दूधाविषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- divipawar94
- Jul 19, 2021
- 2 min read

दूधालापूर्णान्न असे म्हटले गेलेआहे. तुमचं वय कितीही असोनुसत्या दुधामधील पोषक घटक तुमच्याशरीराचं पोषण करण्यासाठीं समर्थआहेत. दुधामध्ये असलेले दुर्मिळ पोषक घटक इतरकोणत्याही पदार्थात नाहीत.विशेषतः भारतीय गाईंच्या दुधाच्या बाबतीत हे 100% खरे आहे. पणदुर्दैवाची गोष्ट ही आहे की, दूध एवढे पौष्टिक असूनदेखील 99% लोक ते चुकीच्यापद्धतीने पितात. त्यामुळे पचनाच्या तक्रारी, ॲलर्जी, शरीरावर सूज येणे, वजनवाढणे, किडनी चे रोग इत्यादीसमस्या जन्म घेतात. आता, एवढे फायदे देणारे दूध ज्याला पूर्णान्नकिंवा superfood म्हणून मान्यता देण्यात आली आहे तेयोग्य पद्धतीने कसे प्यावे हेसमजून घेणे आपल्या आणिकुटुंबाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. दूध सेवनकरण्याच्या पाच चुकीच्या पद्धतीकोणत्या आहेत तसेच मगयोग्य प्रकारे दूध कसे प्यावेते मी तुम्हाला आजसांगणार आहे.
दूधपिण्याच्या चुकीच्या पद्धती
दूधाचेफायदे अदभुत आहेत. तरीही बरेच लोक दूधजेवणाच्या थोडे आधी किंवाजेवणाच्या नंतर घेतात. त्यामुळेतुम्ही दोन वेळा जेवल्यासारखेहोते. त्याचा परीणाम आपल्या पचन शक्तीवर होतो. जेवण आणि दूध ह्यातकिमान दोन तासांचे अंतरठेवा. चुकूनही दुधासोबत तिखट मसालेदार पदार्थजसं की पराठा, लोणचेइ. खाऊ नका. तेचुकीचे आहार मिश्रण ठरते. आयुर्वेदानुसार मीठ आणि दूधएकत्र घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन त्वचा रोगटहोऊ शकते. मसालेदार पदार्थ आणि दूध ह्यामध्येकिमान 1 तासाचे अंतर ठेवून खा. दूध हे स्वभावतःच पचायलाजड आहे. त्यामुळे लहानमुलांना दूध देताना तेउकळून कोमट करून द्यावे. नाहीतर त्यांची पचवायची ताकद नसल्याने लहानमुलांना पोटाचे त्रास सुरू होऊ शकतात. दूध उकळल्याने त्यातील आण्विक संरचना बदलते. त्यामुळे ते सहज पचते. दूधात निसर्गतःच लॅक्टोज नावाची साखर असते. काहीवेळाआधीच साखर असलेल्या दूधातआपण रिफाइंड केलेली साखर घालतो. हीसाखर केमिकल युक्त असू शकते त्यामुळेती दुधातील पौष्टिक घटक शोषून घेतानाअडथळा आणते. शिवाय साखर घातल्याने आधीचपचण्यास जड दूध आणखीजड होते. आंबट चवीची सगळीफळे दुधासोबत घेणे टाळा. दूधआणि संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी इ. फळे एकत्रकधीच खाऊ नका.
दूधकशा प्रकारे आणि केव्हा प्यावे.
कोमटदूध नेहमी बसून घोट घोटसावकाश प्या. फक्त काही परीस्थितीमध्ये दूध उभ्याने पिऊशकता. जर तुम्हाला वजनवाढवायचे आहे तर तुम्हीम्हशीचे दूध प्या. नाहीतरसर्वांसाठी गायीचे दूध उत्तम कारणगायीच्या दूधात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन B12, आयोडीन, मॅग्नेशियम असे पोषक घटकआहेत. हाडे आणि स्नायूआणि बुध्दी बळकट करण्यास गायीचेएक ग्लास दूध सर्वोत्तम. दुधदिवसा केव्हाही पिऊ शकता. पणसंध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर दूध पिणे चांगले. त्याने काय होते कीदूध पचवण्यासाठी आवश्यक द्रव संध्याकाळी आपल्याशरीरात तयार होतात. दुधातील casein नावाचा पौष्टिक भाग जवळजवळ 80% रात्रीचपचतो. Tryptophan नावाचे एक आम्ल दूधातअसते जे रात्री पचतेम्हणून रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी दूधप्यावे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments