रसायन म्हणून गुडुचिसिद्ध दूध, पुनर्नवा मंडुर मध्ये वापरलि जातात. हे सर्व कल्प दीपन, पाचन रुपी लंघन करणारे असून लक्षण व अवस्थेनुसार त्यांचा उपयोग केला असता रुग्णाला पूर्णत: उपशय मिळतो.
यासोबतच घरी करण्यायोग्य असे उपाय जसे,
· भोपळ्याचा रस 1 ग्लास उपाशी पोटी प्यावे नीट तयार करते. जर अगदिच भोपळा मिळत नसेल तर त्यासाठि तुम्हि पतंजलि चा लौकि ज्युस 20ml 1/2 ग्लास पाण्यातुन वापरु शकतात
· नाश्त्याच्या वेळी दुधातुन नारिकेल तेल 2 चमचे घ्यावे यामुळे पचनक्रिया सुधारते
· भाजलेले धने 2 चमचे 1 ग्लास पाण्याच्या पेल्यात रात्रभर ठेवावे आनि सकाळि अनशापोटि गाळुन प्यावे
· विदारी म्हनजेच भुईकोहळा चुर्ण 5 ग्रॅम सकाळि उठल्याबरोबर सेवन करावे
· आहारात दहि, कांदा, ज्वारिचि भाकरि घ्यावे
· जेवनानंतर जवस 1 चमचा आनि 1 वेलदोडा रोज खावे
· रोज 1 कांद्याचा लेप किंवा रस हा गळ्याजवळ पुढे लावावा 20 मिनिटानंतर धुवुन टाकावे
· दिवसातुन 2 वेळा जेव्हापन तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कोमट खोबरेल तेलाचा गळ्याजवळ पुढे 2 मिनिटे मसाज करावा
· 1 ते 2 चमचे नारळ तेलाने कोमट दुध सह सकाळी आणि संध्याकाळी रिक्त पोटात घेतल्यास या आजारात फायदेशीर ठरते.
· यारितिने तुम्हि च्या thyroid च्या गोळिसोबत वरिल प्रनालिचा वापर करु शकतात. यामुळे तुमच्या thyroid च्या गोळिचा डोस कमि होइन.
तुम्ही पंचकोषा आणि हरी ओम ध्यान करू शकता. थायरॉईड विकाराचे मुख्य कारण तणाव आहे असे मानले जाते आणि ध्यानाने मन शांत आणि शिथिल राहते आणि दैनंदिन तणाव कमी करते. दररोज काही मिनिटे ‘ओम’ चे उच्चारण करण्यानेसुद्धा मदत होते. उच्चारण केल्यानंतर एक छोटी कृती करा: तुमचा हात थायरॉईड ग्रंथीवर ठेवा आणि ती बरी होऊ लागली आहे हे जाणा. मंत्रोच्चाराची सकारात्मक ऊर्जा थायरॉईड ग्रंथींना उत्तेजित करते.
गरोदरपण आणि थायरॉईड
गर्भारपणात थायरॉईड ग्रंथी खुप महत्वाची भूमिका बजावते,आईच्या शरीरातील संप्रेरकीय बदल आणि बाळाच्या वाढीत देखील ही ग्रंथी महत्वाची भूमिका बजावते. गर्भारपणाच्या आधीच जर हाईपोथायराईडिज्म, हायपरथायराईडिज्म असेल तर तुम्हांला विशेष काळजी घेणे आवश्यक असते.गर्भारपणातील काही लक्षणे आणि थायरॉईडची लक्षणे ही बऱ्याच वेळा सामान असण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. कायम जेवणात आयोडीनयुक्त मीठाचा वापर केला पाहिजे. आयोडीन शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास आणि रक्तप्रवाह सुरुळीत ठेवण्याचं काम करतं. यामुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. आयोडीनचं नियमित सेवन केल्यास थायरॉइडवर नियंत्रण मिळवणं अधिक सोपं जातं. झिंक व सेलेनियमयुक्त पदार्थ थायरॉइडची समस्या नियंत्रित करतात. याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही दही, हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन आवर्जून करा. तसेच तुम्ही आपल्या आहारात अंडी, पूर्ण धान्य, डाळी, राजमा, काबुली चणा, हरभरा, अळशीच्या बिया यासारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
· हायपोथायरायडिझम असलेल्या महिलेस गर्भवती होणे कठीण होऊ शकते.
· गर्भधारणेदरम्यान थायरॉईड संप्रेरकाची पातळी किंचित वाढेल.
· ओव्हरएक्टिव थायरॉईड असलेल्या महिलांना गर्भधारणेदरम्यान त्यांचे थायरॉईड किंचित वाढलेले आढळू शकते. अशा काही स्त्रिया ज्यांना संवेदनाक्षम असतात परंतु त्याआधी निदान झाले नाही त्यांना गर्भधारणेदरम्यान थोडा हायपरएक्टिव थायरॉईड असू शकतो.
· गर्भधारणेदरम्यान गंभीर, उपचार न केलेल्या हायपरथायरॉईडीझमचा संबंध उत्स्फूर्त गर्भपात, कमी जन्माचे वजन, मातृ उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित आहे.
· जर आईला थायरॉईडची समस्या असेल तर नवजात मुलाला थायरॉईड फंक्शनसाठी तपासले पाहिजे कारण यामुळे मेंदूच्या विकासावर त्याचा खोलवर परिणाम होऊ शकतो.
· ज्या स्त्रिया गर्भधारणेपूर्वी उपचार घेत आहेत त्यांना त्याच थेरपी मिळत राहतील, परंतु थायरॉक्सिन डोसची आवश्यकता सहसा वाढत असल्याने त्यांच्या औषधोपचारात समायोजित करणे आवश्यक असू शकते. लेव्होथिरोक्साईन गरोदरपणात घेणे सुरक्षित आहे, कारण त्यात नैसर्गिक संप्रेरक सारखीच वैशिष्ट्ये आहेत.
· तथापि, कोणत्याही जन्माच्या जन्मापूर्वीच्या जीवनसत्त्वे व्यतिरिक्त ते 2 ते 3 तास घेतले पाहिजे कारण लोह आणि कॅल्शियम थायरॉईड संप्रेरकाच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात. गर्भवती होण्यापूर्वी स्त्रीने तिची हायपरथायरॉईडीझम नियंत्रणात ठेवली पाहिजे. योग्य उपचारांसह, बहुतेक गर्भधारणेची सामान्यत: प्रगती होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक वर जावे
https://youtu.be/T0M_Gdvh0WI
https://youtu.be/AJx3MwAkCkw
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments