top of page
Search

दाडिम

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 10, 2021
  • 4 min read

‘ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचं वर्णनकरणारं हे गाणं आपल्या तोंडात चांगलंच बसलं आहे. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच Floric Acid या रसायनिक घटकाबरोबरच Antioxidants मोठ्याप्रमाणात आहे. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वातजुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्णअसे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते. तर चला तर मग जाणून घेऊया बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे.


तत्तुस्वादु त्रिदोषघ्नं तृइदाहज्वरनाशनम् ।

हत्कण्ठमुखदोषघ्नं तर्पणं शुक्रलं लघु।

कषायानुरसं ग्राहि स्निग्धं मेधाबलप्रदम् ।

स्वादुम्लं दीपनं रुच्यं किञ्चित्पित्तकरं लघु

अम्लं तु पित्तजनकं आमवातकफापहम् । भा.प्र.


गण – हृद्य, छर्दीनिग्रहण (च०); पुरुषकादी (सु०).

कुल – कुलदाडिमकुल (Punicaceae.)

लॅटिन नाव - (Punica Granatum.)

पर्याय - दन्तबीज, लोहितपुष्पक, रोचन, मधुबीज इ. म. - डाळिंब.

स्वरूप - ३ ते ५ मीटर उंचीचे वृक्ष. काण्डत्वचा धुरकट तांबडी. गुळगुळीत.

• पर्ण - ५ ते ७ सें.मी. लांब. ३ सें.मी. रुंदी, दोन्ही टोकांस निमुळते.

• पुष्प - रक्तवर्ण, एकादी, क्वचित २ ते ४ च्या गुच्छात.

• फल - गोलाकार, सुमारे ५ सें.मी. व्यास स्थायी बाह्यकोशयुक्त.

• फलत्वचा - चिवट.

प्रकार -

(अ) काबुली (बेदाणा) व मस्कती (पांढऱ्या दाण्यांची) या उत्तम जाती.

(आ) रसभेदाने - मधुर, मधुराम्ल व आम्ल.

उत्पत्तिस्थान - भारतात सर्वत्र, तसेच काबूल, क्वेट्टा, इराण, आफ्रिका.

उपयुक्तांग - फलत्वचा, मूलत्वचा, फल.

गुण-

रस - मधुर, कषायआम्ल. विपाक - मधुर (मधुरजाती), आम्ल(अम्लजाती).

वीर्य - अनुष्ण. मु. गुण - लघु व स्निग्ध.

दोषघ्नता - मधुर व कषाय असल्याने पित्तघ्न, अल्प उष्ण असल्यानेकफवातघ्न.

• आम्लफल वातशामक.

• आम्लजाती पित्तजनन.

• मधुरजाती पित्तघ्न.

• आम्लअनुरस असता किंचित पित्तकर.

उपयोग -

• पोटातील कृमी दूर करण्यासाठी डाळिंबाच्या सालाचा वापर हा एकअतिशय प्रभावी उपाय आहे. ही समस्या मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येते. यावर मात करण्यासाठी दिवसातून 3 वेळा वाळलेल्या डाळिंबाच्या सालीची एक चमचा पावडर द्या. यामुळे पोटातील कृमीदूर होतील. ही पावडर मूळव्याध दरम्यान किंवा मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात देखील फायदेशीर ठरेल. किंवा १० ते २० ग्रॅम प्रमाणात मुळांचा काढा रिकाम्या पोटीदेऊन त्या दिवशी लंघन (उपवास/कमी खावे) करावे व दुसऱ्या विरेचन दिल्याने कृमी मरून पडून जातात.

• आम्लरसामुळे मुखवैशा (तोड स्वच्छ होणे) होऊन तोंडाला चव येते. आम्लरस अग्निदिपन, कषायरसाने ग्राही, पित्तशामक असल्याने तृष्णानिग्रहण, म्हणून अनिमांद्य, अरुची (Anorexia), तृष्णा(Thirst), आम्लपित्त (Hyper Acidity) इत्यादी पित्तज विकारात व Diarrhoea त मलसंग्रहणासाठी वापर करावा.

• लहान मुलांच्या अतिसारात कोवळ्या फुलांचे चूर्ण शेळीच्या दुधातवाटून द्यावे. पिकलेल्या डाळिंबाचा पुटपाकविधीने रस काढून तो मधासह सेवन केल्याने अतिसार बरा होतो.

• डाळिंबाची व कुड्याची साल सम प्रमाणात घेऊन त्यांच्या काढ्यात मध घालून दिल्याने कष्टसाध्य रक्तातिसार बरा होतो. कच्च्या डाळिंबाच्या रसात, मायफळ, लवंग व सुंठ उगाळून मधासह सेवन केल्याने ग्रहणीमध्ये (Ulcerative Colitis) मलसंग्रहण होते. तसेचDuodenum या अवयवास बल मिळून अग्निदीपन व आमपाचन होते. अतिसार, संग्रहणीवर डाळिंबाच्या फळाची साल ताकात उगाळून २० ग्रॅम प्रमाणात द्यावी.

• कास (खोकला) –

पुष्पकलिका कषायरसाने कफघ्न तर फळ स्निग्ध असल्याने स्नेहनव कफनि:सारक आहे. त्यामुळे फळांचा उपयोग कासात केल्याने कफ सहजी सुटतो आणि श्वासमार्गाची रूक्षता दूर होते. क्षयजकासात त्रिकटुकल्काने सिद्ध केलेले घृत + २ भाग दाडिमस्वरस + यवक्षार ५०० मि. ग्रॅ. हे मिश्रण जेवणानंतर घ्यावे. त्यामुळे अग्निदीपनहोऊन कण्ठापासून पोटापर्यंतच्या अवयवांमधील दोषांचे शोधनहोते. डाळिंबाच्या फळाच्या सालीचे चूर्ण कषाय रसामुळे कण्ठातील कफाचा नाश करते व गलशुण्डिकावृद्धीमुळे उत्पन्न झालेल्या कफजकासावरही उपयोगी पडते.

• आम्लरसामुळे दाडिम हृदय या अवयवाला हितकारक आहे दीपन-पाचन असल्याने दाडिम रसरक्तांची वृद्धी करतो. त्यामुळे हृदयाचे पोषण होते.

• नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असल्यास नाकात डाळिंबाच्या फुलांचा रसाचे काही थेंब टाका. यानंतर काही वेळानं नाकातून येणारा रक्तस्राव थांबेल. बहुतेकवेळा ही समस्या उन्हाळ्याच्याऋतुत उद्भवते. डाळिंब वास्तविक थंड आहे, यामुळे शरीराची उष्णताकमी होते. कषाय रसामुळे वातवाहिन्यांचा संकोच होऊन रक्तस्तंभनही होते.

• पित्तप्रकोप, अरुचि, अतिसार, मुरडा, खोकला, छातीतील आग.. या आजारात डाळींब प्रशस्त. तोंड सतत बेचव वाटत असेल तर डाळींबाचा रस सैंधव व मधासह दिवसातून २-३वेळा घ्यावा. तापातील बेचवपणा याने लगेच कमी होतो.

• डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते. पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.

• डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, डाळिंबामध्ये भरपूरलोह असतं, ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आजारीव्यक्तींमध्ये लोहाचे प्रमाण कमी होतं, म्हणून त्यांना डाळिंब दिले जाते, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे Anaemia आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे. याव्यतिरिक्त, डाळिंबाच्या दाण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, टॅनिन, जीवनसत्त्वे असतात. डाळिंबाचे दाणे, पानं, मूळ, फुलं आणि सालींचे आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे. या सगळ्यांचा उपयोग विविध आजारांवर केला जातो. डाळिंबाची पानं पोटदुखी, निद्रानाश, एक्झिमा, तोंडाचा अल्सर अशा अनेक आजारांना बरे करतात. डाळिंब शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर कसे आहे ते जाणूनघेऊया.

• दातातून रक्तस्त्राव होत असेल तर या समस्येला पायरोरिया म्हणतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी डाळिंबाची वाळलेली फुलं बारीक करा. ही पावडर दिवसातून 2 वेळा वापरावी. दातातून रक्तस्त्राव थांबेल आणि दातही मजबूत होतील.

• डाळिंबाची दाणे पोटदुखीसाठी प्रभावी आहेत. पोटाच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी मीठ, मिरपूड पावडर आणि डाळिंबाच्या बिया मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पोटदुखीची समस्या दूर होईल

• भूक फारच कमी लागणे किंवा पचनाची समस्या असल्यास डाळिंबाचे दाणे खूप फायदेशीर असतात. भूक वाढवण्यासाठी, खारट मीठ, मिरपूड, जिरे, हिंग थोड्या प्रमाणात घेऊन पावडर तयार करुन घ्या. पचनक्रिया सुधारण्यासाठी, 3 चमचे डाळिंबाच्या रसात एक चमचा जिरे आणि गूळ मिसळा आणि जेवणानंतर खा. हे पचन सुधारेल आणि पचन संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करेल.

• चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाब पाण्यात डाळिंबाच्या वाळलेल्या सालीचे चूर्ण मिसळून लेप बनवा. हा लेप झोपण्याच्या वेळी नियमितपणे लावा आणि सकाळी चेहरा धुवा. हे चेहऱ्यावरील डाग, रेषा, सुरकुत्या दूर करेल.

• दाडिम मस्तिष्काला बल्य आणि मेध्य असल्याने मस्तिष्कदौर्बल्यजनित विकारांमध्ये फळाचा वापर करावा.

• स्निग्ध असल्याने मूत्रमार्गाचे स्नेहन करून मूत्रकृच्छ्रात उपयोगी. मूत्रदोष-हारक असल्याने किडनीच्या सर्वच आजारात डाळींबप्रशस्त आहे.

• दाडिम वातपित्तांचे शमन करतो व रसरक्तांची वृद्धी करतो. त्यामुळे श्रम (थकवा) हे लक्षण दाडिमस्वरसाने दूर होते.

• त्वचा कषाय असल्याने शोथहर, व्रणशोधन - रोपण व जंतुघ्न. त्यामुळे सालीच्या काढयाच्या मुख आणि कण्ठरोगात गुळण्या कराव्यात. व्रणधावनार्थही काढा वापरावा.

• अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page