दूध प्यायचे फायदे
- divipawar94
- Jun 12, 2021
- 2 min read
दूध पिण्याचे फायदे
1. दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते.
2. दूध हे त्वचेस कोमल बनवतो सोबतच मुलायम आणि चमकदार हि बनवतो. दुधात त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे पण असतात. याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला एका बाथटब मध्ये दूध भरायचे आहे आणि त्यात बसून आराम करायचा आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला दिवसातून कमीत कमी दोन ग्लास दुध सेवन करणे जरुरी आहे.
3. अध्ययनाने हे सिद्ध झाले आहे कि ज्या महिला रोज दूध पितात त्याचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते. जर आपण स्वस्थ स्नैक्स च्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच एक ग्लास दूध सेवन करायला पाहिजे. डॉक्टर नेहमी सल्ला देतात कि रात्री जेवण केल्यावर व फळे खाल्ल्यावर एक ग्लास दूध जरूर प्यायला पाहिजे.
4. हे खरेच कि मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी त्यांना दूध पिणे जरुरी आहे. तेव्हाच त्याचा योग्य विकास होऊ शकणार हे पण सत्य आहे कि तरुण लोक सुद्धा दूध सेवन करून आपल्या हाडांना मजबूत बनवू शकतात. मग दुधातील फायदे त्यातील कॅल्शियम मुळेच असतात आणि यासाठी शरीरात विटामीन – डी ची जरुरत असते.
5. दुधात सापडणारे सर्व विटामिन्स आणि खनिजे आपल्यासाठी चिंता हारक ठरतात त्यामुळे त्याचे आभार मानले पाहिजे. दिवसभर काम केल्यावर जर एक ग्लास दूध पिल्यास स्नायू आणि मस्तकातील सर्व वेदना व काळजी कमी होण्यास मदत होते.
6. स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटीनमुळे होतो. बरेच धावपटू व्यायाम केल्यावर दूध पिणे पसंत करतात.यामुळे शरीराला आवश्यक पोषके मिळतात आणि त्यांच्या स्नायूंचा विकास अधिक होतो. स्नायुमधील वेदनाही यामुळे दूर करण्यात मदत मिळते.
7. दुधामुळे बऱ्याच आजारांना शरीरापासून दूर ठेवता येते. याचा शोध मागिल काही दशकांमध्ये लागला होता. या रोगांमध्ये रक्तदाबाची समस्या पासून ते हृदयरोगाच्या समस्यापर्यंतचा समावेश आहे. दुधात आपल्या लीवर मधून कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. काही शोधकर्त्याच्या मते दुधात अनेक प्रकारच्या कॅन्सरांशी लढण्याची क्षमता असते.
दुधापासून होणारे नुकसान
1. लहान मुलांना भेसळयुक्त दूध पाजल्यामुळे त्यापासून त्यांच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होतात. दूध पावडर पासून बनलेले दूध हे कॅन्सर साठी कारणीभूत ठरू शकते.
2. दुधात अनेक प्रकारचे प्रोटीन्स असतात त्यापैकी केंसीइन प्रोटीन हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे दुधाचे सेवन हानिकारक ठरते.
3. काही मुलांमध्ये दुधात सापडणारे केंसीइन प्रोटीन सहन होत नाही त्यामुळे ह्यापासून अनेक आजार होण्याची भीती असते.
4. काही मुलांमध्ये मधुमेहाला सहाय्यक म्हणून दूध घातक ठरू शकते त्यामुळे अशावेळी दुधाचे सेवन विपरीत परिणामकारक ठरते.
5. अध्ययनातून हे समजले आहे कि, दुध हे हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतो यावर मात्र अजून शोध चालू आहे. त्यामुळे याबाबत पूर्ण सत्यता मानता येत नाही.
टीप - वरील कोणतेहीउपचार आयुर्वेद तज्ञांच्यासल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments