top of page
Search

नाभीमध्ये 2-3 थेंब तूप किंवा तेल टाकण्याचे फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 27, 2021
  • 2 min read

1. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा ओठ फुटल्याची समस्या झाली असेल तर तुम्ही महुरीच्या (राई) तेलाने यापासून सुटका मिळवू शकता यासाठी आपल्या नाभी मध्ये राईच्या तेलाचे काही थेंब टाका.


2. मुलींना मासिक पाळीमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या दिवसात अनेक हार्मोनल चेंजेस पण होत असतात ज्यामुळे त्यांचा मूड चांगला राहत नाही आणि आरोग्य सुध्दा. पण जर तुम्ही मासिक पाळीतच्या वेळी होणाऱ्या या समस्यांपासून वाचू इच्छिता तर कापसाचा गोळा ब्रांडी मध्ये भिजवा आणि यास नाभीवर ठेवा. यामुळे तुम्हाला या समस्यां पासून मुक्ती मिळेल.


3. कडुलिंब तेल काही थेंब नाभीत टाकून आजूबाजूला थोडी मसाज करा यामुळे मुरूम आणि फोड्या येणे बंद होऊन त्वचा बेदाग आणि सुंदर होईल.


4. चेहरा डागरहीत किंवा सुंदर असेल तर त्याची गोष्टच वेगळी असे म्हंटले जाते की बादाम तेलाचे काही थेंब नाभी मध्ये लावल्यामुळे चेहरा उजळतो आणि तेज येते.


5. नारळाचे तेल किंवा ओलिव ओईलचे काही थेंब नाभी वर लावावे आणि हळूहळू मसाज करावी. यामुळे संतती निगडीत समस्या दूर होतात आणि संतती क्षमता वाढते.


6. सर्वांना बेबी सॉफ्ट त्वचा पाहिजे असते. तुम्हाला ही निरोगी आणि सॉफ्ट त्वचा पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त गायीचे तूप नाभीवर लावावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला मिळेल बेबी सॉफ्ट त्वचा.


7. शरीराच्या सर्व बॉडी पार्टसचे कनेक्शन नाभी सोबत जोडलेले असते. नाभी मध्ये दररोज काही थेंब गायीचे तूप लावल्यामुळे अनेक आजारा पासून बचाव होतो. तसेच या नैसर्गिक थेरपीमुळे अनेक हेल्थ प्रोब्लेम ठीक केले जाऊ शकतात. सोबतच हे आपल्याला सुंदर बनवतात.


8. तूप नाभीत लावल्यामुळे स्कीन मध्ये आद्रता टिकून राहील आणि फेयरनेस वाढेल. यामुळे स्कीनची ड्रायनेस दूर होते आणि चेहरा चमकदार होतो. केसांचे गळणे थांबते आणि केस चमकदार होतात. तसेच हे गुडघेदुखी आणि सांधेदुखी मध्ये फायदेशीर आहे. यामुळे पिम्पल्स आणि डाग दूर होतात. नाभी मध्ये तूप लावल्यामुळे ओठ सुंदर होतात. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि बुद्धीकोष्ट पासून बचाव होतो


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page