दही खाण्याचे फायदे
- divipawar94
- Jun 13, 2021
- 1 min read

दहीखाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळेदुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्यासमस्यांवर दही उत्तम उपायआहे. दही आरोग्यासाठी लाभदायकआहे हे सर्वसामान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलकेअसते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनीग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासूनबनवले जाणारे ताक, लस्सी असेपेय प्यायला हवे. दह्यामुळे रक्तशर्करेचीपातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रितराखण्यास मदत होते. मधुमेहामध्येहोणारी गुप्तागांची खाज कमी होते. लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यातअसल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोटनियमित साफ होते. दह्यामध्येरक्तातील चरबी घटवण्याची क्षमताआहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यताकमी होते. रक्त दाब नियंत्रितराहतो. दही खाल्ल्याने शरीरातीलप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊनशरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळेविषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजारहोत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते. दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावनादीर्घ काळ पर्यंत टिकूनराहते. म्हणून दोन जेवणामध्ये दहीखाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यासमदत होते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहेजे शरीरात सहज शोषले जातेआणि शरीराची गरज भागते.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments